6वर्षापुर्वीची ती काळरात्र

         


   पावसाचे दिवस होते ते .  पावसाची अगदी मुसळधार बॅटिंग चालू होती . त्यामुळे सर्वच नदी नाल्यांना पूर आले होते . कोकणांत तर पाऊस आपले सर्वस्व ओतल्यासारखा पाऊस कोसळत होता . मात्र चाकरमाने याही पावसात आपले नित्य व्यवहार करतच होते . रहाटगाडगी कोणाला चुकलीये . या नित्यव्यवहाराच्या रहाटगाड्यासाठी तळकोकणातून म्हणजेच  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून माणसे मुबईच्या दिशेने निघाले होते . काही कारणाने रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने ती माणसे आपल्या एसटी बसच्या माध्यमातून प्रवास करत होती मुंबई गोवा या म्हणायला राष्ट्रीय महामार्ग  मात्र ज्याची अवस्था एखाद्या ग्रामपंचायतीच्या रस्त्यासारखीच आहे अश्या रस्त्यावरून प्रवास करत होती . पावसाची धुवाधार बॅटिंग सुरु असल्याने  समोरचे काही फारसे दिसत नव्हते जे थोडेफार दिसत होते त्यामध्ये सर्वत्र नुसते पाणी आणि पाणीच . गाडीने तळकोकण आणि उत्तर कोकण यांच्या सीमेपर्यंत प्रवास केला ही सीमा सावित्री नावाची नदी ठरवते समुद्राच्या दिशेने तोंड उभे करून राहिले तर उजव्या हाताला रायगड जिल्हा अर्थात उत्तर कोकण आणि डाव्या हाताला रत्नागिरी जिल्हा अर्थात तळकोकण अशी सीमा सावित्री नदी
निश्चित करते या कोकणची आडवी फाळणी करणाऱ्या नदीवर एक पूल आहे  त्या पुलापर्यंत आपली बस आली आणि अचानक दिसेनासी झाली पाठी मागून आलेल्या वाहनांना क्षणभर समजेना काय झाले ? आपले पुढील वाहन गेले तर कोठे?  सर्व वाहने हळूहळू जात असताना त्यांनी अचानक वेग का वाढवला ? ते थांबले  तर दिसत का नाहीये ? .ते थांबले   त्यांना सर्व प्रकार समजला आणि त्यांच्या त्यांच्या पायाखालची वाळूच घसरली . आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी झळकली .सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने झालेल्या अपघातात  २ एसटी बसेस , आणि काही कार वाहून गेल्या त्यातील बहुतेक सर्वच लोक मृत्यमुखी पडले  या अपघाताला सावित्री पूल दुर्घटना म्हणून आपण ओळखतो . या दुर्दवी घटनेंत प्राणास मुकलेल्या जीवाना भावपूर्ण श्रद्धांजली . यात आप्तेष्ट गमावलेल्या व्यक्तींच्या दुःखाप्रति मी संवेदना व्यक्त करतो . या दुर्घटने या वर्षी  ६ वर्ष पूर्ण झाली आहेत 

      २०१६ ऑगस्ट २ रोजी घडलेल्या या अपघातानंतर काही काळ देशभरातील पुलाच्या स्थिरतेच्या मुद्दा चर्चेत आला तत्कालीन केंद्रीय रस्ते बांधकाम आणि दळणवळणं मंत्री नितीन गडकरी यांनी जातीने लक्ष घालून आपल्या महाराष्ट्र आणि देशभरातील पुलाचे ऑडिट केले आणि काही अंशी आपले जगणे सुसह्य केले त्याबाबद्दल आपण भारतीय कायमच त्यांचे ऋणी राहू . मात्र आपल्याला ही जाग येण्यासाठी त्या अभागी व्यक्तींना आपल्या प्राणाचे मोल द्यावे लागले हे दुर्दैवच . कालांतराने या ठिकाणी नवा पूल बांधण्यात आला आज या नव्या पुलावरून वाहतूक सुरु आहे . मात्र ही दुर्घटना ज्या मुबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडली त्यांची स्थिती अजूनही ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यासारखीच आहे त्यात फार फरक पडलेला नाही रस्त्याच्या दुर्दक्षेमुळे देव न करो पण दुर्दैवाने काही दुर्घटना

झालीच तर मदत पोहोचण्यास अडचण येऊ शकते पाश्च्यात देशात महामार्गावर मुख्य रस्त्याच्या बाजूला खास जर काही दुर्घटना घडल्यास दुर्घटना घडल्यास पोहोचता यावे यासाठी खास रास्ता बांधला असतो आणि तो रस्ता फक्त आपत्तकालीच वापरला जातो आपल्याकडे येव्हड्या मोठ्या प्रमाणात नाही  किमान काही प्रमाणत तरी सोयीसुविधा तयार करणे आवश्यक आहे 

         आपल्या एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात म्हणून ओळखला जाणारा हा अपघात आपल्या महाराष्ट्रातील बळीची संख्या विचारत घेता सर्वात मोठ्या रस्ते अपघातात या अपघाताची नोंद घेते सुमारे १२५ लोक या अपघातात प्राणास मुकले ज्या दोन एसटी बसेस वाहून गेल्या त्यापैकी एका एसटी बसच्या चालकाच्या मुलगा या बस मधून प्रवास करत होता मुलाची मुबईतील शिक्षणाची ऍडमिशन आपल्या नजरेखालून व्हावी या हेतूने त्यातील एका एसटी बस चालकाने वरिष्ठांशी भांडूंन नेहिमीपेक्षा वेगळा अशा मुबईचा मार्ग मागून घेतला होता मुबईला पोहोचल्यावर दुसरी ड्युटी मिळण्याचा आधी जो वेळ मिळतो त्यावेळच्या मुलाची ऍडमिशन करण्याचे त्या एसटी चालकांचे स्वप्न होते जे अखेर स्वप्नच राहिले . एसटी डायव्हर आणि त्यांच्या मुलगा मुबईला पोहोचूच शकले अहित मुबईच्या वाटेवर असतानाच ते  पितापुत्र अनंताच्या वाटेवर निघून गेले . 

आपल्या सुदैवाने त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात  तरी अशी मोठी दुर्घटना घडली नाही सध्या पावसाचे दिवस असले तरी अशी दुर्घटना न घडो अशी ईश्वराकडे या दुर्घटनेच्या सहाव्या स्मुर्तीदिनी प्रार्थना ओम शांती शांती शांती :

#ही_माझी_एक_हजार_बत्तिसाव्वी _ब्लॉगपोस्ट_आहे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?