पर्यावरणपुरक गणपती उत्सव


   निसर्गावर, पर्यावरणावर मानवाने केलेल्या   अत्याचाराची किंमत मानवाने दामदुप्पट सहन करून भोगलेली आहे हे आपण नेहमीच बघितले आहे या चुकांमधून शहाणे होत मानवाने प्रामुख्याने आपल्या आनंदासाठी साजरे करण्यात येणारे सण उत्सवावासाठी पर्यावरणाचा विचार करत आपल्या वर्तणुकीत सुद्धा बदल केल्याचे आपणस दिसते . पूर्वी गणेशोत्सवासाठी सहज दिसणाऱ्या  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्तींची निर्मिती हा अश्याच एक पर्यावरणपूरक बदल मात्र आपल्या महाराष्ट्राच्या पर्यावरणाच्या विचार करता शाडूची माती देखील पूर्णतः पर्यावरणपूरक नाही . शाडूची माती प्रामुख्याने राजस्थान या राज्यात आढळते .तेथील जैविक साखळी या मातीला पूरक आहे मात्र आपल्या महाराष्ट्रातील जैविक साखळी राजस्थानपेक्षा पूर्णतः वेगळी आहे आपल्या महाराष्ट्रातील हवामान सुद्धा राजस्थानपेक्षा वेगळे आहे त्यामुळे होत काय ? तर शाडू माती आपल्या महाराष्ट्रात आढळत नाही आपल्याकडील वनस्पती या मातीत ती माती असली तरी उगवू शकत नाही . आपल्याकडील उंदीर घुशी सारखे जमिनीत बिले करून राहणारे जीव या मातीत जिवंत राहू शकत नाही  नदीपात्राचा विचार करता या शाडूच्या मातीमुळे नदीपात्राच्या तळाशी प्रचंड प्रमाणत गाळसाठत आहे त्यामुले नदीपात्र  उथळ होत आहे ज्यामुळे थोडेसा पाऊस पडला तरी मोठा पूर येतो तसेच पोहताना नदीपात्र धोकादायक होते या गाळात फसल्याने काही व्यक्तीच्या मृत्यू होण्याच्या घटना घडलेल्या आहेत . काँग्रेस गवत किंवा निलगिरी सारख्या परदेशी वनस्पती जस्यां  आपल्याकडील जमीन व्यापतात त्याला कोणी गुरे खात नाहीत त्यांच्यापासून इतर कोणतेही उत्पादन मिळत नाही मात्र वाढतांना या वनस्पती जसे आपल्या जमिनीतील पाणी आणि इतर जीवनवश्यक मूलद्रव्ये मात्र शोषून घेतात अगदी त्याच प्रमाणे शाडू माती आपल्या महाराष्ट्रात कार्य करते . प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात सहज विरघळत नाही त्यामुळे त्याच्या मूर्ती पाण्यात टाकल्यावर वेडेवाकड्या तुटतात आणि विद्रुप होतात या उलट शाडू माती ही माती पाण्यात विरघळत असल्याने मूर्तीचे विद्रुपीकरण होत
नाही हाच काय तो दिलासा . मग खऱ्या अर्थाने पर्यवर्णपूरक गणेशोत्वव कोणता ? तर आपण ज्या भूभागात राहतो त्या भूभागात सहजतेने आढळणाऱ्या मातीपासून गणपती मूर्ती तयार करणे आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास काळ्या मातीपासून तयार केलेल्या मूर्ती म्हणजेच पूर्णतः पर्यावरणपूरक गणपतीमूर्ती 

आपल्या नाशिकमध्ये हाच विचार लक्षात घेऊन एक व्यक्ती गेल्या कित्येक वर्षांपासून काळ्या मातीपासून गणपतीमूर्ती तयार करून पूर्णतः पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करत आहे व्यवसायाने समुपदेशक असलेले नाशिकरोडचे रहिवाशी अमोल कुलकर्णी हे त्या अवलियाचे नाव . विविध प्रयोग आपले उत्पादन  अधिकाधिक ग्राहकहितोशी करण्यासाठी अमोल कुलकर्णी नेहमीच प्रयत्नशील असतात याचाच एक भाग म्हणून या २०२२ वर्षी मूर्तीचे वजन कमी करावे ज्यायोगे गणेशमूर्ती हाताळल्यास सुलभता येईल या उद्देशायाने मूर्ती तयार करताना त्यांनी मातीची विविध वनस्पतीची पाने तसेच काही गौ उत्पादने मिसळली आहेत . त्यामुळे मूर्तीचे वजन खूप मोठ्या प्रमाणत कमी झाले आहे मोठी मूर्ती जी हलवायला ताकदवान व्यक्तीची गरज लागेल असे त्या मूर्तीकडे बघून वाटेल अस्या मूर्ती  मूर्ती एखादा पोरसवदा लहान वयाची व्यक्ती देखील त्या  सहजतेने उचलू शकतील अश्या झालेल्या आहेत अमोल कुलकर्णी यांचे पर्यावरण प्रेम फक्त यापुरतेच सीमित नाहीये बरका १ त्यांनी या मूर्तीत विवध वनस्पतीची बीजे देखील मातीत मिसळली आहेत ज्यामुळे जर आपण एखाद्या कुंडीत त्याचे विसर्जन केले तर काही दिवसांनी त्यामध्ये आपणास त्या कुंडीत  छानसे रोपटे उगवतना आपणास दिसते . घराण्याच्या परंपरेनुसार दीड  दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत आपण भक्तिभावाने गणपतीची पूजा करतो त्याच्या स्वागतासाठी उकडीचे मोदक खिरापत आदी पदार्थ तयार करतो त्यासाठी गणेशोत्सवाच्या आधी कितीतरी आधीच तयारी करतो त्यासाठी प्रसंगी पदरमोड करत छानशी आकर्षक सजावट करतो त्याचे सोशल मीडियातून विविध फोटो शेअर करतो ज्या

गणपतीचे विसर्जन केल्यावर अनेकांना घरात रितेपणा आल्यासारखे वाटते त्या गणपतीची आठवण रोपट्याचा रूपात राहणे यासारखे स्वर्गसुख ते दुसरे ते काय ? या रोपट्यामुळे निसर्गावर होणारा सकारात्मक प्रतिसाद उत्तमच 

सध्या भारताच्या स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवामुळे अत्यंत भारलेले वातावरण आहेहे स्वातंत्र्यमिळवण्याची आपण केलेल्या संघर्षाची सुरवात वेदांकडे चला (go  to  vedas ) या चळवळीतून झाली होती या चळवळीतून भारतीय स्वतंत्र्य चळवळीचा पाय घातला गेला सध्याचे पर्यावरण बघता आपणसनिसर्गाकडे चला (go  to nature ) ही मोहीम राबवण्याची गरज आहे अमोअमोल कुलकर्णी ७५ल कुलकर्णी यांची हि मूर्तीची चळवळ या मोहिमेची सुरवात म्हणता येईल मग तुम्ही होणार या चळवळीचा भाग 
(जर आपणस हे गणपती हवे असल्यास अमोल कुलकर्णी ७५८८१३७१३ , प्रशांत बेलगावकर ९८८१९०७६५७ यांच्याशी सपंर्क साधावा )
#ही_माझी_एक_हजार_ चवरेविचाळिसावी _ब्लॉगपोस्ट_आहे  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?