भारतीय बुद्धिबळपटूची विजयी घोडदौड सुरूच


भारतीय
बुद्धिबळपटूची विजयी घोडदौड सुरूच   असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. नुकतीच कोलकात्ता येथे झालेली टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत  जलद बुद्धिबळ या प्रकारात खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये पहिल्या तिन्ही क्रमांकावर भारताच्या खेळाडूंनी आपली नावे कोरून हेच सिद्ध केले आहे ही स्पर्धा मुळात युरोपातील आघाडीची स्टील कंपनी कोरस या कंपनीकडून प्रायोजित करण्यात येणारी स्पर्धा आहे काही वर्षांपूर्वी कोरस हि कंपनी टाटांनी विकत घेतल्यामुळे पूर्वीच्या कोरस स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे नामकरण टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा झाले ( एकप्रकारे हा भारताच्या उद्यमशीलतेचाच वियज आहे )  टाटा स्टील ही स्पर्धा बुद्धिबळातील विबल्डन समजली जाते या बुद्धिबळविश्वातील  अत्यंत महत्वाच्या स्पर्धेत मागच्या काही स्पर्धांप्रमाणे भारतीय बुद्धिबळपटूंनी चमकदार कामगिरी करून या आधी मिळवलेले विजय हे निव्वळ संयोग नव्हते . तर भारत  बुद्धिबळाच्या विश्वातील महासत्ता आहे त्यामुळेच हे विजय भारतीयांनी मिळवले हेच सिद्ध केले

 भारताचा युवा ग्रँडमास्टर निहाल सरीन यांनी  टाटा स्टील रॅपिड या भारतातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. निहाल यांनी  दुसऱ्या दिवशी आपली आघाडी कायम ठेवत अझरबैजानच्या मामेदयारोव आणि इराणच्या परहम माघसुदलू यांना अनुक्रमे सातव्या आणि आठव्या फेरीत पराभूत केले, अंतिम फेरीत   त्यांना भारताच्याच  अर्जुन अरिगासीचा सामना करावा लागला मात्र तो पर्यंत निहाल सरीन यांनी विजयासाठी  आवश्यक असणारे साडेसहा गुण मिळवले होते   अर्जुन यांनी  6 गुण मिळवून

उपविजेतेपद पटकावले, तर भारताच्या विदित गुजराती यांनी  उत्तम टायब्रेकच्या आधारे 5 गुण मिळवून तिसरे स्थान पटकावले. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारतीय खेळाडूंनी पहिल्या तीन स्थानांवर स्थान मिळवले आहे. इतर खेळाडूंमध्ये अमेरिकेचे  हिकारू नाकामुरा  चौथे  , भारता चे डी गुकेश पाचवे, मामेदयारोव्ह सहावे, उझबेकिस्तानचे अब्दुसत्तारोव नोदिरबेक सातवे  इराणचे परहम आठवे, अमेरिकेचे वेस्ली सू नववे आणि भारताचे  सेथुरामन  दहावे होते

 गेल्या काही वर्षात भारतीय बुद्धीबळपटूंनी जागतिक स्पर्धेत सातत्याने अत्यंत उठावदार कामगिरी करुन देखील भारतीय सी फाँर क्रिकेट या मानसिकतेतून बाहेर पडत नाहीये, क्रिकेट हा गुलामगिरीचे प्रतिक आहे. तर बुद्धीबळ हा भारतीयांच्या बुद्धीमत्तेचे प्रतिक आहे. प्राचीन भारताच्या वैभवशाली वारसा हा बुद्धीबळ आहे. बुद्धीबळाला इंग्रजीत चेस म्हणतात. चेस याचे स्पेंलिग देखील क्रिकेटप्रमाणे सी पासून सुरू होते.त्यामुळे सी फाँर बुद्धीबळ म्हटले तर आपण गुलामगिरीच्या जोखडातून खऱ्या अर्थानं मुक्त होवू, ज्या मुळे भारत खऱ्या अर्थाने महासत्ता होईल, हे मात्र नक्की

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?