स्वतःची जावबदारी घेण्यास कधी शिकणार आपण ?

         
 

भारतातील ज्येष्ठ उदयॊजक सायरस मिस्त्री यांचे रस्ते अपघातात निधन झाल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पुढे कर मध्ये बसताना मागील अबाजूस बसणाऱ्या लोकांनाही सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्याच्या निर्णय जाहीर केला .  मागील सीटवरील प्रवाश्यानी सीटबेल्ट न लावता प्रवास केल्यास त्यांना मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद केली . या निर्ययाचे समाज माध्यमात  नकारात्मक प्रतिक्रिया देऊन स्वागत करण्यात आले. .खड्डेविरहित रस्ते , एकाच सलग लेनचे रस्ते रस्त्याच्या कडेला यॊग्य त्या मार्गदशक खुणा पहिले द्या मगच सिटबेल्टची सक्ती करा. स्वतःच्या जवाबदाऱ्या नीट पार पडायच्या नाहीत . मात्र सर्वसामान्यांना छोट्याशा चुकीसाठी मोठाला दंड लावायचा ही प्रशासनाची योग्य पद्धत नाही . यामुळे फक्त वसुली राज्याची  निर्मिती होईल . शहरात जिथे फक्त  १५ ते २० किलोमीटर प्रति तास या वेगाने गाडी चालवावी लागते तिथे मुळात सिटबेल्टची गरजच नाही मात्र यामुळे फक्त घरापासून कोपऱ्यावर भाजी आणायला गेलो तरी त्या जेमतेम १००, २०० मीटरच्या अंतरासासाठी रस्त्यावर उभे राहून पोलीस दंड करतील अश्या प्रतिक्रिया या बाबत समाज माध्यमावर उमटत होत्या . 
      मुळात कोणताही नवा बदल स्वीकारणे तसे त्रासदायक असते . नवीन गोष्ट अंगवळणी पडायला वेळ लागतो . मात्र एकदा गोष्ट सवयीची झाल्यावर ती गोष्ट सहज होऊन जाते .मात्र सुरवातीला काहीसा त्रास झाला तरी ती गोष्ट करणे आवश्यक करणे ती गोष्ट  आत्मसात केल्यास भविष्यात फायदाच होणार असतो मात्र मुळात ती गोष्टच न केल्यास त्यामुळे होणारे बदल सुद्धा होत नाहीत ज्यामुळे पूर्वी होणारा त्रास देखील सहन करावा लागतो  तो निराळाच आणि माझ्या मते जगात १००% योग्य अशी कोणतीच गोष्ट नसते प्रत्येक गोष्टीत काहीतरी त्रास अडचण असतेच ती गोष्ट वापरताना आपणास ती गोष्ट स्वीकारावीच लागते सबब छोटयासा अंतरासाठी कारमध्ये मागच्या आसनावरील  लोकांना सीटबेल्ट लावणे जर नजरचुकीने लावायचा राहिल्यास पोलिसांकडून होणारा अनावश्यक दंड सहन करणे क्रमप्राप्त आहे कारण  त्यामुळे अंतिमतः फायदा आपलाच आहे . 
        रस्त्यावर विवध अडथळे असतात रस्त्याची रुंदी एकसमान न रहाता बदलणे यामुळे वाहने चालववायला अडचण असली तरी ती आपण स्वीकारणे आवश्यक आहे . भारतासारख्या जागच्या अडीच टक्के भूभाग असणाऱ्या देशात जगाची १६ % लोकसंख्या राहतिये तर जगाच्या ३ %  वाहने भारतात आहेत या सर्वांचा विचार करत आपणस रस्त्यांची निर्मिती करावी लागते. . त्यातच रस्त्यासासाठी लागणारी जमीन संपादन करताना राबवायची प्रक्रिया त्यासासाठीचा मोबदला आदी गोष्टींचा देखील सामना रस्ते रुंदीकरण करताना करावा लागतो . मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करताना नाशिक नजीकच्या ओझर येथील रुंदीकरण का खोळंबले होते? हे आठवल्यास आपणास प्रशासनाच्या अडचणीची काहीशी कल्पना येईल . त्याचप्रमाणे रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण करताना होणारे राजकारण देखील मोठा विषय आहे .रस्त्याच्या कमी अधिक रुंदीसासाठी या बाबी म्हह्त्वाच्या आहेत .  दिशादर्शक बोर्डाचा अभाव देखील याच रस्त्याच्या कमासी निगडित आहे 
ज्या व्यक्ती रस्ते अपघाताच्यासाठी प्रशासनास जवाबदार धरतात त्यांना मी जिवतीच्या कथेतील एक कथा सांगू इच्छितो , , आटपाट नगर होते नगराचा राजा लोकल्याणकारी होता राजाला  एक राजपुत्र होता . राजपुत्र मोठा लोभस होता एकदा उन्हाळ्याचे दिवसात राजपुत्र राजवाड्याबाहेर आला उष्णतेने त्याचे पाय पोळू लागले तसेच उष्णतेने त्याचे डोके दुखू लागले आपल्या पुत्राची व्यथा पाहून राजाने सर्व राज्यभर मंडप उभारण्याचा आदेश दिला राज आज्ञेप्रमाणे सर्वत्र मंडप उभारला जाऊ लागला या मंडप उभारण्यात मोठ्या प्रमाणत महसूल खर्च होऊलागला त्यामुळे अन्य लोककल्याणकारी कामे करण्यास महसूल कमी पडू लागला राजाला मोठी चिंता लागली राज्याने आपल्या प्रधानाच्या सल्याने आपल्या नागरीबाहेरीतील साधूची मदत घेण्याचे ठरवले राजा साधूकडे गेला आपला प[राशन सांगितला साधू मोठ्याने हसला आणि म्हणाला पहिले राज्यभर मंडप उभारण्याचे थांबावं राजपुत्राला एक टोपी दे आणि त्याला चांगल्या चप्पला दे यामुळे त्याचे सूर्याच्या उष्णतेपासून सरंक्षण होईल साधने सांगितल्याप्रमाणे राजा वागला ज्यामुळे अनावश्यक महसूल खर्च होण्याचे तसेच राजपुत्राला उन्हाचा त्रास देखील थांबला माझ्यामते दुचाकीवर हेल्मेट घालणे कारमध्ये सीटबेल्ट लावणे हे त्या साधूने सांगितलेल्या बाबींसारखे आहेत कमी खर्चिक आणि विश्वासाह्रय या उलट अपघातासासाठी रस्त्याची रुंदी दिशादर्शक याना जवाबदार धरणे याला राज्यभर मंडप घालण्यासारखे आहे तरी रस्ते अपघाताबाबत इतरांना दोषी धरणाऱ्या लोकांनी साधूचा आदेश मांन्यताच त्यांचे कल्याण आहे हे नक्की 


#ही_माझी_एकहजार_पंच्याहत्तरावी_ब्लॉगपोस्ट_आहे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?