भारताच्या आसपासचे आर्थिक अरिष्टय

   


     आपल्या भारताभोवती असणाऱ्या  नउ देशांपैकी पाच देशांची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. सभोवतालच्या देशांची गंभीर आर्थिक स्थिती भारतासाठी सुद्धा फारसी सुखावणारी नाही. अफगाणिस्तान, पाकिस्तान नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका हे ते देश. यातील श्रीलंकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अत्यंत अवघड जवळपास अशक्यप्राय स्थितीत पोहोचल्याचे आपणास माहिती आहेच. तेथील माजी पंतप्रधान आणि विद्यमान राष्टपती रणिला विक्रमसिघे यांनी पंतप्रधान पदावर कार्यरत असताना तेथील संसदेत श्रीलंका दिवाळखोर झाल्याचे जाहिर सुद्धा केले होते.त्यामुळे श्रीलंका आणि अफगाणिस्तान मधील आर्थिक स्थिती चिंताजनक असली तरी पाकिस्तानने अनधिकृत ताब्यात ठेवलेल्या काश्मीरमुळे त्यांचा आर्थिक विपन्नतेचा भारतावर काहीसा कमी परीणाम होइल म्हणून अफगाणिस्तानचा देखील अपवाद केला तरी पाकिस्तान नेपाळ बांगलादेश मधील आर्थिक आरीष्ठ भारतापुढे मोठी डोकेदुखी ठरु शकते.

        पाकिस्तान नेपाळ, बांगलादेश हे देश परकीय चलनाचा कमी साठ्याचा समस्येशी झूंजत आहेत. देशातील परकीय चलनाचा साठा कमी होवू नये, म्हणून नेपाळने आवश्यक त्याच गोष्टींची आयात करण्याचे धोरण अमंलात आणले आहे. चैनीच्या गोष्टी  आयात करण्याबाबत तेथील नागरीकांवर प्रचंड बंधने लादण्यात आली आहेत. परकीय चलनाच्या साठा वाढवण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांकडे कर्ज देण्याची  मदतीची विनंती करण्याऐवजी, नेपाळने आहे तोच परकीय साठा काळजीपूर्वक वापरण्याचे धोरण अनुसरले आहे. पाकिस्तान  बांगलादेश या देशांनी आंतराष्ट्रीय नाणेनिधी आणि अन्य स्रोतांकडून परकीय चलनाची मदत घेण्यास सुरवात केली आहे .

पाकिस्तानचे शासनकर्ते त्यासाठी आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या  प्रतिनिधींशी बोलत आहेच तसेच युनाटेड अरब अमिरात ,सौदी अरेबिया , चीन या देशाच्या सरकारकडे मदतीची याचना केली आहे .  बांगलादेशच्या सरकारने  आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडे परकीय चलनाच्या कर्जाची मदत मागितली आहे  

       या सर्व देशांची भौगोलिक स्थिती बघता या सर्व देशांचा त्यांच्या प्रदेशातील  आकाराचा   लोकसंख्येचा आणि आर्थिक ताकदीचा विचार करता  सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत आहे . त्यामुळे तेथील आर्थिक अडचणीचा परिणाम फक्त त्या देशांवर न होता आपल्यावर देखील होणार आहे पाकिस्तानचा काहीसा अपवाद वगळता या अन्य सर्व देश भारताकडे महत्त्वाच्या मदतनीस देश म्हणून  बघतात . चीन या देशाना मदत करून स्वतःचा अजगरी विळख्यात ओढण्यास अत्यंत उच्छुक आहे . हे देश चीनच्या विळख्यात सापडणे भारताला कदापि परवडणारे नाही सबब या देशांची  आर्थिक स्थिती भारतासाठी देखील महत्त्त्वाची आहे  ते देश आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे जर या देशातील लोक विस्थापित झाल्यास त्यांना आश्रयासाठी भारताखेरीज अन्य सोईस्कर देश नाही बांगलादेशजी  आंतराष्ट्रीयसीमा   सीमा शेअर करतो त्यापैकी सुमारे ९५ % सीमा ही भारताबरोबर आहे बांगलादेश जी ५% सीमा शेअर करतो त्या म्यांमारची  आर्थिक ताकद बांगलादेशला कारण्याएव्हढी नाही किंबहुना तशी इच्छा देखील नाही परिणामी त्यांना भारताशिवाय दुसरा पर्याय नाही नेपाळचा विचार करता नेपाळ आणि चीन (खरेतर तिबेट )सीमा दळवणवळणाचा  विचार करता अत्यंत त्रासदायक आहे त्या तुलनेत नेपाळ ते भारत येथील सीमा प्रवाश्यासाठी अत्यंत सोपी आहे दोन्ही देशात प्राचीन काळापासून सांस्कृतिक संबंध आहे सध्या सुद्धा अनेक नेपाळी लोक लोक राहतात . त्यामुळे नेपाळची आर्थिक समस्या सुद्धा भारतासाठी महत्त्वाची ठरते  पाकिस्तान आर्थिक गर्तेतून बाहेर पाडण्यासाठी महागाईचा दर ३३ % असताना देखील सर्वसामान्यांनावर विविध कर लावत आहे या कराद्वारे सरकारी तिजोरी भरून इंधनाची आंतराष्ट्रीय  देणी देण्याचा प्रयत्न करत आहे 

श्रीलंका या देशात आर्थिक विपन्नेमुळे निर्माण झालेले राजकीय आंदोलन आणि त्यामुळे त्यांची ढासळली कायदेसुवस्था आपण सर्वांनी बघितलेली आहेच आता आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या देशांपैकी पाकिस्तानमध्ये श्रीलंकेचीपुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे बांगलादेश आणि नेपाळमध्ये तसे होण्याची शक्यता कमी आहे मात्र बदल होणारच आंही असे सांगता येणे अश्यक आहे , पाकिस्तानात अशांतता झाल्यास त्याचा परिमाण काश्मीरमधील शांततेवर  होणार हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही सबब या तिन्ही देशातीलअर्थव्यवस्थेची गाडी शांततेत रुळावर येण्यातच भारताचे हित आहे 
#ही_माझी_एक_हजार_तेहतिसावी_ब्लॉगपोस्ट_आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?