भारताच्या सॉफ्ट पॉवरची गगनभरारी


एखाद्या देशाच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीमुळे नाही तर सांस्कृतिक प्रभाव आणि अन्य मानवतावादी मदतीमुळे दुसऱ्या देशाचा प्रभाव जर एखाद्या देशावर असेल तर त्यास ज्या देशाचा प्रभाव आहे त्या देशाची ती सॉफ्ट पॉवर आहे असे संबोधतले जाते . जागतिक राजकारणात या सॉफ्ट पॉवरला अन्यन्य साधारण महत्व आहे ज्या गोष्टी लष्करी आणि आर्थिक ताकदीमुळे  शक्य होत नाही अश्या अनेक गोष्टी सॉफ्ट पॉवरमुळे विनासयास  साध्य होतात.  वसाहतवादाचे शिकार झालेल्या भारतासारख्या देशात दुसऱ्या वसाहतवादी देशात असणारे मूळ देशाचे नागरिक हि सुद्धा सॉफ्ट पॉवर असते जगभरातील सर्वच देश या सॉफ्ट पॉवरचा कमी अधिक वापर करतात . ज्यास भारत देखील अपवाद नाही आग्नेय आशियातील विविध देशांशी तसेच सार्क या संघटनेतील विविध देशांबरोबर  भारत याचा मोठ्या खुबीने वापर करतो  भारताच्या याच मालिकेतील नवा अध्याय २६ नोव्हेंबर रोजी लिहला गेला 
 आंध्रप्रदेश राज्यातील  सतीश धवन उपग्रह प्रक्षेपण तळावरून  २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास एकूण ९ उपग्रह पी एस एल व्ही या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या  पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या उपग्रह प्रक्षेपण प्रणालीचा वापर करत अवकाशात सोडण्यात आले या ९ उपग्रहांमध्ये भूटान   सॅटेलाईट असे नाव असलेला एक उपग्रह अवकाशात सोडण्यात आला हा उपग्रह भूतानमधील संदेशवहन सुधारण्यासास भूटानच्या विस्तीर्ण अश्या जंगलावर लक्ष ठेवण्यासाठी होणार आहे एका अर्थाने हा भारताच्या सॉफ्ट पॉवरचा हा विजय आहे 
भूटान हा भारताबरोबर आणि चीनबरोबर सीमा शेअर करणारा एका छोटासा देश आहे जो मोठ्या प्रमाणत भारतावर अवलूंबून आहे मात्र काही महिन्यापूर्वी भूतान या देशाने चीनबरोबरच सीमावाद सोडवताना आपला काही भूभाग
चीनला देण्याबाबत बोलणी केली होती परुंतु भारताच्या कूटनीतिक प्रयत्नामुळे हा करार प्रत्यक्षात येऊ शकला नव्हता भूटान चीनला जो भूभाग देणार होता तो भूभाग भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता तो भूभाग जर चीनकडे गेला असता तर ईशान्य भारताच्या सुरक्षितेबाबत काही प्रश्न निर्माण झाले असते ईशान्य भारतात सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत आणि सध्या सुरु आहेत त्यापेक्षा जास्त विकासकामे भविष्यात करण्याचे नियोजन आहे या विकासप्रकल्पासाठी येत्या काळात मोठ्या प्रमाणात वीज लागणार आहे भारताच्या मुख्य भूमीतून या भागात वीज वाहून येण्यापेक्षा भूटानच्या हिमालयात जलविद्युत निर्माण करून ती या भागाला पुरवणे तुलनेने कमी खर्चिक आहे त्यामुळे भूटानची आपल्या भारताबरोबर घनिष्ट मैत्री असणे अत्यावश्यक आहे हि मैत्री आर्थिक आणि लष्करी ताकदीच्या ऐवजी मानवतावादी मैत्रीतून झाल्यास अधिक उत्तम होईल २६ नोव्हेंबर रोजी भूटानचा उपग्रह सोडून हेच सध्या आले आहे  भूटानचा हा पहिला उपग्रह आहे 
सध्या भारत जगभरात विविध देशांशी मित्रता वाढवण्यावर भर देत आहे त्या मालिकेत भारताबरोबर सीमा शेयर क्रँरणाऱ्या देशांशी संबंध सुधारण्यावर विशेष भर देत आहे त्या मालिकेत मोडत असणाऱ्या या कार्यक्रमामुळे भूटान मधील संदेशवहन सुधारण्याबरोबर या देशाबरोबर आधीच मधुर असलेले परराष्ट्र संबंध अधिकच मधुर झाले आहेत हे मात्र नक्की  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?