भारताचे लक्ष आता पॅसिफिक महासागराकडे

    


सध्या भारताकडून विविध देशांशी संबंध अधिक मैत्रीपूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे ऑगस्ट  आणि सप्टेंबर महिन्यात भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ . एस जयशंकर यांचा  जपान , युनाटेड अरब अमिरात , सौदी अरेबिया या देशात आणि भारताचे सरंक्षण मंत्री राजनाथसिंग याचा जपान , मध्य आशियातील पाचही इस्लामधर्मीय देशांचा आणि आग्नेय आशियातील देशाचा दौरा हेच सुचवत आहे या देशांशी शाश्त्रात्रे विक्री तसेच व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध वृद्धीला राजकारणाचा विचार करता  साह्य होतील याबाबत करार केल्यानंतर भारताने आता आपला मोर्चा पॅसिफिक महासागरातील देशांकडे वळवला आहे

    जागतिक राजकारणाचा विचार करता जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू पश्चिम युरोप आणि अमेरिका या भागातून जाऊन भारताच्या आसपासच्या समुद्रकिनारा तसेच पॅसिफिक महासागरातील विविध बेट स्वरूपातील देश आणि पॅसिफिक महासागराला किनारा असणाऱ्या देशाभोवती केंद्रित झाला आहे भू राजनॆतिक शास्त्राचा विचार करता या भागाला इंडो पॅसिफिक म्हणतात.  याच इंडो पॅसिफिक भागातील अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांना आपले परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर हे ५ ते ११ ऑक्टोबर रोजी भेट देणार आहेत

  . परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या हा परराष्ट्रमंत्री म्हणून पहिलाच परदेश दौरा असेल या दोऱ्यात परराष्ट्र मंत्री ६ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न, यांच्याबरोबर एका कार्यक्रमात सहभागी होतील ऑकलंडमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमांत न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न, न्यझीलंड मध्ये वास्तव्यास असणाऱ्या भारतीय समुदायातीलविविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांचा सत्कार करतील तसेच आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत INDIA @75 हे  टपाल तिकिट प्रकाशित करण्यात येईल यावेळी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या हस्ते Modi@20: Dreams Meet Delivery’.हे पुस्तक प्रकाशित करण्यात येईल याच वेळी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या शीख समुदायासोबतचे विशेष बंध दर्शविणारे पुस्तक ‘हार्टफेल्ट - द लेगसी ऑफ फेथ’ चे प्रकाशनही करण्यात येणार आहे न्यूझीलंडच्या या दोऱ्याच्या वेळी आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर न्यूझीलंडच्या परराष्ट्र मंत्री नानाया माहुता, यांच्याशी विविध मुद्याबाबबत चर्चा करतील न्यझीलंडच्या 

परराष्ट्र मंत्री नानाया माहुता,यांच्याबरोबर चर्चा करण्याबरोबर डॉ एस जयशंकर विविध मंत्र्यांची देखील भेट घेतील या विविध मंत्रयामध्ये न्यझीलंडच्या Community & Voluntary Sector मंत्रालयाच्या मंत्री  प्रियांका राधाकृष्णन यांचा देखील समावेश असेल प्रियांका राधाकृष्णन  या भारतीय वंशाच्या न्यूझीलंडमधील पहिल्या मंत्री आहेत या खेरीज न्यूझीलंडमध्ये वास्तव्यास असणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्ती विद्यार्थी तसेच काही व्यावसायिकांचा देखील भेट घेतील व्यासायिकांशी ते व्यापार वृद्धीसासाठी चर्चा करतील या खेरीज वेलींग्टन मध्ये नव्यानेच बांधलेल्या भारतीय उच्चयुक्ताल्याच्या  (हाय कमिशनर ) इमारतीचे ते उद्घाटन करतील (कधी काळी युकेची वसाहत असणाऱ्या असणाऱ्या देशांनी एकमेकांच्या देशात उभारलेल्या दूतावासाला उच्चायुक्त म्हणतात ) 

      ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात आपले परराष्ट्र मंत्री सिडनी आणि मेलबॉर्न या शहराला भेट देतील डॉ एस जयशंकर यांच्या या २०२२ या वर्षातील हा दुसरा ऑस्टेलिया दौरा असेल या आधी फेब्रुवारी २०२२ मध्ये क्वाड परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी ते ऑस्ट्रेलियाला गेले होते क्वाड हा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली चीनच्या लष्करी हुकूमशाहीला  शह देण्यासाठी स्थापन कऱण्यात आलेला समूह आहे  ज्यामध्ये अमेरिका भारत जपान आणि ऑस्ट्रेलिया हे सदस्य देश आहे ऑस्ट्रेलियात डॉ एस जयशंकर 13 व्या परराष्ट्र मंत्र्यांचा फ्रेमवर्क डायलॉगमध्ये सहभागी होतील ज्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग. यांच्याशी चर्चा करतील यावेळी आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर ऑस्टेलियाचे  उपपंतप्रधान जे त्याचे सरंक्षण मंत्री  देखील आहेत अश्या रिचर्ड मार्ल्स. आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलातील अधिकारी आणि तेथील पत्रकारांशी संपर्क साधतील 

   या २०२२ वर्षाच्या सुरवातीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशात अनेक करार करण्यात आले आहेत त्यांचे मार्च महिन्यात पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीने भारताचा दौरा देखील केला होता त्यानंतर ऑस्ट्रेलियात

सत्तांतरण झाले नवीन पंतप्रधानांनी देखील मागच्याच पंतप्रधानची परंपरा पुढे चालवत भारताबरोबर विविध करार केले न्यूझीलंलंडच्या सध्याच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न या जगाला विविध नव्या संकल्पांची ओळख करून देण्यसासाठी परिचित आहेत महिलांना आपल्या मुलांना  स्तनपान करताना सामोरे जावे लागणाऱ्या समस्येकडे जागचे लक्ष जावे यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत आपल्या मुलांस स्तनपान केले होते त्याच्याच कार्यकाळात न्यूझीलंड जगातील पूर्णतः तंबाखूमुक्त पहिला देश होण्यसासाठी मोठ्या वेगाने वाटचाल करत आहे या दोन्ही देशात मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे नागरिक राहतात त्या पार्श्वभूमीवर विचार करता या दौऱ्यात भारताला  मोठ्या प्रमाणत फायदा होण्याची शक्यता आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?