बुद्धिबळातील महासत्ता भारत

           

   बुद्धिबळातील महासत्ता भारत आहे ,हे सिद्ध करणाऱ्या घटना सध्या  वारंवार प्रत्ययास येत आहे . नाशिकचे आयकॉन  ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या युरोपीय क्लबमध्ये चमकदार कामगिरी करत जागतिक क्रमवारीत १० क्रमकांची झेप घेत पुन्हा एकदा जगातील पहिल्या २५ खेळाडूंच्या क्रमवारीत स्थान मिळाल्यामुळे समस्त बुद्धिबळपटू आनंदात असताना , बुद्धिबळाची आंतराष्ट्रीय संघटना फेडरेशनइंटरनॅशनल दि इचेस अर्थात फिडे कडून जाहीर करण्यात आलेल्या जागतिक क्रमवारीमुळे दुग्धशर्करा योगाचीच प्रचितीच येत आहे .आजमितीस पुरुष खेळाडूंचा विचार करता जगातील पहिल्या ३५ खेळाडूंमध्ये ५ खेळाडू आहेत तर महिला खेळाडूंचा विचार करता पहिल्या ३५ खेळाडूंमध्ये ३ खेळाडूंचा समावेश आहे जर सांघिक कामगिरीचा विचार केला तर भारत पुरुषांचा आणि महिलांचा गटात  तिसऱ्या स्थानी आहे तर या वर्षांपासून सुरु करण्यात आलेल्या महिला आणि पुरुषांच्या एकत्रित सांघिक कामगिरीचा विचार करता सुद्धा भारत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर
आहे .अनेक भारतीय बुद्धिबळपटूंनी गेल्या काही महिन्यात अनेक बुद्धिबळ स्पर्धा खिश्यात घातल्या आहेत नुकतीच महिलांच्या विश्वविजेते स्पर्धेसाठी आव्हानवीर ठरवण्यासाठी घेण्यात आलेल्या महिलांच्या कॅन्डीडेट स्पर्धेत भारताची आघाडीची महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी या अ गटातून उपांत्य फेरीत अत्यंत छोट्या फरकामुळे स्पर्धेबाहेर पडल्या  कोनेरू हम्पी  या जागतिक महिला रॅपिड प्रकारात विश्वविजेत्या आहेत  भारत जगातील महासत्ता असल्याचे यातून सिद्ध होत आहे 

       आपल्या भारतात सी फॉर क्रिकेट असे समजले जाते त्यामुळे एका हाताच्या एका बोटावर मोजता येतील इतक्याच देशात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट या खेळाला अनन्य  साधारण महत्व देण्यात येते मात्र त्यामुळे जगात १८० हुन अधिक देशात खेळल्या जाणाऱ्या बुद्धिबळ या खेळात भारतीय किती उत्तम कामगिरी करत आहेत हे दुर्लक्षिले जाते क्रिकेटपटूंना विविध जाहिरातीत कंपन्या आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी देतात मात्र बुद्धिबळपटूंना ती संधी दुर्दैवाने मिळत नाही माध्यमेही दुर्दैवाने त्यास योग्य ती प्रसिद्धी देत नाही  भारत निव्वळ शारीरिक खेळातच नव्हे तर बौद्धिक क्षेत्रात सुद्धा दादा
आहे हि बाब अनेक भारतीयांना माहिती नाही  बुद्धिबळ या बौद्धिक जोखणाऱ्या खेळात भारत महासत्ता आहे हि बाबच बहुसंख्य भारतीयांपासून दूर राहते 

सध्याचा काळात विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना खूप महत्व आले आहे या स्पर्धा परीक्षेत अधिकाधिक गुण निवळण्यासाठी कमीत कमी वेळेत अचूक निर्णय घेण्याची क्षमता विकसित करायला आपणस सांगितले जाते बुद्धिबळ या खेळात हि क्षमता खेळाचा भाग म्हणून विकसित होते त्यामुळे अधिकाधिक युवकांनी बुद्धिबळ
खेळायला पाहिजे ज्यामुळे विविध शालेय परीक्षेत अतिरिक्त गुण मिळण्यासह स्पर्धा परिक्षेचत यशस्वी होणाच्या कौशल्यात देखील वाढ होते अशा दुहेरी फायदा अन्य खेळात सहजतेने मिळू शकत नाही जर अधिकाधिक लोकांनी बुद्धिबळ खेळायला लागलो तर भारत जगातील महासत्ता आहे हि बाब माध्यमांना लक्षात घ्यावीच लागेल ज्यामुळे बुद्धिबळाचा देखील विकास होईल तो वेगळाच 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?