वंदन त्यांच्या हौतात्म्यला !


आपल्या
भारतात स्वातंत्र्यपुर्व काळातच नव्हे स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा अनेकांनी आपल्या  प्राणाचे मोल देऊन हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला ,भारताचे माजी   लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य हे अश्याच काही आदरणीय व्यक्तीपैकी. एक . आपल्या भारतातून पंजाब हे राज्य स्वतंत्र देश होण्यापासून त्यांनी वाचवले . माझी जमतारीख १० ऑगस्टही त्यांची हौताम्यची तारीख . अश्या महत्त्वाच्या दिवशीमाझा जन्म झाल्याबद्दलमी देवाचे कायमच कृतज्ञ राहील .  
        जनरल अरुणकुमारवैद्य यांचे योगदान प्रामुख्याने ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहमीतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे करण्यात येत असले तरी त्यांचे भारतासाठीचे योगदान या पेक्षा फार मोठे होते त्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी दोलताबाद आणि परभणी क्षेत्रात निझामाच्या जुलमी रझाकराना गुढघे टेकायला भागपडले . अरुणकुमार वैद्यांच्या लष्करी कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९६५  चं भारत-पाकिस्तान युद्ध.पंजाबमधल्या खेमकरण,असल उत्तर, चीमाया प्रांतात भारतीयआणि पाकिस्तानी सैन्यात तुंबळ लढाई झाली.डेक्कन हॉर्स रेजिमेंट या लढाईत कार्यरत होती आणि त्यांचे कमांडिंग ऑफिसर होते लेफ्टनंट कर्नल पदावर असलेलेअरुणकुमार वैद्य. पाकिस्तानी सैन्याचे अमेरिकन बनावटीचे पॅटन रणगाडे आग ओकत होते.त्या रणगाड्यांना जायबंदी करून भारतीय लष्कराने निर्णायक विजय मिळवला.  लेफ्ट. वैद्य यांनाही याच लढाईत 'महावीरचक्र' हा दुसरा सर्वोच्च लष्करी पुरस्कार दिला गेला. या लढाईतसुमारे १००  पाकिस्तानी रणगाडे
उद्ध्वस्तकेले गेले तर40 पेक्षा अधिक ताब्यात घेण्यात आले.त्या नंतर जेमेतेम सहा वर्षांनी १९७१   साली त्यांना शत्रूला आपले शॉर्याचे पाणी पाजण्याची संधी मिळाली . यावेळीमुख्य लक्ष पूर्व पाकिस्तानवर(आताच बांगलादेश)  असलं तरी पश्चिमसीमाही पूर्णतः शांत नव्हतीच.जम्मूपासून अगदी जवळ असलेल्या शकरगढ सेक्टरमध्ये बसंतरच्यालढाईत भारतीय आणिपाकिस्तानी सैन्यात तीव्र सामनाझाला.ही लढाई सुद्धा रणगाड्यांसाठी गाजली. एव्हाना ब्रिगेडियरपदी पोहोचलेले अरुणकुमार वैद्य या युद्धातही होते. पाकिस्तानी सैन्याकडून होणारा मारा चुकवत आपल्या रणगाड्यांना पुढे सरकवण्याचंकाम त्यांनी मोठ्या कौशल्याने केलं.या सगळ्या भागात रणगाडे उद्ध्वस्तकरणारे भू-सुरूंगलावलेले होते त्यांनाचुकवत वैद्यांनी हीकामगिरी केली. या लढाईत62 पाकिस्तानी रणगाडे उद्ध्वस्त केलेगेले. या कामगिरीसाठीब्रिगेडियर वैद्य यांना दुसऱ्यांदा महावीर चक्र प्रदानकेलं गेलं ज्यालासैन्याच्या परिभाषेत 'Bar to Maha Vir Chakra' असं म्हटलं जातं. या प्रकारे विविध ठिकाणी आपले शौर्य दाखवत विविधपदोन्नती मिळवत १९८३ साली अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या तुलनेत कमी सेवा असून देखील शौर्याच्या आधारे त्यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली
  ऑगस्ट 1983 मध्ये जनरल वैद्य यांनी लष्कराची सूत्रं हाती घेतली तेव्हा पंजाब धुमसत होता. खलिस्तानवाद्यांचं6 जून १९८४  ला सुवर्ण मंदिराला आपला तळ बनवलेले धार्मिक नेता  भिंद्रनवाले आणि त्यांचे सशस्त्र अनुयायी विरुद्ध भारतीय लष्कर यांच्यात निकराचा सामना झाला. प्रस्थ वाढत चाललं होतं.या सगळ्याला पायबंद घालण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लष्करी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला.शीखांसाठी पवित्र अशा सुवर्ण मंदिर आणि अकाल तख्तमध्ये घुसून सैन्याला कारवाई करावी लागली, अकाल तख्तचं नुकसान झालं,
पण अखेर भिंद्रनवालेंसह त्यांच्या अनुयायांचा पाडाव झाला आणि खलिस्तानी चळवळीच्या नेतृत्वालाच सैन्याने खिंडार पाडलं. भिंद्रनवाले मारला गेला  तरी त्या चे अनुयायी संपले नव्हते. त्याला  मानणारा आणि भारतापासून वेगळं होऊन शिखांचं स्वतंत्र राष्ट्र मागणारा मोठा वर्ग पंजाबात आणि सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारासबाहेरही होता त्यापैकी एक होता सुखविंदरसिंग महिन्याभर्फरात  सुखा आणि दुसरा होता त्याचा सहकारी जिंदा ज्यांनी पुणे कॅम्प परिसरात १० ऑगस्ट १९८६ ला सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर गोळी झाडत त्यांची हत्या केली  सुखवानंदसिंगला एक महिन्यांनी  पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून तर जुगाला दिल्लीतून अटक केली दोघांनी कोर्टात आपण जनरल वैद्य यांना मारल्याचं कबूल केलं, पण तो गुन्हा होता असं मानायला दोघे तयार नव्हते. कारण सुवर्ण मंदिरातली कारवाई हा शीख धर्माचा अपमान होता आणि तो करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवला अशी त्यांची धारणा होती या दोघा मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा दिली गेली मात्र भारताच्या लष्कराचे एका कठीण काळात नेर्तृत्व करणारे जनरल अरुणकुमार वैद्य मात्र प्राणास मुकले आज त्यांच्या हौताम्यस ३६ वर्षांच्या कालावधी उलटून गेला आहे पंजाबमधील खलिस्तान आंदोलने पूर्णतः नाही मात्र ९८ ते ९९ % संपुष्टात आले आहे मधून मधून त्याचा उल्लेख करण्यात येतो मात्र त्या काळात खलिस्तान आंदोलन जितके तीव्र होते तितके गंभीर आता कधी होणार नाही आणि याचे श्रेय पूर्णतः जनरल अरुणकुमार वैद्य  यांच्याकडे जाते हे नाकारण्यात काही अर्थ नाही त्यांनी आपल्या प्राणाचे मोल देत देशाची अखंडता कायम राहिली देश त्यांच्या याबाबत कायमच कृतज्ञ राहील हे खरे

#ही_माझी_एक_हजार_पस्तिसावी_ब्लॉगपोस्ट_आहे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?