पाकिस्तान पुन्हा एकदा अस्थिरतेचा गर्तेत

     

    पाकिस्तान अस्थिरतेचा गर्तेत सापडल्याचे तेथून येणाऱ्या बातम्यांनी स्पष्ट होत आहे .  3 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तानचा प्रमुख विरोधी पक्ष "पाकिस्तान तेहरीके इन्साफ " चे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांच्यावर त्यांनी सुरु केलेल्या हकीकी आझादी या महामोर्च्यादरम्यान वझीराबाद या शहारत प्राणघातक हल्ला झाला . या हल्ल्यासासाठी इम्रान खान यांनी पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाबाझ शरीफ , गृहमंत्री राणा सलाउल्ला ,आणि पाकिस्तानची गुपचर संस्था आय एस आय चे प्रमुख जवाबदार आहेत अशा आरोप केला .या हल्ल्याच्या तपास पोलिसांनी करावा या हेतूने इम्रान खान यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांती एफ आर आय मध्ये पाकिस्तानी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची नवे समाविष्ट करण्यासाठी हरकत घेतली त्यामुळे हल्ला होऊन  ७२ तास उलटले तरी पोलिसांनी तकार दाखल करून घेतलेली नाही या दरम्यान हल्ल्यातून सावरत ८ नोव्हेंबरपासून त्यांचा महामोर्चा हल्ला झाला त्या ठिकाणावरून पुन्हा सुरु करत पुढील १० ते १२ दिवसात पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडी सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांचा भाषेत पिंडी {जसे अहमदनगरला सर्वसाधारणपणे नगर म्हणतात }) या शहरात आणण्याचा मसुदा त्यांनी ६ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत जाहीर केला . या १० ते १२ दिवसात ते दररोज लाहोरहुन महामोर्च्यात सहभागी असणाऱ्या जनतेला संबोधित करणार आहेत जेव्हा हा महामोर्चा रावळपिंडीला पोहोचेल ततोपर्यंत इम्रान खान यांची तब्येत बरीच सुधारेल अशी आशा आहे त्यामुळे ते त्यावेळी महामोर्च्यात सहभागी होऊन रावळपिंडीमार्गे इस्लामाबादला कूच करतील दरम्यान सोमवार ७ नोव्हेंबर रोजी सकाळी पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने पुढील २४तासत पाकिस्तानी पंजाबच्या पोलिसांना इम्रान खान यांची तक्रार दाखल करून घेण्याची तसेच पाकिस्तानी पंजाबच्या पोलीस महासंचालकांना तक्रर दाखल करून घेण्यास इतका  उशीर का झाला ? याविषयी लेखी उत्तर मागितले आहे   माजी पंतप्रधांवर आंदोलनदरम्यान हल्ला होतो ज्याचा आरोप विद्यमान पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यावर होतो या घटनेवरून पाकिस्तानची राजकीय स्थिती कशी आहे ? यांचा अंदाज येतो .
         मुळात पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच पाकिस्तान अस्थिरतेचा चक्रव्यहत सापडलेला आहे जो आता यातून बाहेर पडत खऱ्या अर्थाने लोकशाहीचा मार्गावर चालत  असल्याचे वाटत असताना ही अशा फोल ठरल्याचे दिसून 
येत आहे .पाकिस्तानमधील लोकशाहीला असणारा रक्तलांछित लोकशाहीचा डाग हा सध्या सुद्धा पुसला गेला नसल्याचे या घटनेपासून आपणस दिसते पाकिस्तानमध्ये सातत्याने तेथील राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची हत्या झाल्याचा किंवा अपघाती रहस्यमय मृत्यू झाल्याचा इतिहास आहे तो खंडित ना होता पुढे सुरु  राहिल्याचे इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यातून सिद्ध होत आहे 
      पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचे राष्ट्रपिता मोहंमद अली जिना यांनी केलेल्या चुकांपासुन ही  परंपरा सुरु होते . भारतात पं[प्रधानपदी जवाहर नेहरू आले तर व्हाईसरायपद लॉर्ड माउंटबॅटन यांनी सांभाळले पाकिस्तात त्यांचे महत्त्वाचे  नेते मोहम्मद अली जिना यांनी व्हाईसरायपदी ब्रिटिशांकडून  स्वतःची नेमणूक करून घेतली तर आपला एका साथीदार लिकायत अली खान यांची  पंतप्रधानपदी नेमणूक केली  सध्याच्या शासनव्यस्थेनुसार राष्ट्रपती जसे नामधारी प्रमुख असतात सगळी सत्ता हि पंतप्रधानपदी असते  त्याच प्रमाणे तेव्हा सर्व सत्ता पंतप्रधानाच्या हाती होती तर व्हाईसराय हे नामधारी प्रमुख होते भारताच्या पंत्रप्रधानपदी असलेल्या जवाहरलाल नेहरूयांच्याकडे देशाची वाटचाल कशी करायची ? याबाबत पुरेशी स्पष्टता होती तसेच कार्यकारी अधिकार त्यांच्याकडे होते या उलट स्थिती पाकिस्तानकडे होती त्यांच्याकडे देशाची भविष्यातील वाटचाल कशी असेल याबाबत पुरेशी स्पष्ट कल्पना असलेले मोहमद्द अली जिना हे व्हाईसरायहोते ज्या पदाला  कार्यकारी अधिकार नव्हते तर कार्यकारी अधिकार असलेले लिकायत अली खान यांच्याकडे पाकिस्तानची वाटचाल कोणत्या प्रकारे करायची याबबाबत स्पष्टता नव्हती त्यामुळे सुरवातीपासून देशाचा सरकारी प्रमुख (व्हाईसराय /राष्ट्रपती ) आणि देशाचा कार्यकारी प्रमुख (पंतप्रधान ) यांच्यात प्रचंड मतभेद झाल्याने पाकिस्तानात  लोकशाही रुजलीच नाही जर पायाच कमकुवत असेल तर इमारत सक्षम कशी होणार ? याऊलट भारतात देशाचा सरकारीप्रमुख आणि
