बदलत्या हवामानाचा विळखा घट्ट

   


      मानवास  बदलत्या हवामानाचा विळखा दिवसोंदिवस घट्ट होत असल्याचे साध्य जागतिक हवामानबदलवियी ज्या घडामोडी घडत आहेत त्यातून स्पष्ट होत आहे . १९ जुलै २०२२ ही तारीख या मगरमीठीच्या इतिहासात महत्त्वाची तारीख म्हणून नोंदलेली जाईल या दिवशी लंडनच्या इतिहासात पहिल्यांदाच ४० अंश २ शतांश नोंदवले गेले . सोमवार रात्र आणि मंगळवार पहाट  लंडनला सलग दुसरी जास्त तापमान असलेली रात्र म्हणून नोंदवली गेली आहे . वाढत्या तपमानामुळे लाकडाच्या जास्त वापर केलेल्या काही घरांना आगी देखील लागल्या . सुदैवाने या आगीवर लगेच नियंत्रण मिळवल्याने प्राणहानी झाली नाही आजमितीस समस्त पश्चिम युरोप प्रचंड अश्या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे . या आगीमुळे फ्रान्सच्या नैऋत्य दिशेला ( साऊथ वेस्ट ) तसेच स्पेन पोर्तुगाल या दिशेला असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणत वणवा लागत आहे . युनाटेड किंग्डम देशात उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे लंडनला विमानतळावर असलेली धावपट्टी वितळल्याने विमाने दुसऱ्या विमानतळावर नेण्याची वेळ तेथील विमानतळ प्रशासनावर आली आहे . युनाटेड किंग्डम देशात रेल्वेसेवा बंद पडण्याची वेळ तेथील उष्णतेच्या लाटेमुळे आली आहे . मागच्या वर्षी फार मोठ्या प्रमाणात पावसाच्या सामना केल्यावर युरोप आता युरोपला उष्णतेच्या लाटेच्या सामना करावा लागत आहे  युरोपला भविष्यात या उष्णतेच्या लाटेमुळे कोरड्या दुष्कळाच्या सामना मोठ्या प्रमाणत सामना करावा लागण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञाकडून व्यक्त करण्यात येत आहे बदलत्या हवामानामुळे या बदलाचा सामना करू न शकल्यामुळे विविध प्राण्याच्या जाती या पृथ्वीवरून नाहिस्या होत आहे मंगळवार १९ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या या बाबतच्या अहवालावावरून गेल्या काही वर्षात या प्रकारच्या घटना वाढत आहे गेल्या पाच वर्षात जगात सर्वात जास्त जाती ऑस्टेलिया या देशात नष्ट झाल्या आहेत 

    आपल्या महाराष्ट्रात सुद्धा जून महिना बऱ्याच प्रमणात कोरडा गेल्यावर आत जुलै महिन्यात काहिस्या कमी वेळात मोठा पाऊस पडल्याने कमी दिवसाच्या पावसातच नद्यांना पूर आले आहेत . मागच्या वर्षी डिसेंबर आणि या वर्षी जानेवारीत सुद्धा मोठ्या प्रमाणत पाऊस पडला होता . तसेच एप्रिल आणि  मे महिन्यात आपण सुद्धा प्रचंड प्रमाणात तापमान अनुभवलेले होतेच  . काही दिवसापूर्वी अमेरिकेच्या दोन्ही किनाऱ्यावर हवामानाने उच्छाद मांडला होताच . ऑस्टेलिया या देहाच्या क्वीन्सलँड आणि न्यू साऊथ वेल्स या राज्यांच्या गव्हर्नरांनी त्यांच्या राज्यात  पडलेल्या पावसाबाबतचे विधान प्रसिद्ध आहेच गेल्या १ हज३र वर्षात आमच्याकडे अश्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नाही अशे विधान त्यांनी केले होते चीनच्या पूर्व भागातील अंडरग्राउंड मेट्रोमध्ये प्रवाश्याच्या गळ्यापर्यंत पाणी आल्याचे चित्र काही महिन्यापूर्वी सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाल्याचे आपणस आठवत असेलच .

  बदलत्या हवामानवर या क्षणालाच कृती नाहीतर कधीच नाही अशी करो या मरोची स्थिती उत्पन्न झाल्याचेच हे निदर्शक आहे गेल्या काही वर्षांपासून  दरवर्षी साधारतः डिसेंबर महिन्यात होंणाऱ्या कॉप  या नावाने प्रसिद्ध  असलेल्या कॉन्फरंस ऑफ पार्टीज या अधिवेशनात ठरणारे ठराव प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज या घटनांमधून वारंवार दिसत आहे या अधिवेशनात विकसित देश आणि विकाशीनशील देश यांच्यात कोणी किती जवाबदारी घेयची यावरून गेल्या काही वर्षात सातत्याने वाद होत आहेत विकसित देशांच्या मतेहवामान बदलाचे संकट समस्त मानवजातीपुढील संकट असल्याने  विकसित आणि विक्शनशील देशांनी सारखीच जवाबदारी घेयला हवी तर विकाशीनशील देशांच्या मते सध्या हवामानाचे संकट विकसित देशांमुळे  उत्पन्न झाले आहे  विकसित देशांनी स्वतःच्या विकास करताना पृथ्वीच्या केलेल्या नाशामुळे हे संकट निर्माण झाले आहे आम्हालाही विकसित

होण्याचा पूर्ण अधिकार आहे बदलत्या हवामानाचे निमित्य पुढे करत आम्ही आमचा विकास थांबवू शकत नाही सध्याच्या हवामानबदलास विकसित देश जवाबदार असल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणत जवाबदारी घ्यावी या मतभेदामुळे गेल्या काही वर्षात झालेल्या कॉपमध्ये काही निर्णय सुद्धा होऊ शकत नाहीये तर पूर्वीच्या कॉपच्या अधिवेशनामध्ये झालेल्या निर्णयाची अंमलबाजवणी सुद्धा योग्य रीतीने होत नाही या २०२२ च्या कॉप अधिवेशनामध्ये यात सकारात्मक बदल झाल्यास उत्तम नाहीतरी हवामान बदलाचे हे संकट अजून गंभीर झाल्यवाशिवाय राहणार नाही हे सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज नाही 

#ही-माझी_एक_हजार_पंचविसावी_ब्लॉगपोस्ट_आहे  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?