हत्या २३९ वर्षापुर्वीची

   

   आजपासून २३९ वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. स्थळ शनिवार वाडा पुणे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एका १८  वर्षीय तरुणाचा त्याचा काकांकडून मारेकरी घालवून हत्या केली जाते .  
हीच 
तो पेशवाईच्या इतिहासातील नारायण पेशव्यांची राघोबा दादाकडून करण्यात आलेली कुप्रसिद्ध हत्या . आज या इतिहासाला २३९ वर्षे पूर्ण झाली आहेत आजपासून २३९ वर्षांपूर्वी १७७३ ऑगस्ट ३० या दिवसापूर्वी ही हत्या करण्यात आलेली होती या निमित्याने ध चा मा करणे म्हणजे मूळ गोष्टीत अनुचित प्रकारचा बदल  करणे  या अर्थी वाक्यप्रचार रूढ झाली 
पेशवाईच्या  इतिहासामुळे तीन म्हणी मराठी भाषेत रूढ झाल्या त्यातील एक म्हणजे ही होय अन्य दोन म्हणजे अटकेपार झेंडा रोवणे ही पराक्रमाची माहिती सांगण्यासाठी वापरण्यता येणारी म्हण तर दुसरी म्हणजे अपयशाचे वर्णन करणारी पानिपत होणे ही होय असो 
           पेशवाईच्या अंताची पायाभरणी या गोष्टीतून सुरु झाली असे मानले तर गैर ठरू नये कारण यामुळे अल्पकाळासाठी  मिळालेले पेशवेपद दीर्घकाळ टिकावे यासाठी राघोबादादांनी वसईच्या इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले ज्यामुळे चिमाजी अप्प्पा यांनी पाणी पाजलेल्या वसईच्या इंग्रजांचा पेशव्यांचा राजकारणात प्रवेश झाल्या .पंचतंत्रातील दोन उंदीर आणि एका मांजरीच्या लोण्याच्या वाटपाच्या गोष्टीनीरूप याचा फायदा इंग्रजांनी घेतला आणि थोडे थोडे करत पुढील 35 वर्षात शनिवार वाड्यावर पेशव्यांचे निशाण जाणून इंग्रजांचे निशाण फडकले बारभाईचे कारस्थान वसईचा तह आणि तीन ब्रिटिश मराठा युध्द्द हे त्या पतनातील महत्व्वाचे टप्पे म्हणता येईल
इतिहासात वस्तुस्थितीला महत्व असते जर असे झाले असते तर तसे झाले असते यास इतिहासात  फारसे महत्व नसते हे माहिती असूनदेखील जर हि घटना घडली नसती तर पेशवाईच्या इतिहास खूप गौरवाचा असता असे राहून राहून वाटते
      आज पुण्यात असणाऱ्या अंधश्रद्धांचा विचार करता शनिवार वाड्यात दर  पौर्णिमेला रात्री "काका मला वाचावा "अशी हाक येण्याची अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्याची पायाभरणी या घटनेतून झाली . काही जणांनी येथील विहरीत खोलवर एक तरुण बाहेर पडण्यासाठी विनवीत असल्याचे दिसले असल्याचे सांगितले जाते, यातील खरे खोटे तो नारायण पेशवाच जाणे. पेशवाईतील अंतर्गत राजकारणाचा विचार करता या नंतर त्याने प्रचंड प्रमाणात वेग पकडला.पूढे राघोबादादांची पत्नी आणि या हत्याकांडातील अदुश्य मुख्य सुत्रधार असलेल्या आनंदीबाईंना नाशिकबाहेरील सोमेश्वर धबधब्यानजीन एका वाड्यात ठेवण्यात आले होते. आज तो परीसर नाशिक शहरात आला असून सदर वाड्याचा परीसर  आनंदवल्ली म्हणून ओळखला जातो. याचा कारणामागे असणारा वाडा आता जमिनदोस्त झाला आहे. आजमितीस या हत्याकांडाचे साक्षीदार म्हणून शनवार वाड्यातील ती अंधश्रद्धा असणारी नारायणराव पेशव्याची हाकच शिल्लक.आहे.बाकी सर्व नष्ट झाले आहे
      या हत्याकांडाच्या वेळी नारायण पेशव्याची पत्नी गरोदर होती. तीने जन्म दिलेल्या मुलाने अर्थात सवाई माधवराव याने आपल्या पराक्रमाद्वारे पेशवाईस गतवैभव प्राप्त करून देण्याच्या प्रयत्न केला . मात्र आपल्या पित्याप्रमणेच तो देखील कमनशिबी ठरला .पेशव्याच्या अंतर्गत राजकारणामुळे त्यास शनिवारवाड्यात पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करायला भाग पडली नारायण पेशव्यांचा हत्येसंदर्भात पेशव्यातील न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी दिलेला निवादा सुप्रसिद्ध आहे. त्यावर देहांत प्रायश्चित हे नाटक देखील सूप्रसिद्ध
आहे.आज या हत्याकांडाला २३९  वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने नारायण पेशव्यांना भावपुर्ण आदरांजली. त्याना दुर्देवाने आपले कर्तुत्व दाखवण्यासाठी पुरेसी संधी मात्र मिळू मिळू शकली नाही. पेशवेपदावर आल्यानंतर जेमतेम 3महिन्यात त्यांचा खुन झाला. त्यामुळे त्यांचा कारकिर्दीचा आढावा घेवू शकत नाही. पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून सध्यापुरते थांबतो नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?