परंपरा विनाखंडीत चालू

   


     पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानांच्या ते पदावरून मुक्त झाल्यावर काय झाले ? याचा आढावा घेतल्यास एकतर त्यांची हत्या झालेली दिसते किंवा त्यांना पाकिस्तान सोडून युनाटेड किंगडम अथवा आखाती देशात शरण घ्यावी लागल्याचा इतिहास आहे पाकिस्तानमधील कोणताच पंतप्रधान या चक्रातून सुटून पंतप्रधानाच्या पदावरून कार्यमुक्त झाल्यावर शांततेत निजधामाला गेलेला नाही . याच वर्षाच्या एप्रिल महिन्यात  अविश्वासाच्या प्रस्तावाद्वारे पदावरून दूर करण्यात आलेले इम्रान खान सुद्धा या चक्रातून सुटलेले नाहीत  गुरुवारी त्यांच्या हकिकी आझादी या आंदोलादरम्यान इम्रान खान यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने हि गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे

 पाकिस्तानी पंजाबची राजधानी लाहोर पासून सुमारे दीड तासाच्या अंतरावर असेलेल्या पाकिस्तानी पंजाबच्या पूर्वेला असणाऱ्या वझीराबाद या शहरात अल्लावाला चौकातील पक्षाच्या तात्पुरत्या स्वरूपात स्थापन केलेल्या स्वागत कक्षाच्या जवळ इम्रान खान यांच्यावर हल्ला करण्यात आलेला असून त्यांना पायाला दुखापत झाली आहे . त्यानां उपचारासाठी लाहोर येथे हलवण्यात आले आहे . इम्रान खान यांच्याबरोबर असणाऱ्या पक्षातील दोन ज्येष्ठ नेत्यांना देखील दुखापत झाली आहे घटनास्थानवरून पोलिसांनी एकाला अटक केली असून त्यास अज्ञातस्थळी

हलवल्याचे वृत्त द हिंदूने स्वतःला पाकिस्तानमधील पहिली वृत्तवाहिनी असे संबोधणाऱ्या जिओच्या संदर्भ देऊन दिले आहे या हल्ल्यात एक जण मृत झाला असल्याचेही सांगण्यात येत आहे मात्र तो हल्लेखोर होता की आंदोलनात असणारी व्यक्ती होती याबाबत हा लेख लिहण्यापर्यंत माहिती नव्हती 
२८ ऑक्टोबरपासून लाहोर या शहरातील लिबर्टी चौकातून   सुरु झालेल्या  या महामोर्च्याच्या  आधीच्या वेळापत्रकानुसार ५ नोव्हेंबरला पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असणाऱ्या रावळपिंडी येथे पोहोचणार होते पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि रावळपिंडी हि जुळी शहरे आहेत इस्लामाबाद  येथी अंतरराष्ट्रीय विमानतळ  मुळात रावळपिंडी महानगरपालिकेच्या हद्दीत आहे रावळपिंडी या शहरता आल्यावर ते इस्लमबाद शहारला वेढा घालून बसणार होते मात्र हकिकि आझादी या स्वतःच्या आंदोलनाला मिळणारा मोठा प्रचंड  पाठिंबा बघून लाहोर ते इस्लामाबाद या ३५० किमीच्या प्रवाश्यासाठी इम्रान खान यांनी मूळच्या एक आठवड्यासाठीच्या,नियोजनात बदल करत वीस पंधरा दिवस घेण्याचे ठरवले या वाढलेल्या दिवसमुळे त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता वाढत असल्याच्या बातम्या आंतराष्ट्रीय माध्यमातून देण्यात येत होत्या गुरुवारी हि शक्यता वास्तवात उतरली आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानाची परंपरा विना खंडित सुरु राहिली 

पाकिस्तानची आर्थिक स्थिती आजमितीस अत्यंत डळमळीत आहे त्यामुळे या राजकीय अस्थिरतेचा मोठा परिणाम पाकिस्तानवर होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पस्ष्ट आहे काही जण याच्यामुळे पाकिस्तान फुटणार असल्याचे सांगत आहे मात्र पाकिस्तान या आंदोलनामुळे फुटणार नाही. चीनने पाकिस्तानात मोठ्या प्रमाणत आर्थिक गुंतवणूक केली आहे ती चीन सहजासहजी वाया जाऊ देणार नाही चीनच्या शत्रू असलेल्या आपल्या भारताला त्रास देता यावा म्हणून चीन पाकिस्तान अखंड राहण्यासाठी प्रयत्न करेलच तसेच अमेरिकेचा मध्य आशियातील स्वार्थ बघता अमेरिका तसे

होऊ देणार नाही भारताला देखीलफुटलेला पाकिस्ताम परवडणारा नाही एकाद्या दरवाज्याची काच ज्याप्रमाणे कमीत कमी फुटणे ही ती हाताळण्यासाठी आवश्यक असते तसेच पाकिस्तान जर फुटला तर भारताची डोकेदुखी प्रचंड स्वरूपात वाढेल त्यामुळे सध्याचे राजकीय संकट लवकरात लवकर संपण्यातच भारताचे हित आहे भारतीयांनी सुद्धा यासाठीच प्रथम करणे आवश्यक आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?