पाकिस्तानातील राजकारणाचे बदलते रंग

       

 सध्या पाकिस्तानात राजकारण एका वेगळ्याच स्थितीवर पोहोचले आहे पाकिस्तानच्या स्वतंत्रदिनाच्या एक दिवस आधी अर्थात १३ ऑगस्ट रोजी पाकिस्तनचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीके इन्साफ या प्रमुख विरोधी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांनी एका दिवसाच्या आंदोलनांची हाक गेल्या आठवड्यात दिली  त्यावरून पाकिस्तानच्या सत्ताधिकाऱ्यांकडून विविध आरोप केले जात असताना ९ ऑगस्टरोजी  इम्रान खान यांचे सचिव आणि पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे महत्त्वाचे नेते शाहबाझ गिल यांना  इस्लामाबाद पोलिसांनी मोठ्या नाट्यानंतर अटक केली . पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाच्या एका नेत्याच्या ट्विटरमुळे जगाला ही बातमी समजली या  अटकेनंतर ते कुठे आहेत ? या बाबत विविध दावे करण्यात येत आहे .  शहाबाझ गिल यांची अटक करताना  नंबर प्लेट नसलेली गाडी त्यांच्या गाडीला आडवी आली . या गाडीतील लोकांनी तुम्ही आमच्या गाडीचा आरसा का फोडला ? अशी विचारणा करत त्यांना आणि त्यांच्या डायव्हरला मारण्यास सुरवात केली आणि त्यांना फरपटत नेत त्यांना स्वतःच्या गाडीत बसवले असे वृत्त जंगने दिले आहे . हे कमी की काय म्हणून , पाकिस्तानच्या
सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधात बाजू घेणाऱ्या आणि पाकिस्तानात बऱ्यापैकी लोकप्रिय असणाऱ्या ए आर वाय न्यूज या खासगी वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण अचानक पाकिस्तानात थाबवण्यात आले ,यासाठी इस्लामाबाद येथील पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या एका एफ आय आर च्या आधार घेण्यात आला आहे .ज्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाकडून  एफ आय आर मध्ये फक्त एका खासगी वृत्तवाहिनीकडून असा उल्लेख असताना  ए आर वाय न्यूजचा उल्लेख नसताना करण्यात आलेल्या कार्यवाहीमुळे पाकिस्तानात लोकशाही संपल्याच्या आणि हुकूमशाही सुरु झाल्यसारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे  या सर्व घडामोडींवर हा लेख लिहण्यापर्यंत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही 
       सध्या पाकिस्तानात सत्ताधिकारी पाकिस्तान डेमोक्रेटिक मुव्हमेंट या १७ पक्षाच्या आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष पाकिस्तान तेहरीके इन्साफ यांच्यात प्रचंड संघर्ष निर्माण झाला आहे . ज्यामध्ये सत्ताधिकारी पक्षातर्फे विविध कायदेशीर तरतुदीचा आधार घेत इम्रान खान यांना राजकारणातून पूर्णतः बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत या प्रयत्नांविरुद्ध इम्रान खान  सर्वोतपरी लढत आहेत . त्यांना पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनतेच्या पूर्ण पाठिंबा आहे त्यांची प्रमुख मागणी तेथील नॅशनल ऍसबेली (आपल्या लोकसभा समकक्ष )  विसर्जित करून नव्या निवडणुका घेण्याची आहे त्यासाठी त्यांच्या पक्षच्या खासदारानी राजिनामा देखील दिला आहे मात्र नॅशनल ऍसबेलीच्या अध्यक्षांनी ते सर्व एकाच वेळी मंजूर करण्याच्या ऐवजी टप्याटप्याने मंजूर करत सर्व ठिकाणी एकाचवेळी 
निवडणुका घेण्याची वेळ येणार नाही परिणामी पाकिस्तानी तेहरीके इन्साफ या त्यांच्या आपल्या राज्यसभा समकक्ष असणाऱ्या सिनेटमध्ये बहुमतात येणार नाही ही खेळी केली आहे . त्याच्याच एक भाग म्हणून ९ ऑगस्टच्या घडामोडी बघाव्या लागतील 
             सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे त्यात या राजकीय अस्थिरतेमुळे अजूनच भर पडत आहे यामुळे तेथील सर्वसामान्य जनतेच्या त्रासात भरच पडत आहे . या त्रासामुळे तेथील धार्मिकतेत वाढ होण्याचा दाट संशय आहे ज्याचा फटका तेथिल मुस्लिम बांधवातील शिया आणि अहमिदीया या अल्पसंख्यकांसह अन्य गैरमुस्लिम अल्पसंख्यक जनतेस मोठ्या प्रमाणत बसू शकतो साध्याच हे  समाजबांधव अत्यंत त्रासात जीवन काढत आहे त्यांच्या त्रासात अजून वाढ होणे भारतातला देखील हितावह नाही त्यामुळे हे संकट शांततेत संपण्यातच भारताचे हित आहे 
ही_माझी_एक_हजार_अडोतीसवी _ब्लॉगपोस्ट_आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?