भारत आणि सौदी अरेबिया संबंधांना येणार बळकटी

       

   सौदी अरेबिया . जगातील सर्वात जास्त तेल साठे असणारा देश , मुस्लिम बांधवांच्या प्रमुख तीन धार्मिक स्थानापैकी पहिल्या दोन क्रमांकाची   स्थान असलेल्या मक्का , आणि मदिना हि  पवित्र शहरे ज्या देशात आहेत तो देश म्हणजे सौदी अरेबिया ( तिसरे स्थान म्हणजे जेलुसरेम या  तिन्ही इब्राहिम रिलिजनसाठी {इस्लाम , ख्रिश्चन आणि ज्यू या तिन्ही धर्मांच्या  धर्म ग्रंथात उल्लेख असलेल्या इब्राहिम या देवदूतावरून या धर्मांना इब्राहिम रिलिजन म्हणतात }   पवित्र असणाऱ्या  शहरातील अल अस्का  मशीद ) ज्या देशाचे क्षेत्रफळ जगातील दहाव्या क्रमांकाचे असून देखील ज्या देशातून एकही नदी वाहत नाही तो देश म्हणजे सौदी अरेबिया , ज्या देशाच्या उत्तरेकडील काही भूभाग वगळता अन्य सर्व क्षेत्रात वाळवंट आहे तो देश म्हणजे सौदी अरेबिया . जो देश तेथील कडक कायद्यांमुळे प्रसिद्ध आहे तो देश म्हणजे सौदी अरेबिया . १९३२ साली अधिकृतरित्या स्थापन झालेला अद्याप राजेशाही असणारा राज्याच्या नावावरून देशाचे नाव असणारा देश म्हणजे सौदी अरेबिया .ज्या देशात स्थापनेपासून गेल्या ९० वर्षात संस्थापक राज्याच्या विविध मुलांनीच सत्ता सांभाळली तो देश म्हणजे सौदी अरेबिया महिलांना जगत सर्वात शेवटी वाहन चालवायची परवानगी देणारा देश म्हणजे सौदी अरेबिया 
      तर अश्या सौदी अरेबियाचे भावी राजे जे त्यांच्या सुधारणावादी  ,मतांमुळे विशेष चर्चेत असतात . तसेच देशाचे जे सध्या पंतप्रधान देखील आहेत असे प्रिन्स  एम बी एस या संक्षिप्त नावाने ओळखले जाणारे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे नोव्हेंबर महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत  त्यांच्या दौऱ्याची तारीख  अद्याप जाहीर झालेली नसली तरी १५ आणि १६ नोव्हेंबर महिन्यात इंडोनेशिया येथील बाली शहरात होणाऱ्या जी २० परिषदेला लागून त्यांचा दौरा असेल हे नक्की .विविध आंतराष्ट्रीय माध्यमांमध्ये या संदर्भात आलेल्या बातम्यांनुसार हा दौरा १४ नोव्हेंबर रोजी असेल या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रिन्स एम बी एस हे एकत्रच दौऱ्यासाठी बाली येथे प्रस्थान करतील मागील महिन्यात आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते जो त्याचा परराष्ट्र मंत्री म्हणून पहिलाच दौरा होता त्या दौऱ्यात त्यांनी मोदींचे भारत भेटीचे निमंत्रण त्यांना दिले त्या निमंत्रांवरूनच ते या दौऱ्यावर येत आहेत 
    प्रिन्स एम बी एस या नावाने प्रसिद्ध असेलेले प्रिन्स मोहंमद बिन सलमान हे देशाची परंपरावादी हि प्रतिमा पुसण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांनी देशात महिलाना मोठ्या प्रमाणत स्वातंत्र्य देण्यास सुरवात केली आहे सध्या जग ज्या प्रमाणत नैसर्गिक इंधनपासून दूर जात इलेट्रीक वाहनांकडे जात आहे तो कल ओळखून सौदी अर्थव्यवस्थेतील तेलाचे महत्व कमी करत सौदी अरेबिया देशाची अर्थव्यस्था उद्योग प्रधान करण्याकडे त्यांचा कल आहे  त्यांनी सौदीत नाच गाण्याचे  कार्यक्रम व्हावेत यासाठी केलेल्या कार्यक्रमासासाठी ते विशेष चर्चेत आले होते त्यांच्या वडिलांनी सध्याच्या राजाने त्यांना राजाच्या  अन्य मुलांच्या तुलनेत सातत्याने झुकते माप दिले आहे या झुकत्या मापामुळे देखील ते विशेष चर्चेत असतात असे प्रिन्स  मोहंमद बिन सलमान उर्फ प्रिन्स एम बी एस भारत भेटीवर येत आहे 
  आजमितीस सौदीत घर कामगार म्हणून म्हणून मोठ्या प्रमाणत भारतीय प्रामुख्याने त्यातही  केरळ राज्यातील लोक कार्यरत आहेत प्रिन्स एम बी एस याना ज्या प्रकारे सौदीत बदल घडवायचे आहेत त्यामध्ये त्यांना या भारतीयांची मदत मिळवणर हे सूर्य प्रकस्याइतके स्पष्ट आहे पाकिस्तानचे  जवळचे  मित्र म्हणून आखाती प्रदेशातील युनाटेड अरब अमिरात आणि सौदी अरेबिया हे दोन देश ओळखले जातात त्यापकी युनाटेड अरब अमिरात हा देश गेल्या काही वर्षात भारताचा बराच जवळ आला आहे आता दुसरा मित्र देश भारताचा जवळ येत आहे सौदी अरेबिया जगात सर्वात जास्त तेल उत्पादन करतोआपला भारत सर्वाधिक परकीय चलन तेल आयातीवर घालवतो दरवर्षी जगभरातुन हजारो मुस्लिम बांधव हज आणि उमरासाठी पवित्र अश्या मक्का आणि मदिना या शहारत येतात त्यांचे नियोजन सुलभतेने व्हावे यासाठी सौदी अरेबिया कडून प्रत्येक देशाला कोटा ठरवून देण्यात आला आहे गेल्याकित्येक वर्षांपासून हा कोटा वाढवण्यात यावा अशी भारतीय लोकांची मागणी आहे  त्या पार्श्वभूमीवर भारतासाठी देखील  सौदी अरेबिया हा देश महत्वाचा आहे त्या पार्श्वभूमीवर हा दौरा दोन्ही देशासाठी त्यांत महत्वाचा आहे हे नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?