केंद्र सरकारचे स्वागतार्ह्य पाऊल


नुकताच काही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यामार्फत एक अतिशय चांगला निर्णय घेण्यात आला आपल्या भारतातील वाढत्या आत्महत्या विचारत घेऊन पुढील आठ वर्षात टप्याटप्याने अमलात येणारी आत्महत्या प्रतिबंध कृती कार्यक्रम आखल्याचा तो निर्णय होता . या कृती कार्यक्रमामुळे पुढील ८ वर्षात अर्थात २०३० पर्यंत देशातील आत्महत्या १० % कमी होतील अशा विश्वास हा कार्यक्रम जाहीर करताना  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री  मनसुख माडाविया  यांनी व्यक्त केला हा कार्यक्रम देशातील प्रत्येक जिल्ह्यात एकाचवेळी विविध स्तरावर राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत विविध उद्दिष्ट गाठण्यासाठी विशिष्ट कालमर्यादा घालून देण्यात आली आहे देशातील आत्महत्या रोखण्यसाठीचा देशातील हा पहिलाच कृती कार्यक्रम आहे .कोणी  कितीही मोदी विरोधक असला  तरी  मात्र या कृती कार्यक्रमाबाबत केंद्र सरकारचे अभिनंदनच करेल असाच हा कार्यक्रम आहे 
या कृती कार्यक्रमानुसार पुढील तीन वर्षात लोकांचे मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी संस्थात्मक रचनेचे कार्य पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे  बंधन घालण्यात आले आहे तर जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांअंतर्गत पुढील पाच वर्षात देशातील प्रत्येक जिल्ह्यात मानसोपचार तज्ज्ञांच्या सोइ उपलब्ध करून देण्याचे बंधन घालून देण्यात आले आहे तसेच पुढील आठ वर्षात देशातील प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये मानसिक आरोग्य सुदृढ असावे यासाठी घटक समाविष्ट करणे आदी टप्पे समाविष्ट करण्यात आले आहेत याखेरीज माध्यमांवर
आत्महत्येचे वार्तांकन करताना काही बंधने घालण्याचा बाबत काही करता येईल का ?  ज्यामुळे लोकममधील आत्महत्येची भावना कमी होईल या सारख्या बाबीबाबत देखील विचार विनिमन करण्याचे या कृती कार्यक्रमात ठरवले आहे संयुक्त राष्टसंघाच्या आरोग्य विभागातर्फे  आग्नेय आशियातील वाढत्या आत्महत्या रोखण्यस्साठी सुरु असलेल्या कार्यक्रमाच्या धर्तीवर हा कृती कार्यक्रम ठरवण्यात आला आहे मात्र भारताचा हा कृती कार्यक्रम या कार्यक्रमाची पूर्णतः कॉपी नसून भारतातील सामाजिक आर्थिक स्थितीनुसार यामध्ये आवश्यक ते बदल केले आहेत 
या कृती कार्यक्रमाविषयी माहिती देताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री  मनसुख माडाविया यांनी अत्यंत धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आकडेवारीनुसार सार गेल्या तीन वर्षात भारतात दर एक लाख व्यक्तींमागे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीमध्ये १० पूर्णांक २ शतांश पासून ११ पूर्णांक ३ शतांश इतकी वाढ झाली आहे तसेच देशातील १५ ते २९ या वयोगटातील व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणांचा विचार करता आत्महत्या हे पहिल्या  क्रमांकाचे कारण आहे कोणत्याही देशाच्या प्रगतीत सर्वाधिक योगदान हाच देश देत असतो    दरवर्षी १ लाख व्यक्ती आत्महत्या करतातअसे त्यांनी सांगितले  १ लाख हि संख्या किती मोठी आहे हे आपणस पुढील आकडेवारीतून स्पष्ट होईल आपल्या महाराष्ट्रात कोणत्याही ग्रामपंचायतीच्या गावाची अधिकत्तम लोकसंख्या हि १७ हजार असू शकते या पेक्षा जास्त लोकसंख्या झाल्यास नगर पंचायत स्थापन केली आहे तर लोकसंख्या २५ हजारपेक्षा जास्त झाल्यास नगर परिषद स्थापन केली वाजते तर ५० हजार लोकसंख्या झाल्यास नगरपालिका स्थापन करण्यात येते हि आकडेवारी लक्षात घेतल्यास दरवर्षी  देशात आपल्या महाराष्ट्राचा विचार करता ६ नगरपंचायत  ४ नगरपालिका ,आणि दोन नगरपरिषदेच्या एकूण लोकसंख्येच्या एव्हढी आत्महत्या करतात हे प्रमाण चिंताजनक आहे 
 आत्महत्येचा   समाजाच्या सर्व घटकांवर परिणाम होतो जे लॉग आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना दुबळ्या समजतात त्यांनी मग देशातील इतक्या व्यक्ती का दुबळ्या होत आहेत याविषयी विचार करणे गरजेचे नाही का ? जर इतक्या मोठ्या प्रमाणत व्यक्ती आत्महत्या करत असतील ? तर देशाचे भवितव्य काय ?याबाबतही आत्महत्येकडे दुबळ्या
मनोवृत्तीच्या म्हणणाऱ्या व्यक्तींनी प्रकाश टाकणे आवश्यक आहे मुळात आत्महत्येला दुबळा समजणे चुकीचे आहे त्यांना मानसिक आधाराची गरज आहे असे समजणे आवश्यक आहे आता हि मानसिक आधाराची गरज व्यक्तीनुसार वेगवेगळी असते हे आपण लक्षात घेणे आवश्यक असते या कृती कार्यक्रमात याचाच विचार केल्याने मला वैयक्तिक रित्या हा कृती कार्यक्रम आवडला आहे आत्महत्येचा प्रयत्न हा भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा न ठरवण्याचा निर्णय हा सरकारने काही वर्षांपूर्वी घेतला होता त्यानंतर मानसिक आरोग्यबाबतचा मोठा निर्णय म्हणून  या कडे बघता येईल  त्या बाबत केंद्र सरकारचे अभिनंदन करायलाच हवे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?