हे बदल आपल्या एसटीत कधी होणार?

   

आपली महाराष्ट्राची एसटी आधीच विविध सोइसवलतीने डबघाईस आलेली असताना, एकनाथ शिंदे यांच्या नेर्तुत्वाखालील मंत्रीमंडळाने तीला 75 वर्षावरील व्यक्तींना पुर्णतः मोफत प्रवास करण्याचा घोषणेने आणखी एका सोईसवलतीचा भार देवून टाकला. एकीकडे आपल्या एसटीचे सवलतीचे ओझे वाढत असताना, आपल्या शेजारील गुजरात राज्यातील एसटीने एक मैलाचा दगड गाठला गेला.  देशभरातील एल .एन. जी.वर चालणारी पहिली एसटी बस चालवण्याचा मान, गुजरात राज्य परीवहन महामंडळाला मिळाला आहे. 
    गुजरात एसटीच्या विश्वामित्र या विभागातर्फे (बडोदा जिल्हा विभाग) नुकतेच याच्याशी संबधीत बसची प्रादेशिक वाहतूक विभागाकडे नोंदणी करण्यात आली. मुळच्या डिझेल बसमध्ये बदल करत, तीला एल. .एन.जी. इंधनावर चालवण्यासाठी सक्षम करण्यात आले आहे. एल. एन.जी या इंधनामुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.
         एकेकाळी देशात नवनवीन उपक्रम राबवण्याबाबत महाराष्ट्र एसटी अनभिषक्त सम्राट होती. देशात पहिली गोष्ट करायची ती महाराष्ट्र एसटीनेच .महाराष्ट्र एसटीची काँपी नंतर राज्यातील एसटीने करायची, हा सर्वमान्य नियम होता. केंद्रातील सार्वजनिक वाहतूक विभाग देशातील राज्य परीवहन महामंडळाला आपल्या महाराष्ट्र एसटीचे
उदाहरण देत असे. जर महाराष्ट्र एसटीला ही गोष्ट जमते तर तूम्हाला ही गोष्ट का जमत नाही?असी विचारणा देशातील सार्वजनिक वाहतूक विभाग इतर राज्यातील एसटीला करत असे.
    आता मात्र हा इतिहास झाला आहे.गोवा सारखे छोटे राज्य देखील महाराष्ट्राच्या पुढे गेले आहे. महाराष्ट्रापेक्षा आधी गोव्याचा एसटीत इलेक्ट्रॉनिक बसेस धावायला लागल्या.देशाला आरामदायी प्रवाश्याची सवय लावणाऱ्या आपल्या महाराष्ट्र एसटीत सध्या जेमतेम बि एस 8 प्रकारच्या व्होल्वो बसेस वापरल्या जात असताना ,तेलंगणा अणि आंध्रप्रदेश राज्यांचा एसटीत अधिक अत्याधुनिक अस्या बि एस 13 प्रकारच्या बसेस वापरल्या जात आहे.(त्यांचा गरुडा प्लस आणि अमरावती या प्रकारच्या बसेस) मध्यप्रदेश सारख्या राज्याचे देखील आपल्या महाराष्ट्रात नागपूरला मोठी कार्यशाळा आहे. {काही वर्षापुर्वीपर्यत त्यांचा नागपूरला डेपो देखील होतो.जेथून नागपूर वाराणसी असी बस मध्यप्रदेश एसटी चालवत असे } आपल्या महाराष्ट्रात शिर्डी,कोल्हापूर ,सोलापूर, नाशिक ,.पुणे आदी विविध ठिकाणी इतर राज्यातील एसटींची   तिकीट विक्री केंद्रे आहेत.आपल्या महाराष्ट्र एसटीची याबाबत स्थिती अत्यंत वाइट आहे. अन्य राज्यात जिथे मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे, अस्या बडोदा इंदोर बेळगाव , आदी शहरात सुद्धा आपल्या एसटीचे मदत केंद्रे नाहीत तर अन्य ठिकाणाविषयी न बोललेलेच बरे.
       आजमितीस एसटीचा इंधनावरील खर्च मोठ्या प्रमाणात आहे. .केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करणाऱ्या संस्थाना महाग तर किरकोळ स्वरुपात इंधन खरेदी करणाऱ्या संस्थांना व्यक्तीना काहीस्या स्वस्तात इंधन पुरवठा करण्यात येतो.त्यामुळे एसटीने डेपोसाठी इंधन खरेदी बंद केली आहे. त्या अंतर्गत एसटीला स्वस्तात इंधन मिळण्यासाठी एसटीतर्फे सध्या विविध खासगी पेट्रोलपंपावर बसेससाठी इंधन भरले जाते. डिझेलपेक्षा एल. एन.जीचा खर्च कमी आहे. परीणामी जर एसटी बस एल एन जीवर चालवल्यास एसटीचा खर्च मोठ्या प्रमाणात कपात होईल.त्यामुळे जरी  आपल्या एसटीची पहिली गोष्ट करण्याची बस चुकली असली तरी आपण त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.तरच एसटीला गतवैभव प्राप्त होईल हे नक्की 
#ही_माझी_एक_हजार_  एकोणपन्नासावी_ब्लॉगपोस्ट_आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?