जो बायडन यांच्या पुढील मार्ग सुकर की अवघड ?

     


 अमेरिकी अध्यक्ष जो बायडन यांच्या पुढील  २ वर्षाचा मार्ग हा सुकर असेल कि अवघड ? याचा निर्णयाची वेळ जवळ आली आहे कारण येत्या ८ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत मिड टर्म इलेक्शन होणार आहे .ज्यादारे  अमेरिकन संसदेच्या अर्थात काँग्रेसच्या आपल्या लोकसभा समकक्ष हाऊस ऑफ रेपेझेंटिव्ह च्या सर्वांच्या सर्व ४३५ जागांसाठी आणि आपल्या राज्यसभा समकक्ष सिनेटच्या ३५ जागांसाठी तसेच ३९  स्टेट आणि टेरेटरीच्या गव्हनरच्या निवडीसाठी मतदान होईल . अमेरिकेत ५० राज्य आणि अमेरिकेच्या स्वर्वभौत्मवाच्या अंतर्गत जगभरात  ५ टेरेटरी आहेत अमेरिकन संविधानानुसार या टेरेटरीस राज्याचा दर्जा नाहीये एक स्वतंत्र्य प्रणालीद्वारे त्यांच्या कारभार बघितला जातो तर अश्या एकूण ५५ गव्हांरपैकी ३९ गव्हर्नरनाची निवड करण्यासाठी अमेरिकन नागरिक ८ नोव्हेंबर रोजी मतदान करतील  

        अमेरिकेत अध्यक्षीय शासनव्यस्था आहे ज्यानुसार  अमेरिकन अध्यक्ष आणि तेथील विधिमंडळ या पूर्णतः स्वतंत्र मात्र एकमेकांशिवाय कार्य करू शकणाऱ्या बाबी आहेत . अमेरिकेत दर वर्षांनी अध्यक्षाची निवड होते  अध्यक्षांची मुदत दोन वर्ष पूर्ण झाल्यावर अमेरिकन विधिमंडळाची निवडणूक होते या विधीमंडळाची मुदत वर्ष असते . २०२०साली अमेरिकन अध्यक्ष निवडून आल्यामुळे या २०२२ वर्षी तेथील विधिमंडळाची निवडणूक होत आहे या निवडणुकीस अमेरिकेत  मिड टर्म इलेक्शन म्हणतात या निवडणुकीद्वारे तेथील आपल्या लोकसभा सदृश्य हाऊस ऑफ रेपेझेंटिव्ह च्या सर्वांच्या सर्व जागांसाठी तर आपल्या राजुयसभा समकक्ष सिनेटच्या / जागांसाठी निवडणूक होते (अमेरिकेत दर दोन वर्षांनी / सिनेट सदस्य निवडले जातात {आपल्या राज्यसभेसारखेरच }) या निवडणुकीला अध्यक्षांचा कारभार कशी प्रकारे चालू आहे याची एक चाचणी म्हणून बघितले जाते जर

राष्ट्राध्यक्षांच्या पक्षाला मते जास्त मिळाली तर अध्यक्षांचा कारभार उत्तम सुरु आहे असे समजले जाते पुढील राष्ट्राध्यक्ष कोणत्या पक्षाचा असेल याचाअंदाज या निवडणुकीद्वारे बांधला जाऊ शकतो . त्यामुळे या निवडणुकीला अमेरिकेत अत्यंत महत्व आहे अमेरिकेच्या प्रशासनची वाटचाल पुढील दोन वर्षे कशी असेल ?याचा निर्णयच या निवडणुकीतून होतो असे म्हटल्यास वावगे ठरू नये

  सध्या ज्या जनमत चाचण्या प्रसिद्ध होत आहेत त्यानुसार हाऊस ऑफ रेपेझेंटिव्हमध्ये विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांच्या डेमोक्रेक्तिक पक्षाला बहुमत गमवावे लागू शकते मात्र ,सिनेटमधील त्यांचे बहुमत कायम राहू शकते अमेरिकेत अध्यक्षाला आपल्या निर्णयास तेथील विधिमंडळाची [ ज्याला काँगेस असेसंबोधतात ] मंजुरी घ्यावीच लागते तो निरंकुश नाही तसेच काँग्रेस स्व अधिकरानुसार अध्यक्षाला एखदा  निर्णय घेण्यास भाग पाडू शकते त्यामुळे तेथील राष्ट्राध्यक्षाला या  मिड टर्म इलेक्शनमध्ये स्वःतच्या पक्षाला बहुमत मिळाल्यास कारभार करणे सोईस्कर ठरत असल्याने त्यांचा प्रयत्न स्वःताच्या पक्षाला बहुमत देण्याकडे असतो 

       अमेरिकेच्या निर्णयाचे जगावर चांगले वाईट परिणाम होता. उदाहरण म्हणून आपल्या रिझर्व बँकेच्या समकक्ष असलेल्या अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या निर्णयामुळे सध्या  अमेरिकी डॉलर अन्य चलनाच्या तुलनेत अधिक ऊत्तम कामगिरी करत आहे याचे घेऊ शकतो . डॉलर मजबूत होण्यामुळे भारताच्या राजकारणावर देखील परिणाम होत आहे हे आपण जाणताच . तसेच रशिया आणि युक्रेन युद्धासारख्या घटनेत काय होणार ? अथवा दर वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होणाऱ्या कॉर्प या हवामान बदलाविषयक परिषद किती यशस्वी होणार ? सारख्या अनेक बाबी अमेरिकेच्या मतानुसार ठरतात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये प्रत्येक देशाला काही प्रमाणात मताधिकार दिला आहे यामध्ये कोणताही निर्णय होण्यसासाठी किमान १७ टक्के मते आवश्यक आहे अमेरिकेचा

यातील वाटा आहे ८५ % टक्याचा म्हणजेच आंतराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये अमेरिका किती महत्त्वाची आहे हे लक्षात येते अंतराष्ट्रीयन नाणेनिधीप्रमाणेच जगात अनेक संस्था आहेत ज्यामध्ये अमेरिकेशिवाय पान हलत नाही प्रत्यक्ष किंवा अपरित्यक्षरित्या अमेरिका त्यामध्ये लागतेच  त्यामुळे या प्रश्नबाबत अमेरिका काय भूमिका घेणार ? हे ठरणाऱ्या बाबी फक्त अमेरिकाच अंतर्गत प्रश्न राहत नाही त्यास जगातील स्वरूप प्राप्त होते त्यामुळे नोव्हेंबरच्या निवडणूका देखील आपल्या भारतासासाठी महत्वाच्या आहेत 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?