17 जूलैनंतर पाकिस्तानात काय होणार ?

   

आपल्या भारताच्या दक्षिणदिशेला असणाऱ्या श्रीलंकेच्या  आर्थिक आणि राजकीय समस्येबाबत आपणास आतापर्यंत बरेच काहि माहिती झाले असेल.मात्र हे कमी की काय म्हणून भारताच्या पश्चिमेकडेसुद्धा एक मोठे राजकीय संकट तयार होत आहे. हे संकट आहे, पाकिस्तानमधील.
     पाकिस्तानमध्ये दोन राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातील एक आहे, पाकिस्तानच्या पंजाबमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात. तर दुसरी घडामोड आहे, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांनी संसद भंग करण्याचा निर्णयावर दिलेला निर्णय.
         तर पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचे सरकार जावून शहबाज शरीफ यांचे सरकार आल्यावर त्याचे प्रतीसाद त्यांचा पंजाबच्या विधानसभेत देखील उमटले. तिथे त्यावेळच्या मुख्यमंत्र्यावर अविश्वाचा प्रस्ताव दाखल करण्यात येवून त्या मुख्यमंत्र्यांना खुर्ची सोडावी लागली. त्यावेळी पंतप्रधानाच्या मुलाने अर्थात हमजा शहबाज शरीफ याने
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.  या सर्व नाट्यामध्ये पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने 20 आमदारांना अपात्र ठरवले.त्यामुळे विधानसभेच्या बहुमतासाठी 186 जागा आवश्यक असताना सत्तारुढ पक्षाकडे 177 आमदरांचे बहुमत तर प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या पाकिस्ताने तेहरीके इंसाफ या पक्षाकडे 173 आमदरांचे समर्थन राहिले. थोडक्यात कोणाकडेही बहुमत नाही. इकडे पाकिस्तानी निवडणूक आयोगाने अपात्र ठरवलेल्या 20 जागांवर निवडणूका घेण्याची प्रक्रिया सुरु केली.ज्यानुसार 17 जूलै मतदान होणार आहे.
           पाकिस्तान मधील सर्वात जास्त लोकसंख्येचा आणि आर्थिकदृष्ट्या सधनप्रांत म्हणजे पंजाब. या प्रांतावर ज्याची हुकुमत तो पक्ष पाकिस्तानच्या केंद्रीय सत्तेत वरचढ ठरतो. आपल्याकडे जसे दिल्लीचा सत्तेचा मार्ग लखनउमधून जातो असे म्हणतात त्याप्रमाणे पाकिस्तानात इस्लामाबाद चा सत्तेचा मार्ग लाहोरमधून जातो असे म्हणतात. 14 जूलैपर्यत आलेल्या बातम्यांनुसार तेथील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इंसाफ  या पक्षाला 20पैकी 15च्या आसपास जागा सहज मिळू शकतात. जर पाकिस्तानात केंद्रात  आणि पाकिस्तानी पंजाबात सत्ता असलेल्या पक्षाने अर्थात पाकिस्तान मुस्लिम लीगच्या नुर गटाने  जर निवडणूकीत गैर प्रकार केले तरच ते सत्तेत येवू शकतात असे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या राजकारणात पंजाबची सत्ता गमावणे म्हणजे केंद्रातील सत्ता सोडण्याची वाटचाल सुरु करणे, सबब पाकिस्तान मुस्लिम पक्षाचा नूर गट सत्ता
टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहणार हे स्पष्टच आहे. निवडणूकपुर्व मतदानचाचणीत इम्रान खान यांना मिळणारा अभुतपुर्व पाठिंबा बघता जर निकाल इम्रान खान यांच्या विरोधात गेल्यास पाकिस्तानात एखादे आंदोलन सुरु होवू शकते. ज्याचा नेता इम्रान खान असेल.
