मानवाची उलटी गणना सुरु

       

मानवाची उलटी गणना तर  सुरु झाली नाहीना ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घटना सध्या पृथ्वीवर घडत आहेत .युरोप खंडाच्या सुमारे ६३% भूभागावर येत्या नजीकच्या काळात मोठा दुष्काळ पडण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे . आज हा मजकूर लिहीत असताना (ऑगस्ट २०२२) सुमारे ६० % भूभागावर आताच कमी पाऊस झाला आहे . ड्रोन आणि विमानांनी टिपलेल्या छायाचित्रात युरोपातील अनेक महत्त्वाच्या नद्या मोठ्या प्रमाणत आटलेल्या दिसत आहे . युरोप खंडातील अनेक देशात गेल्या कित्येक दशकातील  सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे युरोप खंड तसा थंड तापमानाचा प्रदेश ओळखला जातो जिथले उन्हाळ्यातील सर्वसाधारण कमाल तापमान २२ ते २८ अंश सेल्सियस दरम्यान असते मात्र या वर्षी स्पेन युनाटेड किंग्डम फ्रांस स्पेन  या देशात ४० अंश सेल्सियस पेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहेत . या वाढत्या तापमानमुळे फ्रांस या देशात मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहे ज्यामुळे वातवरणात मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्सिएड हा वायू सोडला जात आहे ज्यामुळे तापमान वाढण्यास हातभरातच लागत आहे  
युरोपातील नद्या तेथील तेथील अर्थव्यवस्थेत  मोठे योगदान देतात . खंडार्गत वाहतुकीचा विचार करता युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात जलवाहतूक नद्यांमधून होते तसेच युरोपमध्ये अनेक छोटे छोटे व्यवसाय हे नद्यांवर आधारीत आहे नद्या कोरड्या पडल्याने या सर्व व्यवस्याची चक्रे थांबलेली आहेत 
     वरील वर्णन युरोप खंडाचे आहे आपल्या भारतात त्या विषयी चिंता का करावी ? त्यांचे ते बघतील असे  समजणे चुकीचे आहे.  खंड देश या मानवनिर्मित बाबी आहेत निसर्गासाठी या बाबी नाहीत . त्यामुळे भारतासह सर्व जगभरातील हवामान एकमेकांशी जोडलेले आहे आपल्या मांसुमवार परिणाम करणाऱ्या आणि सुप्रसिद्ध असलेल्या अल  निनो आणि ला नीना या समुद्र प्रवाहाचे पृथ्वीगोलवरील स्थान आणि भारताचे पृथ्वीगोलवरील स्थान आपण बघितले असता आपणास एक गोष्ट लक्षात येते कि पूर्णतः नाही मात्र बऱ्यापैकी या गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहेत मात्र तरीदेखील हे समुद्रप्रवाह आपल्या भारतातच्या पावसावर परिणाम करतात . आपल्याकडे प्रामुख्याने  उत्तर भारतात फेब्रुवारी मार्च महिन्यात अनेकदा पाऊस पडतो (आता तो महाराष्ट्रात देखील पडायला सुरवात झाली आहे ) त्यामागे कारणीभूत असलेला घटक म्हणजे या काळात आल्प्स पर्वतावरून वातावरणाच्या भूपृष्ठपासून काही अंतरावरून पूर्वेकडे वाहणारे बाष्पयुक्त वारे ज्याला वेस्टर्न डिस्टंबन्स (हिंदीत पश्चिमी विक्षोप )
म्हणतात आल्प्स पर्वत हा युरोप खंडात आहे ही गोष्ट लक्षात घेता सध्या जगभरात लहरी हवामान आपले जे रंग दाखवत आहे ते बघता याही घडामोडी आपणासाठी अत्यंत महतवाच्या ठरतात त्यांना युरोपच्या घटना आहेत त्यांचं ते बघून घेतील अशे म्हणता येऊ शकत नाही 
या हवामानबदलाच्या अभ्यास करून आपल्याकडील संभाव्य हवामान कसे असू शकते ? याचा अंदाज करत आपण या बदलला सामोरे जाण्याचे नियोजन केले पाहिजे, आणि हे नियोजन फक्त सरकारी पातळीवर असून कामाचे नाही तर यामध्ये सर्वसामान्य लोकांचा देखील सहभाग आवश्यक आहे तर आणि तरच आपण या हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जाऊ शकतो हे निर्विवाद सत्य आहे 
#हि_एक_हजार_एकोणचाळिसावी_ब्लॉगपोस्ट_आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?