वंदन बंडखोर कवियत्रीला

       

   
ती काळाचा पुढे बघणारी आधूनिक स्त्री होती, ती ज्ञानपीठविजेती कवियत्री आहे. ती हिंदी , पंजाबी भाषेतील ख्यातनाम कवियत्री आहे. फाळणीपुर्व पंजाबात सध्या पाकिस्तानात असणाऱ्या पंजाबात तीचा जन्म झाला होता , तारुण्याचा अवखळपणात तीला अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले. सासरच्या मंडळींकडुन प्रचंड अत्याचार सहन करावे लागले, मात्र यातूनच तीची कविता समृद्ध होत गेली.ज्या काळात एखाद्या स्त्रीने विवाहाच्या बंधनात न अडकता परपुरुषाबरोबर राहण्याची कल्पना करणे कोणाच्या मनात येणार नाही, अस्या काळात आपल्यापेक्षा मोठ्या पुरुषाबरोबर लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहिली ती. मी बोलत आहे, हिंदीतील ख्यातनाम कवियत्री ज्ञानपीठ विजेत्या अमृता प्रीतम यांच्याविषयी. 31आँगस्ट हा त्यांचा जन्मदिवस  निमित्याने त्यांना विनम्र आदरांजली

               त्या हिंदी पंजाबी भाषेतील ज्ञानपीठ मिळवणाऱ्या पहिल्या कवीयत्री होत्या  हिंदी चित्रपटातील उत्तमोत्तम गाण्याचे गीतकार असणाऱ्या शाहिर लूधीयानवी यांच्या बरोबरचे त्यांचे जीवन विशेष गाजले. मात्र त्यांची स्वतंत्र्य असी काव्यप्रतिभा होती . हे विसरुन चालणार नाही.  अमृता प्रीतम यांचा जन्म 1919 आँगस्ट 31 रोजी सध्याचा पाकिस्तानातील महत्त्वाचे शहर असलेल्या गुजरानवाला येथे त्यांचा झाला. त्यांना साहित्य अकादमी , पद्मविभुषण या  आपल्या भारतातील पुरस्करांसह काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत त्या साहित्य अकादमी  मिळवणाऱ्या पहिला महिला

साहित्यिक होत्या त्यांना हा पुरस्कार 1956 साली मिळाला त्या या पुरस्काराबरोबर पंजाब रत्न अवॉर्ड घेणाऱ्या पहिल्या व्यक्ती आहेतत्यांना  अपंजाबी भाषेतील पहिल्या कवियत्री  देखील ओळखले जाते   त्यांचा कवितेत अत्यंत नाजूक पद्धतीने भावना मांडणारी बंडखोर स्त्री लपल्याचे सहजतेने दिसून येते.त्यांच्या कवितेत सुरवातीच्या काळात फाळणीचे दुःख अत्यंत स्पष्टपणे  जाणवते . त्यांचे शिक्षण लाहोर येथे झाले .फाळणीनंतर त्या दिल्ली येथे स्थाईक झाल्या .

           अनेकदा त्यांच्या साहित्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच बोलले जते  त्यांचे शाहीर लुधवणियांबरोबर  राहणे नेहमीच उत्सुकतेचे ठरले त्यांच्या साहित्यकृतींचा ऐवजी सातत्याने त्या विषयीच बोलले गेले जे चुकीचेच  कोणत्याही कलाकारास साहित्यिकाला वैयक्तिक आयुष्याद्वारे  जोखणे चुकीचेच मात्र वहिदा रहेमान असो  किंवा अमृता कायमच त्यांना त्यांच्या कलाकृतीपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांवरूनच  मुलाखतीत अधिक प्रश्न विचारले जातात . आपल्यासारखे कलाकांरांना देखील वैयक्तिक आयुष्य आहे याची जाण अनेकांना नसते त्याचंच फटका अमृता प्रीतम याना देखील बसला

  स्वतंत्र्योत्तर भारताच्या साहित्यविशाच्या इतिहासात त्यांचे स्थान अढळ ध्रुव ताऱ्यासारखेच आहे . महिलांच्या साहित्यविश्वात तर त्याचे स्थान अद्वितीयच आहे .महिलांच्या विश्वातील दुःखे सहजतेने त्यांनी आपल्या कवीतेतून मांडली. ती देखील त्यावेळच्या समाजरीतीना झुगारून  नैतिक आणि 

अनैतिकतेच्या सर्व संकल्पनांपेक्षा मानवी जीवनात स्वातंत्र्य अधिक महत्त्वाचे आहे स्त्रियांना देखील एक स्वतंत्र्य अस्तिव आहे हे त्यांनी आपल्या जीवननद्वारे दाखवून दिले त्यावेळेच्या सर्व नैतिकतेच्या संकल्पना मूठमाती देत त्यांनी आपले सर्व आयुष्य आपल्या मतानुसार जगले  सर्वसामान्य  जनता ज्याच्या विचार करते अश्या लोक जग काय म्हणतील याच्या त्यांनी विचार केल्याचे त्यांच्या जगण्यातून दिसून येत नाही रुळलेल्या समाजजीवनच्या वाटेवरून जाण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या मार्ग तयार केला आणि संपूर्ण आयुष्यात त्याच वाटेवरून त्या चालल्या  त्यांचे  31 ऑक्टोबर 2005  रोजी निधन झाले त्या आपल्यातून निघून गेलेल्या असल्या तरी त्या आपल्या लेखांद्वारे सदैव आपल्यात आहेत आपल्यात राहतील

#ही_माझी_एक_हजार_चोपन्नावी _ब्लॉगपोस्ट_आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?