        ज्यामुळे आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेला पाकिस्तान अजूनच अडचणीत येवू शकतो.आजमितीस पाकिस्तानकडे फारच कमी परकीय चलनसाठा आहे, महागाई प्रचंड प्रमाणात आहे . परीणामी इम्रान खान यास सत्ताधिकारी पक्षाविरूद्ध आंदोलन करण्यास अनकुल स्थिती आहे. पंजाब हा पाकिस्तानातील सर्वात समुद्ध आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेला प्रांत आहे, हे आपण लक्षात घेतले तर पाकिस्तानी पंजाब अशांत झाल्यास त्याचा भडका सहजच दुसरीकडे पसरु शकतो आणि संपूर्ण पाकिस्तान जळण्याचा धोका उत्पन होवू शकतो. परीणामी त्यांची आर्थिक स्थिती अजून खालवून दुसरा श्रीलंका देश तयार होवू शकतो.जर इम्रान खान जिंकला तर त्यास अधिक ऊर्जा मिळून त्याचे सत्ताधिकारी पक्षाविरूद्धचे आंदोलन अधिक उग्र स्वरूप धारण करेल. निवडणूकीच्या साठी होणाऱ्या प्रचार सभेची जी दृश्ये आंतरराष्ट्रीय माध्यमात येत आहेत ते बघता त्यास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, असे सहज म्हणता येवू शकते.या आंदोलनामुळेसुद्धा पाकिस्तानात काहीसी राजकीय अस्थिरता निर्माण होवू शकते.
        हे झाले पाकिस्तानच्या पंजाबच्या निवडणूकीतील चित्र आता वळुया पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाकडे.जो इम्रान खान यांच्या विरोधात गेला आहे. इम्रान खान पंतप्रधानपदी असताना तेथील नँशनल
अस्बेली(आपल्या लोकसभा सदृश्य सभागृह) च्या उपाध्यक्षांनी संसद भंग करण्याचा घेतलेला  निर्णय, घटनेची पायमल्ली करणारा असल्याचा निर्णय त्यांच्या संसदेच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने चार विरूद्ध एक असा दिला आहे. ज्यामुळे सत्ताधिकारी पाकिस्तानी मुस्लिम लीगच्या नुर गटाला काहीसा आनंद झाला आहे. मात्र हे सर्व प्रकरण ज्या अमेरीकी हस्तक्षेपाच्या आरोपावरून.सुरु झाले त्याबाबत या निर्णयात काही सांगण्यात आलेले नाही. किंबहुना ते पत्रच न्यायालयासमोर आणण्यात आलेले नाही. त्याबाबत इम्रान खान.यांच्या विरुद्ध करावयाचा निर्णय खंडपीठाने तेथील संसदेवर सोडला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयानंतर पाकिस्तानच्या वर्तमान संविधानाच्या (सध्या पाकिस्तानात 1971साली तयार केलेल्या संविधानानूसार कामकाज चालते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांची संविधान निर्मिती प्रक्रीया 1956 पर्यत चालली. 1956 सालचे संविधान बांगलादेशची निर्मिती झाल्यावर पुर्णतः रद्द करण्यात येवून नवीन संविधान करण्यात आले ज्यास इकहत्तर का आईन असे म्हणतात.) कलम 6 नूसार खटला दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे,असे तेथील नँशनल.अस्बेलीच्या अध्यक्षाने जाहिर केले आहे. पाकिस्तानमधील इम्रान खान यांची लोकप्रियता बघता तेथील सरकारने इम्रान खान यांच्या विरोधात कारवाई करणे स्वतः च्या हाताने स्वतः ची कबर खोदण्यासारखी स्थिती उत्पन करण्यासारखे आहे,असे मत अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे.
 सबब पाकिस्तान पुढील काही दिवस सहज राजकीय घडामोडींनी बदलत जाणार, आता हे बदल सकारात्मक झाल्यास भारताला फायदेशीर ठरेल. मुर्खांचा मालक होण्याऐवजी शाहण्याचा नोकर होणे अधिक योग्य असते.त्याचप्रमाणे पाकिस्तान आपला शत्रू असला तरी ,त्यात शांतता असणेच भारताच्या हिताचे आहे. 

#हि_माझी _एक_हजार_बाविसावी-ब्लॉगपोस्ट_आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?