कार्यकारी प्रमुख यांच्यात वादंग फारसे झाले नाहीत त्यामुळे देशात लोकशाही रुजू शकली ज्याची  गोड फळे आपण आता चाखत आहोत  दुसऱ्या महायुद्धनंतर सुमारे ९० देश वसाहतवादतून स्वतंत्र्य झाले त्यांची आताची स्थिती बघता  पंडित नेहरूंचे भारतात लोकशाही  रुजवायचे योगदान नाकारता येत नाही 
            ब्रिटिश भारतात डिसेंबर १९४६ रोजी ब्रिटिश भारतात संविधानसभेची प्रक्रिया सुरु झाली . संविधानसभेची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सुमारे ९ महिन्यात देशाला स्वतंत्र मिळले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर दोन्ही देशांच्या  संविधान सभा स्वतंत्र झाल्या त्यानंतर आपण पुढील दोन वर्षात आपली संविधान निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली या उलट पाकिस्तानची संविधान निर्मितीची प्रक्रिया १९५६ पर्यंत म्हणजेच पुढे आठ वर्षापर्यंत चाललीआपल्या भारतात १९६४ पर्यंत एकच पंतप्रधान होते याउलट पाकिस्तानात १९५८ पर्यंत सात पंतप्रधान झाले तेथील व्हाईसरायने  हा आपल्यपेक्ष वरचढ होईल या भीतीने अनेक पंतप्रधांना सत्ता सोडण्यास भाग पडले पंडित नेहरूंनी मी जेव्हढा वेळात माझा सदरा बदलत नाही त्यापेक्षा जास्त वेळात पाकिस्तानचा पंतप्रधान बदलला जातो असे उद्गार काढले होते  तसेच पाकिस्तानचे संस्थापक मोहंमद अली जिना यांचे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १ वर्ष १ महिन्यानंतर ११ सप्टेंबर रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात देशाची वाटचाल कुठे नेयची याबाबत त्यांच्यामध्ये मतभेद होते .याउलट देशाची वाटचाल कुठे नेयची याची जाण असलेल्या भारतीय नेत्यांना प्रचंड आयुष्य मिळाले  देशाचा कार्यकारी प्रमुख सातत्याने बदलल्याने पाकिस्तानच्या लोकशाहीहीची जडणघडण योग्य पद्धतीने होऊ शकली नाही याउलट स्थिती भारताची होती
        पाकिस्तानी राजकर्त्याचे मतभेत पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यातली संसद सदस्याचा समतोल साधताना देखील झाला . त्यावेळच्या पूर्व पाकिस्तान (आताच बांगलादेश ) आणि त्यावेळचा पश्चिम पाकिस्तान (आताच पाकिस्तान ) यांच्यातील लोकसंख्या समान होतीपूर्व पाकिस्तात जवळपास सर्वच संख्या बंगाली भाषिकांची होती तर पश्चिम पाकिस्तानात पंजाबी ,सिंधी ,पठाणी , बलुची असे विभाजन होते लोकसंख्येचा समतोल साधण्यासाठी त्यांनी पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन प्रशासकीय रचना केली पश्चिम पाकिस्तानातील विविध समाजघटकांना एकत्र केल्याने या समाजघटकांमध्ये दुसऱ्या समाजघटकांमुळे अन्याय होतो हि भावना निर्माण झाली जिचे निराकारण करणे पाकिस्तानी राजकारणी व्यक्तींना जमले नाही पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान अशी रचना  केल्यावर कालांतराने त्यांनी पश्चिम पाकिस्तान मधील असंतोष कमी करण्यासाठी   मोडली मोडल्यावर पुन्हा एकदा केली दुसऱ्यांदा केल्यावर पुन्हा एकदा मोडली या पाकिस्तानच्या राजकारनिय व्यक्तींच्या पोरखेळ सदृश कृतीने पाकिस्तानी राजकारणी व्यक्तींविषयी नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली त्यामुळे लोकशाहीत असणाऱ्या स्वातंत्र्याला तिलांजली देणारी लष्करशाही पाकिस्तानी जनतेने जवळ केली मात्र त्यामुळे पाकिस्तानात लोकशाही रुजू शकली नाही भारतात मात्र राज्य निर्मिती करताना योग्य ती काळजी घेतल्याने कोणतंही एक राज्य जास्त प्रबळ झाले नाही 
       ज्यामुळे पाकिस्तानात लोकशाहीचा खेळ खंडोबा झाला जो अजून देखील सुरु असल्याचे तेथून येणाऱ्या बातम्यांमधून स्पष्ट होत आहे जो  एक देश एक भाषा एक संस्कृतीचा नारा देणाऱयांसाठी एक इशाराच म्हणता येईल भारतात असणाऱ्या विविधतेला भारतात योग्य ती वागणूक देण्यात आली याउलट पाकिस्तानमधील विविधता मात्र मारण्यात आली ज्याची विषारी फळे आज पाकिस्तान भोगतोय . भारतीयांनी आपल्या या भावाकडून धडा घेत वाटचाल करण्यातच त्यांचे हित आहे ,हे नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?