पुढच्यास ठेच अन मागच्यास देखील ठेच

 


    सध्या महाराष्ट्रात परतीच्या मांसुमने अत्यंत धुमाकूळ घातला आहे . पुणे शहारत तर फ्लॅश फडाची स्थिती अनेक ठिकाणी दिसली आहे नाशिकमध्ये सुद्धा अत्यंत कमी काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे नाशिक आणि पुण्याखेरीज अन्य महाराष्ट्रात सुद्धा पावसाने कापणीस आलेल्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान केले आहे तसेच पेरणीस तयार असलेल्या रब्बी पिकाच्या बाबतीत सुद्धा  शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत  महाराष्ट्रातील या अडचणीचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास  "पुढच्यास ठेच अन मागच्यास देखील ठेच " असेच करावे लागेल . 

          या २०२२ वर्षाच्या सुरवातीपासूनच जगभरात अमेरिका ऑस्टेलिया , दक्षिण आफ्रिका , जपान फिलिपाइन्स ,पाकिस्तान . जर्मनी फ्रांस आदी अनेक देशात पावसाने आपला प्रताप दाखवत तेथील प्रशासनास अक्षरशः घाम फोडला होता . ऑस्ट्रेलिया देशातील क्वीन्सलँड व्हिटोरीया या राज्याच्या गव्हर्नसने गेल्या  एका हजार वर्षात  आमच्याकडे सध्या पडत आहे तसा पाऊस पडलेला नाही असे उदगार काढले होते. दक्षिण आफ्रिका देशातील जोहान्सबर्ग या शहराच्या जवळ पावसानेभूस्खलन होऊन ३५० लोक प्राणास मुकले होते . अमेरिका देशाच्या यलो

स्टोन राष्ट्रीय अभयारण्यामध्ये  पावसाने अमेरिकेच्या प्रशासनाच्या नाकात दम आणला होता . फिलिपिन्स देशामध्ये सातत्याने येणाऱ्या चक्रीवादळामुळे तेथील प्रशासन धास्तावले होते / आपल्या भरतात देखील ईशान्य भारतात मांसुमपुर्व पावसाने ठेवील पावसाचे अनेक वर्षाचे विक्रम मोडले होते . तेथील रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे पावसामुळे वाहून गेल्याचे चित्र समाज माध्यमांमध्ये त्यावेळीस विशेष प्रसिद्ध झाल्याचे आपणस आठवत देखील असेल 

या सर्व घटना आपणास पुढचे दिवस अत्यंत कठीण असल्याचे स्पष्ट करत होत्या . आपणास  पावसाच्या  संकटाच्या तयारीसाठी  तयारी करा अशा इशाराच त्यावेळी निसर्ग आपणस देत होता मात्र त्यावेळेस महाराष्ट्रात आणि भारतात कोणत्या मुद्यांवर रणकंदन सुरु होते याची आठवण काढल्यास  आपण या संकटाची किती तयारी केली हे समजून येईल आवण त्यावेळी ताजमहाल कि तेजोमहल ? ग्यानव्यापी मशीद , मथुरेचे कृष्ण मंदिर , शिवलिंग की पाण्याच्या कारंजांच्याचे यंत्र  यावर वाद विवाद करत होतो नुपूर शर्मा यांचेवादग्रस्त विधान यांनी त्यावेळी भारतात चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आले होते तर महाराष्ट्रात सत्तानाट्यालात दिवसोंदिवस रंग भरण्यात येत होते . या खोट्या

प्रतिष्ठेच्या आणि भावनेच्या मुद्यावर महत्वाच्या वेळ वाया घेतल्याची शिक्षा आता आपणस मिळत आहे जर आपण यातून काही शिकत आपले प्राधान्यक्रम निश्चित केल्यास आपण आपले अधिकचे नुकसान टाळू शकतो नाहीतर आहेच येरे माझ्या मागल्या 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?