अन्न नासाडी टाळा, अतिवृष्टी टाळा


 "  अन्न नासाडी टाळा, अतिवृष्टी टाळा",  
शीर्षक वाचून चमकलात ना ? अन्नाची नासाडी आणि पावसाचा काय तो संबंध ? असा प्रश्न आपणस पडला असेल . तर सांगतो अन्न नासाडीमुळे प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षरीत्या पाऊस वाढायला मदत होते . आपणाकडून नासाडी केलेल्या अन्नातून मोठ्या प्रमाणत मिथेन या वायूची निर्मिती होते  जागतिक तापमानवाढीसाठी  जो वायू सर्वात जास्त जवाबदार आहे तो म्हणजे मिथेन हा होय . याच मिथेनची निर्मिती अन्न नासाडीतुन होते संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदलाविषयी कार्य करणाऱ्या एका संघटनेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार सध्या जगभरात मिथेनचे प्रमाण वाढत आहे या वाढणाऱ्या मिथेनमागे सर्वात मोठा हातभार हा जगभरात होणाऱ्या अन्न नासाडीचा आहे 

       या मिथेनमुळे जागतिक तापमान वाढते , प्रत्येक तपमानाची बाष्प सामावून घेण्याची एक मर्यादा असते काही कारणाने एखाद्यावेळी त्या विशिष्ट तापमानात सामावले जाऊ शकेल त्या मर्यादांपेक्षा  जास्त बाष्प हवेत असेल तर पाऊस पडतो हवेत किती बाष्प समाविष्ट होणार ? या तापमानाशी जवळचा संबंध असतो जास्त तापमान म्हणजे बाष्प सामावून घेण्याची मर्यादा जास्त कमी तापमान म्हणजे बाष्प सामावून घेण्याची मर्यादा कमी  सर्वसामान्यतः समुद्रावरील तापमान किनाऱ्यापेक्षा जास्त असते परिणामी त्या ठिकाणहून जास्त बाष्प हवेत येते . आता किनाऱ्यावरील तापमान कमी असल्याने किनाऱ्यावर पाऊस पडतो आता समुद्रावरील तापमान वाढत असल्याने समुद्रातून पूर्वीपेक्षा अधिक बाष्प हवेत समाविष्ट होत आहे त्यामुळे पूर्वीपेक्षा सध्या पाऊस वाढलेला आहे या पुढे जितके तापमान वाढेल तितका पाऊस सुद्धा वाढेल अशा हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाज आहे 

    त्यामुळे आपण तपमान वाढणाऱ्या गोष्टीला अटकाव केल्यास या या मुसळधार पावसाळा देखील अटकाव करू शकतो तापमानवाढीस साह्य करणाऱ्या गोष्टींची निर्मिती रोखल्यास आपण हा पाऊस देखील रोखू शकतो जगातिक तापमानवाढीस प्रामुख्याने मिथेन हा वायू कारणीभूत आहे हा वायू प्रामुख्याने अन्नाच्या नासाडीतुन तयार होतो अन्न नासाडी टाळल्यास मिथेनची निर्मिती आणि पुढील चक्र सहजतेने थांबवता येते जगभरात गरीब व्यक्ती देशांकडून अन्नधान्य साठवण्याची साधनांच्या अनुपलब्धतेतेमुळे अन्नाची नासाडी होते तर सधन व्यक्तींमार्फत तथाकथित सामाजिक दर्जा राखण्यसासाठी गरज नसताना जाणूनबुजून ताटात अन्न टाकून दिले जाते आपण जर ताटातील सर्व
अन्न खाल्ले तर तर त्यांच्या सामाजिक स्तर घसरतो या समजातून समाजातील सधन व्यक्ती हे अन्न वाया घालवतात . या वाया जाणाऱ्या अन्नामुळे मिथेनची निर्मिती होते आज जगभरात लक्षावधी लोक अर्धपोटी आहेत त्यांना सुद्धा आपण अन्न वाया न घालवल्यास शिल्लक राहणाऱ्या अन्नातून काहीतरी देऊ शकतो जीवेभावे शिवसेवा या उक्तीनुसार आपण जर अन्न  वाया घालवले नाही तर या लोकांचे आशीर्वाद मिळवत पुण्याची कमाई करू शकतो . तसेच अन्नाच्या नासाडीमुळे तयार होणारा मिथेन वायू सुद्धा होणार होणार नाही त्यामुळे पुढील  अनर्थ सुद्धा टळू शकतो तो तर वेगळाच  मग या पुढे अन्न वाया घालवण्याच्या आधी गोर गरिबांच्या बरोबर हा विचार सुद्धा करणार ना 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?