विलीनीकरण

   

एसटी बसमध्ये 75 वर्षावरील प्रवाश्यांना मोफत प्रवास्याची घोषणा  झाल्यानंतर, एसटीबाबतच्या विविध बाबीविषयी पुन्हा एकदा चर्चेला सुरवात झाली. ज्यामध्ये एकेकाळी मोठ्या प्रमाणात राजकारणाचा मुद्दा झालेला एसटीचे  सरकारमध्ये पूर्णतः विलीनीकरण करण्याचा मुद्दा देखील होता 
     विद्यमान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी एसटीच्या ऐताहासिक संपाच्या वेळी ,आम्ही सत्तेत आल्यानंतर तात्काळ विनाविलंब एसटीचे सरकार मध्ये पुर्णतः विलीनीकरण करु , असे आश्वासन दिले होते. महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्याचा प्रश्नाबाबत पुर्णतः असंवेदनशील असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत होता. आता सरकार स्थापून  दिड महिना झाला आहे. पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरु झाले आहे, या अधिवेशनात एसटीच्या विलिनीकरणाबाबत सरकार काय भुमिका घेते?याकडे एसटी कर्मचारी डोळे लावून बघत आहे. 
        त्यावेळचे अर्थमंत्री अजित पवार यांनी एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण कोणत्याच स्थितीत शक्य नसल्याचे वारंवार सांगून देखील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार तयार नसल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत होता. आता तत्कालीन विरोधी पक्ष भाजपाकडे   अर्थखात्यासह महत्तवाची खाती आहेत , त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न सोडवला जातो का?  याकडे समस्त एसटी कर्मचारी वर्गाचे लक्ष लागलेले आहे. 
         एसटीच्या संपामुळे राज्यात निवडणूका झाल्यास सत्ताधिकारी पक्षाला निवडणूकीत दणदणीत पराभव स्विकारावा लागू शकण्याची शक्यता निर्माण झाली होती. एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण शक्य असल्याचे, मात्र सत्तेतील राजकारणी व्यक्तींच्या  खासगी वाहतूक व्यवसायावर गदा येवू नये, यासाठी सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे त्यावेळी बोलले जात असे. आंध्र प्रदेश तेलंगणा आदी राज्याचे उदाहरण देत एसटीचे विलीनीकरण शक्य असल्याचे आणि राज्य सरकारचा विलीनीकरण कदापि शक्य नसल्याचे चुकीचे असल्याचे त्यावेळी वारंवार त्यावेळच्या विरोधी पक्षाकडून अर्थात भाजपकडून सांगण्यात येत होते आज भाजपाची सत्ता असल्याने विरोधी पक्षात असताना त्यावेळच्या सत्ताधिकारी पक्षाला न जमलेले एसटीचे सरकारमध्ये पूर्णतः विलीनीकरण करणे  भाजपाला सहजशक्य आहे जर एसटीचे सरकारमध्ये पूर्णतः विलीनीकरण झाल्यास एसटी कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलूंबून असणाऱ्या व्यक्ती तसेच माझ्यासारखे एसटी प्रेमी भाजपचे कायमचे ऋणी राहतील हे सूर्य पप्रकाशाइतके स्वच्छ आहे 
   तेव्हाचा प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजपा आता सत्तेत आहे.मात्र अद्याप कोणत्याही भाजपा नेत्यांनी एसटी विलीनीकरणाबाबत चकार शद्ब काढलेला नाहीये.तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांंचा कल्याणाबाबत भरभरुन बोलणारे
भाजपा नेते आता बोलत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आज नाही तर उद्या आपल्याला मिळतील अस्या आशेवर एसटी कर्मचारी रोज जगत आहेत. त्यांचा भ्रमनिरास करणे भाजपाला परवडणारे नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा वापर करत त्यावेळच्या सत्ताधिकारी पक्षावर सोडलेले बुमरँग वेगाने भाजपावरच  उलटले तर ?होणारी भाजपाची स्थिती बघण्यासारखी असेल हे नक्की.
#ही_माझी_एक_हजार_बेचाळिसावी_ब्लॉगपोस्ट_आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?