२०२३ वर्ष आहे खास कारण .....


      सध्या सुरु असणारे ग्रेनियन वर्ष संपायला सुमारे एक महिना शिल्लक असला तरी नव्या  ग्रेनियन वर्षाची दिनदर्शिका आणि रोजनिशी बाजारात आताच दाखल झालेल्या आहेत , हे आपणास बाजरपेठेत फेरफटका मारल्यास सहजतेने लक्षात येते . येणारे २०२३ हे वर्ष भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण आर्थिक आणि लष्करी ताकदीच्या समजल्या जाणाऱ्या जी २० आणि एस सी ओ  या परिषेदच्या अध्यक्षपदाबरोबर  सॉफ्ट पॉवर या जागतिक राजकारणात महत्त्वाच्या असणाऱ्या संकल्पनेत सुद्धा भारतासासाठी अनुकूल गोष्टी या वर्षी घडणार आहे भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत (General Assembly of United Nation) मांडलेल्या आणि २०२१ मार्च ३ रोजी संमत झालेल्या ठरावानुसार  २०२३ हे वर्ष जागतिक ज्वारी वर्गीय पीक वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे भारताच्या या प्रस्तावाला जगातील ७२ देशांनी पाठींबा दिला होता एका अर्थी भारताचा हा जागतिक राजकारणात विजयचं म्हणायला हवा 

   जगभरात खाल्या जाणाऱ्या गहू आणि तांदळापेक्षा या वर्गातील धान्ये काहीशी वेगळी आहेत या वर्गातील पिकांना गहू आणि तांदुळापेक्षा कमी पाणी लागते  तसेच जमिनीची सुपीकता देखील कमी असली तरी चालते मात्र पोषण मूल्याच्या बाबतीत हि पिके गहू तांदुळाइतकीच पौष्टिक आहेत    ज्वारी , बाजरी कुळीथ , नागली  उडीद आदी अनेक पिके या वर्गात येतात मात्र ज्वारी हे या गटातील प्रमुख एक क्रमकांचे अन्न असल्याने हा गट ज्वारी वर्गीय पिके म्हणून ओळखला जातो बाजरी देखील या गटातील महत्त्वाचे पीक आहे मात्र भारताखेरीज बाजरी अन्यत्र फारशी होत नाही याउलट ज्वारीचे क्षेत्र जगभरात पसरले असल्याने या गटाला जगभरात ज्वारी वर्गीय पीकगट  म्हणून ओळखले जाते कृषी मंत्रालयाकडून या वर्गातील पिके पोषकद्रव्याने परिपूर्ण असल्याचे जाहीर करण्यात आले आहे ज्वारीवर्गीय पिकामध्ये सर्वसाधारपणे ७ ते १२ टक्के प्रोटीन . २ ते ५ टक्के फॅट , ६५ ते ७५ टक्के कार्बोहायड्रेस आणि १५ ते २० टक्के फायबर असते असे कृषी विभागाकडूनएप्रिल २०१८ मध्ये  जाहीर करण्यात आहे .  ICAR आणि भारतीय बाजार अनुसंधान संस्थांकडून करण्यात आलेल्या संशोधनाचा यासाठी आधार घेण्यात आला आहे  

 गेल्या दोन ते तीन वर्षापसून कोव्हीड १९ च्या साथरोगामुळे आणि रशिया युक्रेन युद्धामुळे खाद्य सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे सध्या जग बदलत्या हवामानाबादलामुळे त्रस्त आहे जगाचे  हवामान बदलण्यासाठी मिथेन वायूमोठ्या प्रमाणात  जवाबदार आहे तांदुळाच्या शेतीमध्ये मिथेन मोठ्या प्रमाणत उत्सर्जित केला जातो तसा धोका हा ज्वारीवर्गीय पिकांच्या मध्ये येत नाही मात्र असे असून देखील त्याची लोकप्रयियता बरीच कमी आहे ती वाढावी 

लोकांच्या आहारात मुख्य अन्नघटक म्हणून याचा समावेश व्हावा या वर्गातील पिकांच्या गुणवत्ता सुधारणेला उत्तेजन मिळावे  या हेतूने भारतातर्फे २०२३ हे वर्ष जागतिक ज्वारीवर्गीय पीक वर्ष  म्हणून साजरे करण्यात येणार आहे त्यासंदर्भात होणारे विविध कार्यक्रम कृषी खाते आणि परराष्ट्र खात्यामार्फत आयोजित करण्यात येणार आहे 

भारताने काही महिन्यापूर्वी कार्बनवायूचे उत्सर्जन न करता ऊर्जा निर्मिती करणाऱ्या सौरऊर्जचा मंचाची  (सौर ऊर्जेची निर्मिती करण्यात येणाऱ्या सोलरपॅनेल मध्ये वापरण्यात येणाऱ्या धातूंमुळे एका वेगळ्या प्रकारचे प्रदूषण होते सबब ते पूर्णतः पर्यवर्णपूरक नाही असो ) निर्मिती करून जागतिक स्तरावर सॉफ्ट पॉवर  म्हणून स्वतःची नवी ओळख निर्माण केली होती त्यामध्ये गुणात्मकवाढ यामुळे होईल जे एक भारतीय म्हणून आपणस अभिनंदनास्पद आहे 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?