संघर्षाचे ६ महिने

       


 २०२२ फेब्रुवारी २० ही फक्त एक तारीख नाहीये . अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांच्या राजकारणात युक्रेन या देशाचा बळी जाण्याची सुरवात होण्याचा तो दिवस आहे याच दिवशी रशियाने युक्रेन या देशावर आक्रमण केले आज ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवाड्यत या युद्धाला सहा महिने पूर्ण होत आहे अजूनही हे युद्ध सुरु आहे . युद्धाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये रशिया हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या दिवसात रशिया युक्रेनला पूर्णतः जिंकून घेईल , असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता . मात्र विविध देशांच्या शस्त्रात्रांच्या  मदतीने युक्रेन हे युद्ध सहा महिने झाले लढत आहे . युद्धाच्या सुरवातीला  अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी संघटना  नाटो अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनाझेशनचे सैनिक लढायला येतील अशी युक्रेनसह जगाची अपेक्षा होती . मात्र अमेरिका युद्धात उतरली तर  जगात तिसरे महायुद्धाचं सुरु होईल असे सांगत नाटोचे सैन्य युक्रेनच्या मदतीला आलेच नाही याबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलन्स्की यांनी जाहीर टीका सुद्धा केली होती अमेरिका जरी प्रत्यक्ष या युद्धात उतरलेली नसली तरी अमेरिकेने युक्रेनला शस्त्रात्रे मदत पूर्ण[पूर्णपणे केली . त्या मदतीवरच  युक्रेन सहा महिन्यापर्यंत हे युद्ध खेळू शकला आहे

      सहा महिन्याच्या या युद्धानंतर रशियाने युक्रेनच्या २० ५ भूभागावर नियंत्रण मिळवले आहे हा सर्व प्रदेश युक्रेनच्या पूर्व दिशेकडील रशियाला लागून असलेला प्रदेश आहे या भागातील काही पप्रदेशात रशियाविषयी काहीशी सहानभूती आहे . युद्धाच्या सुरवातीला रशियाने युक्रेनच्या राजधानीच्या शहरावर अर्थात किव्ह या शहरावर देखील हल्ला केला मात्र मात्र तो युक्रेनने यशस्वीपणे परतवून लावला .. युद्धाच्या सुरवातीला युक्रेनची पीछेहाट

होताना दिसत होती मात्र आता युद्धाच्या सहाव्या महिन्यात युक्रेनची काही प्रमाणत सरशी होताना दिसत आहे १५ ऑगस्ट च्या आसपास युक्रेनने रशियाच्या दोन लष्करी तळावर यशस्वी हल्ला केला पहिल्या हल्ल्याच्या वेळी रशियाने हल्ला झालाच नाही माध्यमातून मुद्द्दामून रशियाविरोधात बातम्या प्रसारित केलेल्या जात आहेत अशी भूमिका घेतली मात्र दुसऱ्या हल्ल्याच्या वेळी आमच्या लष्करी तळावर काहीतरी झाले आहे मात्र हा युक्रेनने केलेला हल्ला नाही अशी भूमिका घेतली रशियाने २०१४ साली नियंत्रण मिळवलेला क्रामिया  या भूभागाच्या काही भागावर सुद्धा युक्रेनने ताबा मिळवल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्रपती झेलन्स्की यांनी नुकताच केला आहे जगातील सर्वात मोठ्या ८ अर्थव्यवस्थेच्या समूहातून अर्थात जी ८ मधून रशियाला याच युध्दामुळे बाहेरचा रस्ता दाखवाव्यात आला होता . असो 
     एका अमेरिकी संघटनेच्या अहवालवानुसार १० ऑगस्ट पर्यंत ५० हजार युक्रेनच्या नागरिकांच्या मृत्यू  झाला आहे सुमारे ४९ % युक्रेनच्या नागरिकांनी दुसऱ्या देशात आश्रय घेतला आहे . युक्रेनचे आतापर्यंत १ अब्ज अमेरिकी डॉलरचे नुकसान झाले आहे . युक्रेनची सर्वच शहरे बेचिराख झाली आहेत . युक्रेनला युद्ध संपल्यानंतर पुर्नरचना करताना करताना युक्रेनच्या सरकारला मोठ्या प्रमाणत खर्च  करावा लागणार आहे हे या युद्धाची जी क्षणचित्रे माध्यमात येत आहेत त्यातून दिसत आहे युक्रेनची काळ्या समुद्रामार्गे जगभरात होणारी निर्यात देखील जवळपास थांबलेली आहे . ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपर्यंत ही निर्यात पूर्णतः थांबलेली होती रशियाच्या मते युक्रेन गव्हाच्या कंटनेर मधून लपून शस्त्रात्रे आणू शकतो सबब त्याला निर्यात करता येऊ शकत नाही मात्र ऑगस्टच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने झालेल्या करारानुसार रशियन युक्रेनला गव्हाची निर्यात करायला परवानगी दिली आहे 
    हे युद्ध या आधी थांबायची वेळ आली होती मात्र युक्रेनच्या संविधानात आम्ही भविष्यात कधीही नाटोमध्ये जाणार नाही अशी तरतूद करण्याची रशियाची अट आम्ही कधीच मान्य करणार नाही अशी भूमिका युक्रेनने घेतल्याने युद्ध थांबले नाही युद्धाला कारणीभूत ठरवून युरोपीय देशांनी आर्थिक बंधने लादण्यास प्रतिक्रिया म्हणून देखभालीचे कारण देत रशियाकडून पश्चिम युरोपला होणार नैसर्गिक इंधनाचा पुरवठा थांबवण्यात आला आहे ज्यामुळे येत्या हिवाळ्यात युरोपात मोठे संकट उभे राहण्याचा धोका निर्माण झाला आहे 
या युद्धामुळे जगभरात अन्नधान्यची त्यातही गव्हाची प्रचंड टंचाई झाली . ज्यामुळे महागाई प्रचंड प्रमाणत वाढली . काही देशात तर गेल्या काही दशकाचे महागाईचे उच्चांक यामुळे मोडले गेले . आफ्रिका खंडाच्या ईशान्य दिशेलागेंड्याच्या शिंगसारखा भाग दिसतो त्यास हॉर्न ऑफ आफ्रिका असे म्हणतात . या भागात मोठ्या प्रमाणात भूकबळी या युद्धामुळे गेले गेली कित्येक वर्षे दुष्कळाचा सामना करावा लागलेल्या या भागात जवळपास सर्वच अन्न युक्रेनमधून येत असल्याने त्यांचे खूपच हाल झाले आपल्या शेजारील श्रीलंका या देशाची पर्यटनांवर असलेली अर्थव्यवस्था देखील यामुळे काहीशी अडचण निर्माण झाली श्रीलंकेच्या दुर्दशेला काही प्रमाणत रशिया आणि
युक्रेनमधील युद्ध देखील कारणीभूत आहे 
हे युद्ध कधी संपेल हे आता सांगता येणे अश्यक्य हे एका अंदाजानुसार विविध आर्थिक बंधनामुळे रशियाचे पूर्णतः कंबरडे मोडल्याशिवाय अमेरिकेच्या मदतीने चाललेले हे युद्ध थांबणार नाही मात्र युद्ध थांबेपर्यंत जगाचे अपरिमित नुकसान मात्र झालेले असेल . 

#ही_माझी_एक_हजार_बावन्नवी_ब्लॉगपोस्ट_आहे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?