विश्वाच्या बाल्यावस्थेतील फोटो टिपला मानवाने

   

१२ जुलै २०२२ हा दिनांक जगाच्या इतिहासात सुवर्णक्षणांनी लिहला जाईल कारण या दिवशी मानवाने आपल्या सभोवताली अथांग पसरलेल्या विश्वाच्या बाल्यावस्थेतील फोटो टिपला आहे नासा या संक्षिप्त रूपाने प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात नॅशनल अरनेटिक्स अँड स्पेस एजन्सीकडून संचालित करण्यात येणाऱ्या जेम्स टेलिस्कोपने  छायाचित्र टिपले आहे  सदर फोटोमुळे आजपासून १३ अब्ज वर्षांपूर्वी किंवा विश्वाचा जन्म झाल्यनंतरचा  ८० कोटी वर्षानंतर विश्व कसे होते . याचा उलगडा होणार आहे .विश्वाचे सध्याचे वय बघता ८० कोटी वर्ष म्हणजे विश्वाचा बाल्यावस्थेतील हे फोटो म्हणायला हवेत

     जेम्स टेलिस्कोप पृथ्वीपासून १५ लाख अंतरावरून आपल्या सभोवताली पसरलेल्या विश्वाचे निरीक्षण करणारी दुर्बीण आहे १००० कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा जास्ती खर्च, तब्बल २० वर्षांचा कालावधी बनवण्यासाठी तर १०,००० पेक्षा जास्त वैज्ञानिक, अभियंते यांच्या अथक परिश्रमातून जेम्स वेब दुर्बिणीची निर्मिती करण्यात आली आहे  जी प्रकाशाच्या सर्व प्रकारच्या लहरींचे  आकलन करण्यास समर्थ आहे (मानवी डोळ्यास दिसतो तो प्रकाशाच्या अत्यंत छोटा भाग आहे मानवी डोळ्यास दिसणारे प्रकाशाचे अनेक भाग आहेत ज्यामध्ये विविध किरणांचा समावेश होतो हे आपण लक्षात घेयला हवे ) पृथ्वीच्या वातावरणाचा अवकाश संशोधनावर काहीसा  प्रतिकूल परिणाम होतो

त्यामुळे हा अडथळा दूर करण्यासाठी पृथ्वीच्या बाहेर दुर्बीण ठेवण्याचे मानवाचे प्रयत्न होते ज्यामध्ये मानवाने सर्वप्रथम हबल दुर्बीण अवकाश्यात सोडली त्यास आता तिसवर्षे झाली आहेत या काळात तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे तसेच हबलवर असणारी उपकरणे देखील खूप काळापासून कार्यरत असल्याने काहीशी मंदावली होती त्यामुळे त्यांची जागा घेणारी नवीन दुर्बीण आवश्यक होती म्हणून नासतर्फे अवकाशात नवीन दुर्बीण सोडण्यात अली ती म्हणजे जेम्स टेलिस्कोप होय जिच्यामार्फत हि छायाचित्रे घेण्यात आली आहेत   आजवर हबल ला ही पकडता आलेल्या आणि विश्वाच्या प्रसारण पावण्याच्या स्थितीमुळे इन्फ्रारेड या प्रकाशाच्या तंरंग लांबीत गडप झालेल्या  प्रकाशाच्या त्या रहस्यावरील पडदा दूर करण्याच्या प्रकियेस जेम्स वेबने सुरवात केली आहे

  आपण कोणतीही गोष्ट बघतो ती मुळातील भूतकाळातील असते तिच्यावर पडणारा प्रकाश आपल्याकडे पोहोचल्यावर आपणास ती गोष्टी दिसते या साठी काही वेळ जातो त्यामुळे आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीकडून प्रकाश येतो तेव्हा तो प्रकाश त्या गोष्टीकडून जेव्हा निघाला तेव्हाची स्थिती आपणस दिसते . आकाश्यातील गोष्टींसाठी ही स्थिती हजारो लाखो ते कोट्यवधी वर्षापर्यंत असते जेम्स दुर्बिणीने नुकतेच ज्या खगोलीय वस्तूचा प्रकाश पोहोचला तो त्या वास्तुपासून १३ अब्ज वर्षांपूर्वी निघालेला आहे परिणामी १३ अब्ज वर्षपूर्वीची 

अवकाश्याची स्थिती आज आपणस समजली आहे  जे  विश्वाच्या जन्मापासून फार जुने नसल्याने विश्वाचा जन्म झाल्यावर ते कसे होते यावर प्रकाश पडणार आह

आपण आकाशात बघतो ते विविध तारे मिळून एक दीर्घिका होते एका दीर्घिकेतील तारे एका केंद्र भोवती फिरतात    आपण आकाशगंगा या दीर्घिकेत राहतो .आकाशगंगा सारख्या अनेक दीर्घिका अवकाश्यात आहेत खगोल शास्त्रज्ञांनी या विविध दीर्घिकांची  विविध गटात विभागणी केली आहे अस्या विविध गटांपैकी एकअसणाऱ्या   SMACS 0723 या गटाचा घेतला आहे .

  एका दुर्बिणीने का दुर्बिणीने घेतलेला घेतलेला एक फोटो इतकेच महत्व त्याचे नाहीये अथक प्रयत्न करून मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून जेमतेम २५ हजार वर्षांपूर्वी जन्मला आलेल्या मानवाने १३ अब्जा वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचा केलेला अभ्यास म्हणून या कडे बघता येईल काही लोक हे करण्याची गरज नाही तो पैसा इतर समाजकल्याणाच्या कामात गुंतवला असल्यास जास्त फायदा झाला असता असे बोलले जाऊ शकते त्यांना माझे सांगणे आहे की कोणत्याही शास्त्रीय गोष्टीचा फायदा होतो तस्य याही गोष्टीचा फायदा आता दिसत नसला तरी भविष्यात होणार हे १००% सत्य आहे गरज आहे आपण त्यात उत्साह दा खवण्याची   जो आपण  आकाशदर्शन करू शकतो मग करणार ना सुरवात आकाशदर्शनाला

 

   


#हि_माझी _एक_हजार_विसावी_ब्लॉगपोस्ट_आहे 


  





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?