आपली एसटी बदलतीये !

   


      एकेकाळी लाल डब्बा म्हणून हिणवली जाणारी आपली एसटी सध्या अत्यंत वेगाने कात टाकत २१व्या शतकाला साजेशी सेवा आपल्या ग्राहकांना कंबर कसत असल्याचे दृश्य आपणास एसटीतून  महाराष्ट्रात फिरताना दिसतंय आपल्या एसटीच्या आवडेल तिथे प्रवास या योजनेचा फायदा घेत खोडोपाडी फिरले की जाणवत फक्त शहरातीलच नव्हे तर मराठवाड्यातील पाथरी , मानवत सारख्या तालुकास्तरावरील एसटी सुद्धा पूर्वी कधीही नव्हती इतक्या प्रचंड वेगाने बदलत आहे आपली अस्वच्छ , धुळीचे थरावर थर  असलेली,  बस्थानके बस्थानकांच्या इमारतीला कधी रंगरंगोटी करण्यात आली होती का ? अशा प्रश्न बघणाऱ्याला पडावा अश्या स्थितीतील बस्थानके ही प्रतिमा एसटी पुसून टाकण्यासाठी एसटी प्रशासन तोटा होत असून देखील त्यातून मार्ग काढत प्रयत्न करत असल्याचे दृश्य आपणास मराठवड्यात आणि मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणता येतील अशी खर्डा सारख्या पश्चिम महाराष्ट्रातील बसस्थानके बघितल्यास सहजतेने लक्षात येते त्यामुळे एकेकाळी एसटी बस नकोरे बाबा ! असे म्हणत तिला नाके मुरडणाऱ्या व्यक्तींना मला सांगावेशे वाटतेय, आपली एसटी बदलतीये ! हि आता पूर्वीची एसटी राहिलेली नाही तर खासगी बसवाहतूकदारांनाच तोडीस तोड देणारी त्याचवेळी १७ % प्रवाशी कर भरून शासनाच्या तिजोरीत मोठी भर घालत राष्ट्रनिर्मितीचे कार्य करणारी संस्था म्हणून पुढे येत आहे 

     नाशिक परिसरातील सातपूर , मेळा,  संगमनेर आदी  बस्थानके  किंवा अहमदनगर जिल्ह्यातील  जामखेडा तालुकयातील खर्डा या गृप ग्रामपपंचातीच्या गावातील बसस्थानक असोअथवा  परभणी जिल्ह्यातील परभणी,  मानवत पाथरी ,  रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी अशी अनेक बस्थानके एसटीमार्फत गेल्या काही काळात नव्याने बांधली जात आहेत या नव्याने बांधण्यात येणाऱ्या बस्थानकात अनेक आधुनिक सोयीसवलती देण्यात येत आहे संगमनेर बस्थानकात तयार करण्यात आलेल्या भूमिगत पार्किंगमध्ये संपूर्ण संगमनेर शहरातील दुचाकी पार्क होऊ शकतील इतकी मोठी जागा आहे 

     सध्या एसटी कर्मचारी एसटीचे राज्यशासनात पूर्णतः विलीनीकरण कधी होणार ? याकडे डोळे लावून बसले आहेत या प्रश्नासह अनेक प्रश्न सध्या एसटीसमोर आहेत मात्र असे असून देखील एसटी अँप बेस सुविधा देत आपली सेवा अत्यंत आधुनिक करत आहे एसटीची बस आता कुठे आहे हे समजण्यासाठी आता आपण ऍप वापरू शकतो

तसेच आता एसटीबसमध्ये आपण रोकडविरहित (कॅशलेस ) प्रवास करू शकतो फोन पे ,गूगल पे सारख्या सेवांद्वारे आपण आता आपले तिकीट काढू शकतो अनेक खासगी बसवाहतूकदार हि सेवा या बऱ्याच आधीपासून देत असले तरी त्यांची सेवा ज्या बसेसवर चालते त्याची संख्या आणि त्या ते सेवा पुरवत असणारे क्षेत्र आणि त्या ठिकाणी आर्थिक सेवा देत असलेल्या कर्मचाऱ्यांचा तुलनेत एसटीचा कारभार कित्येक पट मोठा आहे जगात २१० देश असून त्यांचा  क्षेत्रफळाचा विचार करता ७ व्या क्रमकांचा असलेल्या आपल्या भारताच्या क्षेत्रफळाचा विचार करता तिसऱ्या क्रमांकाच्या महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात आपली एसटी बससेवा देते . जगात दुसऱ्या क्रमांकांची लोकसंख्या असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमकांची सर्वाधिक लोकसंख्या आपल्या महाराष्ट्राची आहे तसेच कंडक्टर आणि तिकिटे काढण्याची विविध कांऊटर यांचा विचार करता इतक्या मोठ्या प्रमाणत पसरलेल्या यंत्रणेला ऑनलाईन करणे सोपी गोष्ट नाही ज्यांना हि सोपी गोष्ट वाटते त्यांनी मध्यप्रदेशच्या एसटीतून जरा फिरावे असे मला वाटते 

मी दर दीड  ते दोन महिन्यांनी एसटीच्या  आवडेल तिथे प्रवास या योजनेंतर्गत पास काढून महाराष्ट्र आणि लगतच्या  इतर राज्यात फिरतो या दरम्यान आपली एसटी अतिशय वेगाने बदलत असल्याचे मला दिसून आले आहे पर्यावरणपूरक बीएस ६ बसेस सुद्धा आपली एसटी चालवते गुजरात कर्नाटकपेक्षा आपल्या बसेस पूर्वीपासून अधिक आरामदायी असून त्यामध्ये दर वेळेस अधिक सुधारणा होत असल्याचे माझे निरीक्षण आहे .काही वर्षांपूर्वी लोकांना फसवत आंध्रप्रदेशच्या एसटीने आपल्या महाराष्ट्राच्या एशियाड रंगसंगतीत आपल्या बसेस रंगवत आम्ही सुद्धा लोकांना आरामदायी सेवा देतो अशा भ्रम निर्माण केला होता त्याविरुद्ध आपण न्ययालयीन कधी जिंकून त्याना तो बदलण्यास भाग पडले होते सुमारे चार महिन्यापूर्वी गुजरात एसटीने लोकांना आरामदायी सेवा देण्यासाठी त्यांची  पूर्वीची एका रांगेत  ३*२  अशी  असलेली अस्सनव्यवस्था बदलत  २* २ अशी केली होती जी आपल्या महाराष्ट्र एसटीने कितीतरी वर्षे आधीच केलेली आहे म्हणजेच काही खंड पडलेला असला तरी अनुकरणाची पंरपरा सुरूच आहे असो मधल्या काळात आपली एसटी काहीशी मागे पडलेली असली तरी इतर एसटीला मागून ओव्हरटेक करत हि गॅप भरून काढण्यासाठी एसटी झपाट्याने बदलत आहे गरज आहे आपली एसटी बदलतीये !याची जाण  ठेवत तिला अजून बळकट करण्याची 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?