भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भारताचे बुद्धिबळातील अमृत यश

   


     सध्या सर्वत्र भारताच्या स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्याने भारताच्या विविध क्षेत्रातील कार्यक्षेत्राचा आढावा घेण्यात येत आहे . सर्वत्र देशभक्तीचे वातावरण आहे . या भरलेल्या वातावरणात बुद्धिबळ क्षेत्रातून एक अत्यंत आनंदाची बातमी येत आहे भारताच्या स्वातंत्र्यच्या ७५ व्या वर्षात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारताला ७५ वा  ग्रँडमास्टर  मिळाल्याची ती आनंदवार्ता आहे  भारताला विश्वनाथन आनंद यांच्या रूपाने १९८६ साली भारताला पहिला ग्रँडमास्टर मिळाला त्यानंतर गेल्या ३६ वर्षात ही सातत्याने वाढतच गेली आणि आजमितीस ही संख्या ७५वर पोहोचली आहे . गेल्या काही वर्षात भारतात  सातत्याने ठराविक काळाने ग्रँडमास्टर होत आहेत जे फ़क्त बुद्धिबळ विश्वासाठीच नाही तर समस्त भारतीय क्रीडाविशावासाठी आनंदाची गोष्ट आहे .त्यातही भारताच्या स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवाच्या काळात भारतात  ७५ वा ग्रँडमास्टर टायर होणे भारतासाठी आनंदाची गोष्ट आहे 

     भारताच्या ७५व्या ग्रँडमास्टरचे नाव आहे प्रणव व्यंकटेश . चेन्नईस्थित प्रणवने रोमानियातील बाया मारे येथे लिम्पेडिया ओपन जिंकून तिसरा आणि अंतिम जीएम नॉर्म मिळवून ग्रँडमास्टर विजेतेपद मिळवले. नऊ फेऱ्यांमधून ७  गुणांसह त्याने जीएम नॉर्म आवश्यकता पूर्ण करण्यासाठी स्पर्धा पूर्ण केली.”  १५ वर्षीय  प्रणव व्यंकटेश यांनी २०२१ मध्ये सर्बिया ओपनमध्ये पहिला आणि जूनमध्ये बुडापेस्ट, हंगेरी येथे व्हेझरकेपझो जीएम राऊंड-रॉबिन स्पर्धेत दुसरा ग्रँडमास्टर  नॉर्म मिळवला होता. .वेलमल  स्कुल या शाळेत शिकत असलेल्या प्रणव व्यंकटेश  यांनी

या आधी तीनदा राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली आहे तसेच सन २०२१ मधील जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती 

     प्रणव व्यंकटेश हे भारताचे ७५ वे तर तामिळनाडू राज्यातील २७ वे ग्रँडमास्टर आहेत भारतात सर्वाधिक ग्रँडमास्टर तामिळनाडू राज्यातील आहेत तर १० ग्रँडमास्तरसह महाराष्ट्र दुसऱ्या तर ९ ग्रँडमास्तरसह पश्चिम बंगाल तिसऱ्या स्थानी आहेत पूर्वांचलातील आठही राज्य आणि हिमाचल प्रदेश , उत्तराखंड उत्तरप्रदेश , बिहार झारखंड छत्तीसगढ मध्यप्रदेश या राज्यात एकही ग्रँडमास्टर नाही तामिळनाडू राज्यातील ग्रँडमास्टरची संख्या बघता त्यास त्यास ग्रँडमास्टरची भूमी असे म्हटल्यास वावगे ठरू नये या ग्रँडमास्टरच्या भूमीतील प्रणव व्यंकटेश यांच्या या यशामुळे भारताची मान  उंचावली गेली आहे आणि तेही भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात हा दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा या दुग्धशर्करा योगआपणस नेहमीच अनुभवायास मिळून लवकरात लवकर ग्रँडमास्टरचे शतक पूर्ण होणे या सारखा आनंद भारतीय क्रीडा क्षेत्राला नसेल हेच खरे 

#ही_माझी_एक_हजार_एकेचाळिसावी_ब्लॉगपोस्ट_आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?