६ नोव्हेंबरपासून इजिप्त मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?

येत्या ६ नोव्हंबरपासून इजिप्तमधील शर्म अल-शेख, या शहरात हवामानबदलाविषयीची अत्यंत महत्त्वाच्या अश्या कॉप  परिषदेच्या २७ व्या  अधिवेशनाला सुरवात होईल .जे १८ नोव्हेंबर पर्यंत चालेल . हवामान बदलाविषयी जगात जे कार्यक्रम चालतात त्यामध्ये कॉप अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे जवळपास पहिल्या क्रमांकाचे महत्त्वाचे आहेत .संयुक्त राष्टसंघाने मागील वर्षी अर्थात २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार  येत्या भविष्यात हवामान बदलामुळे जगात सर्वात प्रभावित होणार देश आपला भारत आहे त्यामुळे या हवामान बदलाविषयी घडणाऱ्या या जागतिक परिषेदेची माहिती असणे आपल्या भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचे आहे 

तर जगाला हवामानबदल हे जागतिक संकट असल्याची जाणीव होऊन या बाबत काहीतरी करायला हवे ही जाणीव सर्वप्रथम १९७२ साली झाली त्यावर्षी स्टॉकहोम या शहरात पहिली अर्थ समिट झाली . त्यानंतर पुढील २० वर्ष हवामानबदलाविषयी फारश्या घडामोडी घडल्या नाहीत पुढे १९९२ साली जगाला मानवी हस्तक्षेपामुळे पृथीच्या हवामानाची हानी होत असून ती सुधारणे हे मानवाचे कर्तव्य असल्याचे प्रकर्षाने जाणवले आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने रिओ दि जानोरो या शहरात युनाटेड नेशन फ्रेमवर्क फॉर क्लायमेट चेंज या व्यासपीठाची स्थापना 

करण्यात आली १९९२ साली झालेले  हे अधिवेशन रिओ समिट म्हणून प्रसिद्ध आहे या रिओ समिट मध्ये हवामान बदलाविषयी ठोस कृती कार्यक्रम १९९२ मे ९ रोजी ठरवण्यात येऊन १९९२ जून ३ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्य देशांनि त्यास मान्यता देण्यसासाठीदेशांची सही करण्यासाठी खुला करण्यात आला ज्यावर सर्व सदस्य देशांची सही होण्यसासाठी १९९४ मार्च २१ हा दिवस उजाडला या ठोस कार्यक्रमावर ज्या देशांनी सही केल्या त्यांचा एक गट स्थापन करण्यात आला त्यास कॉन्फरन्स ऑफ पार्टिज या नावाने ओळखतात . कॉन्फरन्स ऑफ पार्टीज या इंग्रजी शब्दाचे पहिले अक्षर घेऊन COP  हा शब्द तयार करण्यात आला आहे ज्याचा उच्चार कॉप करतात १९९४ साली सर्व देशांनी मान्यता दिल्यावर १९९५ पासून २०२० वर्षाचा अपवाद वगळता दर वर्षी जगभरातील सर्व देश हवामान बदलाविषयी काय करता येईल हे ठरवण्यासाठी एका शहरात एकत्र येतात त्यास कॉप अधिवेशन म्हणतात १९९५ साली पहिल्यांदा हे अधिवेशन झाले त्यास कॉप १ नावाने ओळखतात त्यानंतर कॉप २ ,कॉप ३ या नावाने हे अधिवेशन सुरु आहे जे दर वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येते या वर्षी असणारे अधिवेशन २७ आहे जगाला या दहिवेषांत ठोस काहीतरी होईल अशी अशा आहे जगाची ही आशा खरच फलद्रुप होते का ? हे लवकरच समजेल तोच पर्यंत आपण धीर धरायला हवा हे नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?