भिकारी ते प्रबळ.30वर्षाची भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल


 नूकताच  भारतीय अर्थव्यवस्थेने ग्राँस डेमाँस्टिक प्राँडक्टचा विचार करता जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा गाठला. हा तोच भारत आहे , जो आजपासून 31 वर्षापुर्वी  आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता. देशात  हाताच्या बोटावर मोजता येतील असे मोजकेच काही आठवडेच  नैसर्गिक इंधन आयात करू शकू ,इतकेच परकीय चलन होते. देशाच्या बँकिंग प्रणालीचा केंद्रबिंदू असलेल्या बँकेकडे अर्थात रिझर्व.बँकेकडे असणारे सोने जपान , युके आणि स्विझरलँडच्या बँकेकडे गहाण टाकण्याची वेळ ज्या देशावर आली होती.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसुद्धा ज्या देशाला कर्ज देण्यास तयार होत नव्हती.त्या देशाने 30 वर्षात ग्राँस डेमोक्रॅटिक प्राँडक्टचा विचार करता, जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा पल्ला गाठला आहे. जे खरोखरीच कौतूकास्पद आहे. 

पी नरसिंहराव यांनी डाँ. मनमोहनसिंग यांच्या मदतीने केलेल्या प्रयत्नाचे गोडफळ म्हणजे आजचे भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र. त्यावेळेस जे बदल राबवणे ,म्हणजे स्वतःची राजकीय आत्महत्या करणे, असे समजण्यात येत होते.ते कठीण बदल आपल्या अर्थव्यवस्थेत रुजवत केलेल्या प्रयत्नांमुळे आपली अर्थव्यवस्था या स्थितीपर्यत पोहोचली आहे.सरकारने मीठापासून न्युजपेपर टुथपेस्ट, साबण तयार करण्याचा उद्योगातून स्वतः ला कमी कमी करत खासगी क्षेत्रातील स्वदेशी कंपन्यांना परदेशी कंपन्यांना व्यवसाय करण्याची परवानगी देणे.त्यासाठीची प्रक्रिया सोपी करणे ही गोष्ट आज सोपी वाटते,मात्र ज्यांनी हा काळ बघीतला आहे, त्यांना विचारा या काळाबाबात ते सांगतील किती मोठे शिवधनुष्य होते ते ? भारताचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी त्यावेळी जागतिक बँकेच्या 

आँफिसमध्ये उच्चपदावर कार्यरत असणाऱ्या डाँ. मनमोहनसिंग या मुळच्या भारतीय असलेल्या अर्थतज्ज्ञाला परत भारतात बोलावले. डाँ.मनमोहनसिंग यांनी सुध्दा काहीही आढेवेढे न घेता परत मायभुमीकडे प्रस्थान केले.शाहरुख खानच्या स्वदेश या चित्रपटात नायक मोहन भार्गव अमेरीकेतून भारतात परत येतो  असे दाखवले आहे. त्याचा कितीतरी आधीच खरोखरच्या मोहन भार्गवने भारताला खऱ्या अर्थाने विकासाच्या वाटेवर आणले.त्यानंतरच्या किती पंतप्रधानांनी असे ब्रेन ग्रेन केले ,हा मोठा संशोधनाचा विषय ठरेल असो.

ज्याप्रमाणे गहु तांदूळ आदींची पेरणी केल्यानंतर प्रत्यक्ष पिक हातात येण्यासाठी सुमारे अडीच महिने थांबावे लागते.पोल्टीफाँर्ममध्ये सुद्धा दिड महिन्यानंतरच पैसे हाती येतात.त्याचप्रमाणे त्यांनी 30 वर्षापूर्वी घेतलेल्या धाडसी निर्णयाची फळे आज दिसत आहे. आताच्या सरकारचे अर्थव्यस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठीचे प्रयत्न उत्तमच आहेत, यात वादच नाही. मात्र ते मळलेल्या वाटेवरुन गाडी जोरात नेण्यासारखे आहेत.मुळातील मळलेली वाट

सोडून गाडी पुर्णतः नव्या वाटेवर गाडी नेणे हे खरोखरीच कौतूकास्पद होते.त्याबाबत भारत कायमच ऋणातच राहिल.समाजवादाची वाट सोडून अर्थव्यवस्थेची गाडी भांडवलदारशाही कडे नेणे खरोखरीच अत्यंत अवघड असणारे काम पी नरसिंहराव आणि डाँ.मनमोहनसिंग यांनी केले, जे निव्वळ अशक्यप्राय होते.सध्याचे सरकार पुर्वी ज्या मार्गावर अर्थव्यवस्थेची गाडी चालत होती त्याच मार्गावर  पुर्वीपेक्षा वेगाने गाडी चालवत आहे. जे माझ्यामते काहीसे सोपे काम आहे, असो.

भारतावरील आर्थिक संकटाला 30वर्ष म्हणजे साधरण एका पिढीचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे सध्या ते कष्ट समजू शकत नाहीत, मात्र त्यामुळे त्याचे मोल कमी होत नाही. सध्या श्रीलंका आणि काही प्रमाणात पाकिस्तान आपण 30 वर्षापूर्वी सामोरे गेलेल्या संकटाला सामोरे जात आहेत. आपल्याकडे देखील आपण भांडवलशाही स्विकारल्यावर प्रचंड महागाई होती.परकीय चलनसाठा जवळपास शुन्यावर होता.आज देखील या दोन्ही देशात हीच स्थिती आहे. आपण जसे या संकटातून सावरलो तसे हे देश पण सावरतील ,असी आशा करूया.

 #ही_माझी_एक_हजार_एकोण सत्तरावी_ब्लॉगपोस्ट आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?