भारताचा वाटा 3% की 12%


भारतात जगाच्या ३ % वाहने आहेत मात्र एकूण रस्ते अपघाताच्या  विचार करता जगाच्या १२ % अपघात आपल्या भारतात होतात  ३ च्या चारपट संख्या १२ आहे हे विचारत घेतले असता आपल्या भारतातील अपघाताची समस्या किती गंभीर आहे हे समजून येते  मात्र रोजच्या जगण्यात फारसे महत्त्वाचं नसलेल्या  भावनिक मुद्यावरून राजकारण करणाऱ्या कोणत्याही राजकारणी व्यक्तीने याबाबत राजकारण केल्याचे आपणास दिसत नाहीये . एका अहवालानुसार अपघाताच्या कारणांमध्ये रस्त्याची दुर्दशा आणि अन्य मानवाच्या नियंत्रणात नसलेल्या निसर्ग आदी घटकांचा फक्त ३ ते ४% सहभाग असतो . ९६ ते ९७ % अपघात हे मानवी चुकांमुळे होतात . जे टाळणे सहजशक्य आहे . वाहतुकीचे नियम पाळल्यास हे अपघात टाळता येऊ शकतात . ज्यामुळे या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांसह अश्या अपघातात कायमचे अपंगत्व घेऊन  जगणाऱ्या व्यक्तीमुळे होणारे देशाचे नुकसान सहज टाळता येऊ शकते हे नुकसान टाळल्यामुळे या व्यक्तीचे देशाच्या प्रगतीत योगदान जोडले जाऊन आपल्या भारताची अधिक वेगाने प्रगती होऊ शकते . 
वाहतुकीचे नियम पाळणे म्हणजे कागदपत्रांची पूर्तता करणे इतकाच छोटा अर्थ नाही .तर वाहतुकीच्या  सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे हे यात समाविष्ट आहे . नुसते सर्व कागदपत्रांची पूर्तता केली मात्र वाहतूक सुरक्षिततेचे कोणतेच नियम पाळले नाहीत तर त्यास काहीही अर्थ नाही . या उलट जर एखाद्या वेळी भलेही कागदपत्राची पूर्तता झाली नसेल मात्र जर वाहतुकीच्या सुरक्षिततेचे सर्व नियम पाळले जात असतील तर वाहतुकीचे सुरक्षितता पाळणारा व्यक्ती अधिक जवाबदार व्यक्ती आहे असे म्हणावे लागेल . मात्र आपल्याकडे कागदपत्रांची पूर्तता म्हणजेच वाहतूक सुरक्षितता असा अर्थ घेतला जातो या चित्रात बदल होणे भारतातील अपघाताचे विदारक चित्र
बदलण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या व्यक्तीना दंड न करता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व्यक्तींना दंड करण्याची गरज या आकडेवारीमुळे स्पष्ट होत आहे जर गरज लागल्यास फक्त यासाठी कर्मचारी भरती करावी लागली तरी बेहत्तर . शालेय शिक्षणामध्ये नियम पाळण्याचा एखादा विषय असावा अशी स्थिती आहे माझ्यामते भारतातील बहुसंख्य समस्येचे कारण नियम न पाळणे आहे . २०११ साली जपानमध्ये विनाशकारी भूकंप झाला त्यावेळेस प्रत्येकजण फुकिशिमा या शहरातुन बाहेर जात होता या बाहेर जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली मात्र तरी देखील कोण्याही जपानी नागरिकाने रस्त्याची अर्धी बाजू ओलांडून फुकिशिमा या शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने उभी केली नव्हती फुकीशिमा शहरकडे कोणीही जाणार नसताना जी शिस्त जपानी नागरिकांनी दाखवली त्यामुळेच दुसऱ्या महायुद्धानंतर जपान राखेतुन उभे राहून जगातील सर्वात जास्त  विकसित अश्या सात देशात पोहोचले आपण युट्युवर मी सांगत असलेला व्हिडीओ बघू शकतो असो 
     सध्या वाढलेल्या रस्ते अपघात मृत्यूला काही जण रस्त्यातील खड्ड्याना जवाबदार धरतील त्यांना मी सांगू इच्छितो की आपण जर वाहतुकीचे नियम पाळत वाहन चालवले की, खड्यातून वाहन उडाले तरी लगेच नियंत्रणात येते तरी देखील टीव्हीलर पडलीच तर डोक्यावर  हेल्मेट असले तर प्राण जाण्यापासून सहज वाचले जाऊ शकते . हेल्मेट बरोबर बाळगणे काहीसे अडचणीचे असले तरी भारतासारख्या देशात हे सहन करणे आवश्यक आहे शेवटी जान हे तो जहान है खड्ड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होते वाहनाचा वेग कमी होतो हे लक्षात घेऊन एकाठिकाणाहून  दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण जो वेळ गृहीत धरला आहे त्यात वाहतूक कोंडीमुळे आपले १० मिनिटे वाया जाणार
आहे असे समजून नियोजन केल्यास सोन्याहून पिवळे असेच मी म्हणेल वाहतूक अपघात ही गंभीर समस्या आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू झल्यास तो सुवर्णकांचन योगच होईल तो योग लवकरात लवकर यावा ही ईश्वरचरणी प्रार्थना हा योग येण्यापर्यंत वाहने काळजीपूर्वक वाहने चालवा कारण घरी कोणीतरी आपली वाट पाहत असते 
#ही_माझी_एक_हजार_एकवणावी_ब्लॉगपोस्ट_आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?