इराणच्या आंदोलांच्या मुळाशी

 


 
सध्या इराणमध्ये महिलांचे पारंपरिक बंधनाच्या विरोधात मोठे आंदोलन सुरु आहे ज्यामध्ये हा मजकूर लिहण्यापर्यंत ३१ जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे . तेथील सांस्कृतिक पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणीला  हिजाब नीट प्रकारे न घातल्याप्रकरणी  अटक केल्यावर पोलिसांच्या अत्याचारात सदर तरुणीचे निधन झाल्यावर हे आंदोलन सुरु झाले हे आंदोलन महिलांच्यावरील बंधनाबाबत आहे आजमितीस २०२२ साली हे आंदोलन सुरु असले तरी याची पायांमुळे १९७९ या जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या वर्षापर्यंत मागे जातात याच वर्षी युनाटेड सोशालिस्ट सेव्हियत रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले ज्यामुळे तयार झालेला विविध घटनाक्रम आज देखील सुरु आहे तालिबानच्या रूपाने आज देखील आपण तो अनुभवत आहोतच याच १९७९ या वर्षी अजून एक घटना घडली ती म्हणजे इराण या देशात झालेली इस्लामिक क्रांती आज इराण मध्ये आपण जे बघतोय त्या घटनांशी मुळाशी असणारी घटना

    इराणी क्रांती जरी ११ फेब्रुवारी १९७९ ला अधिकृतपणे सुरु  होऊन पुढे वर्षभर सुरु राहिली असली तरी या मागे मोठा इतिहास आहे  पहिल्या महायुद्धाच्या सुमारास इराणमध्ये पेट्रोलियम पदार्थ मोठ्या प्रमाणात आहेत याचा शोध लागला या पेट्रोलियम पदार्थाचं फायदा ब्रिटिश कंपन्या घेत असे.  काही प्रमाणत तेथील धार्मिक वर्चस्व असलेल्या धर्मगुरूंना हा फायदा मिळत असे  सर्वसामान्य इराणी नागरिकांना त्याचा काहीच फायदा मिळतं नसे १९६१ साली  त्यावेळच्या इराणच्या राजाने अर्थात मोहमद्द रझा शाह यांनी देशात मोठ्या प्रमाणत सुधारणांच्या धडाका लावला या सुधारणा मुख्यतः पाश्चात्य समाजाचे अनुकरण करणाऱ्या होत्या  त्यावेळच्या सरकारच्या काही धोरणांमुळे समाजात बेरोजगारी , आर्थिक विषमता वाढणे, या दोषांबरोबरच  इराणच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा फायदा अमेरीका देश घेत आहे. इराणला त्याचा काही फायदा होत नाही  तसेच आपण अमेरीकेचे गुलाम आहोत अशी भावना निर्माण झाली.ज्याचा फायदा तत्कालीन सरकारच्या विरोधात असणाऱ्या कट्टर मानसिकतेच्या लोकांनी घेतला यातीलच एक नाव म्हणजे आयतुल्ला खोमोनी आयतुल्ला खोमोनी  यांचे मुळ नाव रहोतुल्ला  खोमोनी आहे. तर आयातूल्ला ही एक धार्मिक पदवी आहे. मात्र खोमोनी हे आयातूल्ला खोमोनी याच नावाने प्रसिद्ध आहेत .आयातूल्ला खोमोनी हे सरकारविरोधात सत्याने आंदोलने करत होते हे बघून सरकाने प्रथम त्यांना अटक केली आणि कालांतराने त्यांना देश सोडायला भाग पडले त्यावेळी ते प्रथम इराक आणि नंतर फ्रान्समध्ये राहायला गेले दरम्यानच्या काळात सरकारमध्ये प्रचंड प्रमाणत भष्ट्राचार वाढला त्यामुळे सुधारणांमुळे आधीच काहीसे नाराज असलेले समाजमन अधिकच दुरावले सरकारी  तेल कंपन्यांनी मिळवलेल्या नफ्यातून देशाचा विकास झाला मात्र त्यांच्या फायदा देशातील काही लोकांनाच झाला. त्यामुळे देशात मोठे आंदोलन सुरू झाले  त्यातच१९७९ साली तत्कलीन राजा मोहमद्द शाह  स्वतःच्या कॅन्सरवरील उपचारसासाठी अमेरिकेला गेला हे बघून तेथील पुराणमतादी लोकांनी आयतुल्ला खोमोनी याना परत बोलावले. त्यांनी आल्यावर तेथील पंतप्रधानाला पदावरून हटले , (जो आयातूल्ला खोमोनीच्या मते राजाचा पोपट होता)  आणि देशाची सर्व सत्ता आपल्या हातात घेतली त्यानंतर १९२१ पासून असणारी देशाची धर्मनिपेक्ष हि प्रतिमा पुसून देशाला शिया इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण असे नवे स्वरूप दिले या सर्व बदलास खामोनीज्  इस्लामिक रेव्होलेशन असे म्हणतात

या क्रांतीनंतर तेथील कट्टर लोकांनी या देशाच्या दुर्दशेला अमेरिकाच जवाबदार आहे असे मानून अमेरिकेची अँबेसि ४४४ दिवस ओलीस ठेवली जी नंतर अमेरिकेने अल्जेरिया या देशाची मदत घेत सोडवली या घटनेनंतर अमेरिकेने आणि त्यांच्या मित्र देशांनी इराणवर प्रचंड बंधने लादली ज्यामुळे इराणची अर्थव्यवस्था ढासळली या ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे तेथील कट्टरतेत वाढच झाली  या क्रांतीनंतर देशाचे कायदे इस्लाम या धर्मच्या चालीरीतींशी सुसंगत असे करण्यात आले महिलांवर अनेक बंधने लादण्यात आली  त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकोच करण्यात आला आजमितीस या घटनेस ४३ वर्षे

होत आहेत मात्र इराणची  इस्लामिक क्रांती समजल्याशिवाय आपणास आजचे आंदोलन समजणार नाही तेथील लोकांची मूळ मानसिकता समजण्यसासाठी इराणची १९७९ची क्रांती अभ्यासावीच लागते या क्रांतीस कारणीभूत असलेल्या अनेक बाबीमध्ये समाजात पाश्चात्य स्वरूपाच्या सुधारणा हे सुद्धा एक कारण होते गेल्या काही वर्षात या कट्टरतेत वाढच झाली आहे ही बाब लक्षात घेता तेथील समाजजीवन कोणत्या स्थितीत असेल हे समजते  अर्थात या आंदोलनास मिळणार इराणमधील आणि जगभरातील पाठिंबा बघता यातून काहीतरी सकारत्मक घडेल अशी अशा करायला हरकत नसावी


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?