येता पंधरवडा पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा

   


    नोव्हेंबर महिन्याचा दुसरा पंधरवडा पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे . पाकिस्तानमधील राजकीय संकट कोणते वळण घेते आणि राजकीय संकटामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती कशी होते ? हे या पंधरा दिवसात पूर्णतः नाही मात्र बऱ्याच मोठ्या प्रमाणत स्पष्ट होईल . पाकिस्तानमधील सत्तेच्या वर्तुळात एस्टाब्लिमेन्ट असा उल्लेख होत असलेला घटक अर्थत पाकिस्तानच्या लष्कराच्या  प्रमुखपदी सध्या असणाऱ्या जनरल करीम वाजवा यांची मुदत २८ नोव्हेंबर रोजी संपत आहे त्यांच्या जागी कोणाची नेमणूक कार्याची ? याबाबत घडणाऱ्या राजकारणाने सध्या सर्वोच्च पातळी गाठली आहे विद्यमान पंतप्रधानां शाहबाझ शरीफ यांची पुतणी आणि आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाझ हिने लष्करातील एका  भावी ज्येष्ठ उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे उघड उघड नाव घेतल्याने हे नाट्य काहीसे  चिघळले आहे पाकिस्तानी लष्करातील ५ ज्येष्ठ अधिकाऱ्यांपॆकीच एक लष्करप्रमुख होणार असला तरी त्यापैकी एका अधिकाऱ्याचे नाव मरियम यांनी घेयला नको  होते  असे मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे या मुळे विद्यमान सरकारकडून पात्रतेला डालवून स्वतःच्या मर्जीतील व्यक्तींची नेमूणक करण्यात येते या   इम्रान खान यांच्याकडून करण्यात येणाऱ्या आरोपाला पुष्टी मिळत असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटत आहे 

    पाकिस्तानचे लष्करप्रमुख नेमण्याचा पंतप्रधानांचा अधिकार तसाच ठेवत या निवड प्रक्रियेत सुधारणा करण्यात याव्यात अशी इम्रान खान यांची मागणी आहे तर विद्यमान  पंतप्रधान शाहबाझ शरीफ  यांनी कोणत्याही स्थितीत पंतप्रधान यांचाबाबतील अधिकार कमी करता येणार नाही आणि मी या प्रकरणी कोणाचेही काही ऐकणार नाही आतापर्यंत ज्या पद्धतीने पाकिस्तानात लष्करप्रमुखांची नेमणूक झाली तशीच यावेळी देखील होईल असे सांगून इम्रान खान यांना याबाबत प्रत्युत्तर दिले आहे इम्रान खान यांच्या मते पाकिस्तानला अधिक लोकशाहीप्रधान देश तयार करण्यसासाठी या सुधारणा आवश्यक आहेत  पाकिस्तानी लष्कराची मर्जी असेपर्यंतच पाकिस्तानात पंतप्रधानपदी कोणतीही व्यक्ती राहू शकते हा इतिहास आहे तो बघता पाकिस्तानी लष्कराचे महत्त्व कमी झाल्यास ते ऊत्तम आहे कारण पाकिस्तानात जेव्हा जेव्हा लष्कराची अधिकृत सत्ता असते तेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध कमालीचे दुरावतात काश्मीरमधील शांतता नष्ट होते ते बघता इम्रान खान यांची भारतविषयक विषारी मते बाजूला ठेवून बघितल्यास या सुधारणा आपल्यसासाठी अनुकूल आहेत 

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लंडन येथील न्यायालायने शाहबाझ शरीफ याना आर्थिक दंड ठोठावला आहे . सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ हे त्यांच्या पंजाजबचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाकडून आणि शरीफ परिवाराकडून पाकिस्तानला मिळालेल्या आर्थिक मदतीच्या स्वःताच्या फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप लंडनमधील डेली मेल या वृत्तपत्राने केला होता.  त्याच्या विरोधात शहाबाज शरीफ यांनी सदर वृत्तपत्रविरोधात अब्रू नुकसानीचा दावा लंडन न्यायालयात दाखल केला होता त्या खटल्यात शाहबाझ शरीफ यांनी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाल्याने लंडन न्यायलायकडून हा दंड करण्यात आला आहे या खटल्यात  न्यायालयायाकडून दोनदा समन्स बजावून देखील न आल्यावर तिसऱ्यांदा समन्स बाजवल्यावर शाहबाझ शरीफ या खटल्यासाठी हजर झाले होते हे विशेष . या निकालावर  मी म्हणत असल्याप्रमाणे पाकिस्तानात शहाबाज शरीफ यांच्या विरोधात सुरु असणाऱ्या खटल्यामध्ये आपल्या शक्तीचा गैरवापर करत न्यायालयास वाकवल्याचे सिद्ध होत आहे अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिली आहे आपल्या या प्रतिक्रियेत इम्रान खान यांनी शाहबाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदी आल्यावर आपल्या भारताच्या सीबीआय . एडी  एस आय टी सारख्या पाकिस्तानच्या विविध संस्थांमध्ये केलेल्या बदलाचा फायदा घेत पंतप्रधानपदी येण्याच्या आधी दाखल करण्यात आलेल्या  भष्ट्राचारच्या आरोपातून सुटका करून घेण्याचा मुद्दा समर्थनार्थ दिला आहे 

इम्रान खान यांच्यावर हल्ला झाल्यानंतर स्थगित करण्यात आलेलं हकिकी आझादी हे आंदोलन आता पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आहे ज्यामध्ये इम्रान खान लाहोरहून ऑनलाईन पद्धतीने दररोज संबोधित करत आहे इम्रान खान यांची प्रत्यक्ष उपस्थिती नसल्याने या महामोर्च्यात लोकांची उपस्थिती कमी होईल असं अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र त्यास पूर्वीप्रमाणेच पाठिंबा मिळत आहे हामहामोर्चा मात्र पूर्वीपेक्षा कमी गतीने इस्लामाबादला जात आहे तो रावळपिंडीला (सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांसाठी पिंडी ) पोहोचल्यावर इम्रान खान हे महामोर्च्यात


सहभागी होणार आहे सध्याच्या गतीनुसार हा महामोर्चा २८ नोव्हेंबरच्यासपास रावळपिंडीला पोहोचेल  सध्या पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणत कर्ज आहे देशाची निर्यात जवळपास ठप्प झाल्याने नवीन परकीय चलन मिळण्याचा मार्ग खूपच आकसला आहे . देशाचे चलन असलेल्या पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरतो आहे त्यामुळे आयात महाग होत आहेआंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या विविध बंधनामुळे नैसर्गिक इंधनाची किंमत जगात घसरत असताना सरकारला वाढवावी लागत आहे नैसर्गिक इंधनाची किंमत वाढत असल्याने महामागी मोठ्या प्रमाणत वाढत आहे ज्यामुळे सर्वसामान्य जनतेचे मत इम्रान खान यांच्या बाजूने आहे त्यामुळे  येतापंधरवडा पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा  आहे 

ज्याप्रमाणे एखादी काच फुटल्यास तिचे जास्तीत जास्त तुकडे होणे हे सुरक्षितेसासठी धोक्याचे असते त्याचप्रमाणे पाकिस्तानचे तुकडे झाल्यास त्यामुळे सध्या पाकिस्तानकडून असलेला धोक्यामध्ये अतिशय जास्त वाढ होईल जे भारताला परवडणारे नाही त्यामुळे पाकिस्तान जरी आपला शत्रू असला तरी त्यात शांतता  असणेच भारतासाठी उत्तम आहे  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?