विश्वविजेतापदाची रंजकता लयास


कोणत्याही खेळाडूची आपण खेळत  असलेल्या खेळात विश्वविजेते होण्याचे स्वप्न असते . आपण खेळत असलेला खेळ ज्या व्यक्ती खेळतात त्या सर्वांना आपण हरवले याचा आनंदच काही और असतो . हा आनंद मिळवण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते खेळावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना देखील आपणास सर्ववोत्तम खेळ बघायला मिळावा अशी अपेक्षा असते . विश्वविजेता देखील अनेक चांगलया खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा अधिक चांगला खेळाचे प्रदर्शन करत त्यांच्यावर विजय मिळवत असल्याने खेळावर प्रेम करणाऱ्या खेळप्रेमींची ही अपेक्षा   एखादा खेळाडू विश्वविजेता होत असताना सहज पूर्ण होत असते . जगातील सर्व खेळामध्ये याच प्रक्रियेचा अवलंब करण्यात येतो . मात्र एका खेळासाठी मात्र किमान २०२२ या वर्षी तरी अपवाद करावा लागणार आहे . तो खेळ म्हणजे बुद्धिबळ 

 बुद्धिबळप्रेमींना या आनंदाला मुकावे लागण्याचे कारण गेल्या पाच वर्षांपासून विश्वविजेता असलेल्या मॅग्नस कार्लसन यांनी  यावर्षी  विशेवविजेते स्पर्धा ना खेळण्याचा घेतलेला निर्णय . गेल्या पाच वर्षांपासून विश्वविजेता असल्याने विश्वविजेता होण्याच्या प्रक्रियेचा कंटाळा आल्याने आपण विश्वविजेता होण्याची स्पर्धा खेळण्यास उच्छुक नसल्याचे स्पष्टीकरण मॅग्नस कार्लसन यांनी याबाबत दिले आहे . त्यामुळे विश्वविजेतापदाचा आव्हानवीर

ठरवण्यासाठी होणाऱ्या कॅन्डीडेट स्पर्धेतील विजेता आणि उपविजेत्या यांच्यात विश्वविजेता ठरवण्यासाठी स्पर्धा खेळवण्यात येऊन त्यांच्यातील विजेता विश्वविजेता म्हणून जाहीर करण्यात येईल असे बुद्धिबळाची अंतरराष्ट्रीय संघटना जी फिडे या नावाने प्रसिद्ध आहे त्या संघटनेमार्फत अर्थात  फेडरेशन ऑफ डीइचेस  तर्फे जाहीर करण्यात आले आहे 

जर मॅग्नस यांनी स्पर्धा  खेळण्याचा निर्णय घेतला असता तर मागच्या वर्षी ज्या खेळाडूने त्यांच्या विश्वविजेतापदाला आव्हान दिले होते तोच खेळाडू अर्थात माँन नोपाव्ह  यांच्यात ही लढत झाली असती. ज्यांना मागच्या वर्षीच्या विश्वविजेता पदाच्या लढती लक्षात असतील त्यांना हे सुद्धा आठवत असेल की या लढतीमध्ये विश्वविजेता ठरवण्यासाठी होंणाऱ्या आतापर्यतच्या लढतींमध्ये सर्वात जास्त चालीचा आणि सर्वात जास्त काळ चाललेला खेळ यावेळी खेळवण्यात आला होता . जो सात तास चालला होता या खेरीज या लढतींमध्ये झालेले सर्वच डाव आधीच्यापेक्षा ऊत्तम होते . दिवसोंदिवस या लढतीमधील खेळ बहरत होता मात्र या वेळी अशा बहरत जाणारा खेळ दिसू शकणार नाही कारण या लढती ज्या दोन खेळाडूंमध्ये झाल्या त्यातील एकाच यामध्ये सहभागात असणार नाही काही व्यक्ती म्हणू शकतील जरी मॅग्नस या वेळी खेळत नसला तरी काय झाले तितकाच ऊत्तम खेळ आपणस बघायला मिळू शकतो किंबहुना त्यापेक्षा उत्तम खेळ बघायला मिळण्याची शक्यता आहे त्यांना मी सांगू इच्छितो की . त्यांना मॅग्नस कार्लसन यांच्या खेळातील रंजकता ,प्रतिस्पर्ध्याकडून चुका होईल अशी स्थिती डावात जलद खेळीद्वारे उत्पन्न करत डाव जिंकन्याचे त्याच्या डावाचे वैशिष्ट यावेळी दिसणार नाही पाचवेळाविश्वविजेता असणाऱ्या खेळाडूच्या खेळातील वेगळेणा चाली रचण्यातील वैवध्य याला बुद्धिबळप्रेमी मुकणार हे मात्र  सध्या ज्या खेळात विश्वविजेता ठरवण्यासाठी स्पर्धा होणार आहे त्या खेळाडूंची खेळाची गुणवैशिष्टये वेगळी असतील (तशी या स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंचे काही गुणविशिष्टे असतात .किंबहुना त्यामुळेच ते या स्तरावर खेळू शकतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये ) त्यामुळे बुद्धिबळातील आतापर्यंत न खेळल्या गेल्या चाली बुद्धिबळपटूंना दिसू शकतील मात्र त्यावर मॅग्नस कार्लसन यांची नजर खिळवून ठेवणारी नजाकता नसेल 
काही मानसशात्रज्ञांच्या मते त्यांची मानसिकता काहीशी नकारत्मक आहे सतत यशाची चव चाखल्याने जर आता अपयशाची चव चाखायला मिळाली तर काय या काहिस्या नकारात्मक मानसिकतेतून त्यांनी हा निर्णय घेतला आहे जे खरे की खोटे ते मानसशात्रज्ञच जाणो मी,मात्र मॅग्नस कार्लसन यांच्या या निर्ययामुळे बुद्धिबळातील रंजकता काहीशी कमी झाली आहे हेच सत्य आहे  
#हि_माझी-एक_हजार_एकोणतिसावी_ब्लॉगपोस्ट_आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?