जरा त्यांचा मार्ग अनुसरा

 

  सध्या आपल्या भारतात चलनी नोटांवर कोणाचे चित्र असावे, कोणाचे चित्र नसावे, यावरुन मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. लोक अत्यंत तावातावाने विविध पर्याय सुचवत आहेत. त्यावरुन तयार केलेली काही व्यंगचित्रे देखील समाजमाध्यमांमध्ये फिरत आहेत. या सर्व गदारोळात मला एक सर्वसामान्य व्यक्ती  म्हणून मला आजपासून 25 वर्षांपासून कवीवर्य कुसुमाग्रजांच्या सुप्रसिद्ध अस्या "स्वातंत्र्यदेवतेची विनवणी" या फटका स्वरुपातील कवीतेची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. स्वातंत्र्याला 50वर्ष पुर्ण झाल्याबद्दल स्वातंत्र्यदेवता भारतीयांना आता तरी हे दोष सोडा,असी विनंती करत आहोत असी कल्पना करुन एका दैनिकाच्या दिवाळी अंकासाठी ही कविता लिहली होती. त्यात सांगितलेल्या किती बाबीत आपण सुधारलो, किती बाबबत ढासळलो किंवा किती बाबत जैसे थे आहोत,हा मोठा संशोधनाचा विषय ठरावा, असो 
     या कवितेत त्यांनी  आपण थोर व्यक्तींची आदर्श कसे पायदळी तूडवतो हे स्पष्ट करताना सांगितले  होते की " पथापथावर थोरांचे पुतळे ,ही तर त्यांची विटंबना, जरा तरी त्यांचा मार्ग अनुसरा". आताच्या स्थितीत पुतळ्यांची जागा विविध चित्रांनी घेतलेली आहे, हाच तो काय फरक आहे. आपण ज्या महापुरुषाचे चित्र नोटेवर असावे, असे सांगत आहोत,त्यांचे विचार आपण खरच आत्मसात केले आहेत का? त्यांचा विचाराचा आपण किती अभ्यास केला   
आहे?,याचा स्वतःशीच विचार केल्यास समोर येणारे चित्र फारसे समाधानकारक नसेल. आपणास महान वाटणाऱ्या व्यक्तीचे विचार दुसऱ्यांपर्यत पोहोचवण्यासाठी अन्य कितीतरी मार्ग आहेत. त्यासाठी नोटेचा पर्याय वापरणे चूकीचे आहे.
    पुर्वी पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे दंगली झाल्याचा इतिहास आहे. त्या पार्श्वभूमीवर विचार करता नोट चलनात आल्यावर ती विविध कार्यासाठी, विविध लोकांकडून वापरण्यात येणार .या प्रक्रीयेत जर एखाद्या व्यक्तीकडून तीचा अयोग्य वापर झाला, आणि त्यामुळे समाजमन व्यथीत झाले,तर त्या प्रकारच्या सर्व नोटा सरकार मागे घेणार का? जर चलन अचानक मागे घेतले तर अर्थव्यवस्थेवर काय परीणाम होवू शकतात ,हे आपण नोटबंदीच्या काळात अनुभवले आहेतच. तसे जर वारंवार करावे तर अर्थव्यवस्था कायमस्वरूपी खड्ड्यात गेलीच म्हणून समजा .
काही जण अमेरीकेच्या चलनी नोटांवर विविध नेत्यांची चित्रे असल्याचे आणि तो प्रयोग तिथे यशस्वी झाल्यामुळे भारतात देखील अमंलात आणायला हवा, असे सुचवतील.त्यांना मी सांगू इच्छितो की, त्यांचा सर्व नोटांवर त्यांच्या माजी राष्ट्राध्यक्षांची चित्रे आहेत.मात्र आपल्याकडे जी चित्रे हा लेख लिहण्यापर्यत सुचवण्यात येत आहेत, तिथे भारताच्या माजी पंतप्रधांनाची चित्रे अत्यंत कमी आहेत. तसेच काही नेत्यांबाबत काही आक्षेप देखील आहेत, सबब
अमेरीकेतील प्रयोग भारतात यशस्वी होणे अशक्य आहे . महात्मा गांधी यांच्या चित्राच्या आधी  चलनी नोटेवर तिथे सारनाथ येथील अशोकस्तंभाची प्रतीकृती असे त्याप्रमाणे भारताच्या सार्वभौमत्वाच्या प्रतिकांचे छायाचित्र तिथे लावता येईल. मात्र त्याठिकाणी जर एखाद्या व्यक्तीचे चित्र लावायचे झाल्यास महात्मा गांधीचेच चित्र लावणे अधिक योग्य ठरेल, असे मला वाटते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?