पाकिस्तानात घडतंय तरी काय ?

              पाकिस्तानात घडतंय  तरी काय ? असा प्रश्न सध्या उपस्थित व्हावा अश्या घडामोडी सध्या पाकिस्तानात घडत आहे .  एकीकडे देशात महापुराचे थैमान सुरु असताना त्याचवेळी पाकिस्तानातील केंद्रीय विधिमंडळाच्या राजकारणाने अत्यंत वेग पकडला आहे . देशाच्या एक १/३ भाग पुराच्या पाण्याखाली असताना उरलेल्या २/३ देशात
प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांमार्फत अर्थात इम्रान खान यांच्यातर्फे मोठ्या राजकीय सभा आयोजित करण्यात येत आहे फैसलाबाद , गुजरानवाला , गुजराथ , सरगोडा, पेशावर  आदी पंजाब आणि खैबर ए पखवतुंवा ( पूर्वीचे नाव वायव्य सरहद प्रांत ) प्रांतातील शहरात या सभा होत आहे अल जझीरा , चॅनेल न्यूज एशिया  आदी विविध न्यूजचॅनेलवर या  राजकीय सभेचे जे व्हिडीओ दाखवण्यात येत आहेत त्यानुसार या सभांना हजारोने नाही तर लाखांच्या संख्यने लोक गर्दी करत आहेत.  . भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचच्या वेळी आपल्या भारतात कोणी राजकारणी आपली सभा घेणार नाही मात्र ४ सप्टेंबर २०२२ रोजी भारत पाकिस्तान मॅचच्या वेळेसच इम्रान खान यांनी फैसलाबाद या शहरात राजकीय सभा घेतली. अल जझीरा ने दिलेल्या बातमीनुसार या सभेला एक लाखाहून थोडेसे अधिक लोक प्रत्यक्ष सभास्थळी हजर होते इम्रान खान  त्यांच्या सभेत काय बोलतात हे लोकांना समजू नये यासाठी पाकिस्तानच्या सत्ताधीशांकडून न्यूजचॅनेलवर अप्रत्यक्षरिता दबाव टाकणे , युट्युब सारख्या माध्यमातून भाषण लोकांनी ऐकू नये यासाठी इंटरनेटची गती अत्यंत कमी करणे आदी उपाय योजले जात असल्याचे अनेक
आंतराष्ट्रीय माध्यमात सांगितले जात आहे / या अप्रत्यक्षरीत्या दबावाला अन्यवेळी इम्रान खान यांची हिरहिरीने बाजू घेणाऱ्या "एआरवाय न्यूज या न्यूज  चॅनेलसह'  जिओ न्यूज बोल न्यूज . सामा टीव्ही आदी अनेक चॅनेल इम्रान खान यांच्या  ६ सप्टेंबर रोजी  पेशावर येथील राजकीय सभेच्या वेळी बळी पडल्याचे फ्रांस २४ च्या बातमीत सांगण्यात आले आहे या भाषणात इम्रान खान यांनी आपल्या अनुयानां मी इशारा दिल्यावर आंदोलनासाठी तयार व्हावा अशा आदेश दिला आहे . एका आंतराष्ट्रीय माध्यमांच्या अंदाजनुसार इम्रान खान आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर २४ तासाच्या आत आंदोलन सुरु करू शकतात .त्यामुळे पाकिस्तानातील पुराचे संकट ओसरल्यावर पाकिस्तानात मोठ्या प्रमाणत राजकीय घडामोडी घडतील हे सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज नाही 

  सध्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तानचा महागाई निर्देशांक २६ % आहे  तसेच अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया सातत्याने घसरत आहे . ४ सप्टेंबर रोजी हा दर एक अमेरिकी डॉलर बरोबर २२७ पाकिस्तानी रुपया इतका निच्चांकी स्तरावर पोहोचला होता . पाकिस्तानात एप्रिल आणि मे महिन्यात तेथील सरकारकडून धान्य करण्यात येते मात्र त्या वेळी विद्यमान केंद्र सरकारं इम्रान खान हटाव या मोहिमेत गुंतलेलं असल्याने पाकिस्तानच्या सरकारकडून धान्य खरेदी करण्यात आलेली नाही त्यातच ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणत [पूर आल्याने पूर्वी साठवलेले थोडेफार धान्यसुद्धा खराब झाल्याने येत्या काळात पाकिस्तानमध्ये अन्नधान्याचे मोठे संकट उद्भवू शकते असे बीबीसीच्या बातमीत सांगण्यात आले आहे जर बीबीसीमध्ये सांगण्यात आलेली स्थिती प्रत्यक्षात आली तर महागाई नियंत्रणाबाहेर जाईल हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे त्यामुळे आधीच मोठ्या प्रमाणत इम्रान खान यांच्या बाजूने झुकलेले जनमत अजूनच जास्त प्रमाणत त्यांच्याकडे झुकू शकते या वाढलेल्या जनमतामुळे इम्रान खान यांना आंदोलन करण्यास अधिक अनुकूल स्थिती निर्माण होईल 

सध्या पाकिस्तानात असणाऱ्या केंद्र सरकारची भारतविषयक भूमिका काहीशी मवाळ  आहे या उलट इम्रान खान हे त्यांच्या भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात त्यामुळे पाकिस्तानातील राजकारणातील  हे बदल भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात . अर्थात आखाती देशाकडून भारताला होणाऱ्या इंधन पुरवठ्याला रशियासारखे अन्य पर्याय भारताला उपलब्ध असल्याने भारत आता पूर्वीप्रमाणे त्यांच्या समाधानासाठी काहीशी बोटचेपी भूमिका घेणारा भारत राहिलेला नाही . तसेच युनाटेड अरब अमिरात सारख्या पाकिस्तानचा जवळचा मित्रदेश म्हणून परिचित

असणाऱ्या देशाबरोबर देखील भारताचे खूपच मैत्रत्वाचे संबंध आहेत .आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्राची ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ३ दिवस युनाटेड अरब अमिरातीच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर होते या वर्षी जर्मनीत झालेल्या जी ७ बैठकीवरून येताना पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी युनाटेड अरब अमिरातीच्या धावता दौरा देखील केला होता तसेच आठ  महिन्यापूर्वीच युएन्टेड  अरब अमिरातने  काश्मीर मध्ये सेझ उभारण्यातात स तयार असल्याचे सांगितले होते या पार्श्वभूमीवर इम्रान खान त्यांच्या काश्मीरविषयक राग त्याच सुरत आळवतात का हे बघणे उत्सुकतेचे ठरेल थोडक्यात येत्या काही दिवसात पाकिस्तानात काय होते हे फक्त त्यांच्यासाठीच नाही तर आपल्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे 

 #ही_माझी_एक_हजार_अडुसष्टावी_ब्लॉगपोस्ट आहे

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?