पाकिस्तान समस्येच्या चक्रीवादळात

     

सध्या आपले शेजारील राष्ट्र पाकिस्तान एका प्रचंड मोठ्या समस्येच्या चक्रीवादळात सापडले आहे. आर्थिक संकट कमी की काय ?म्हणून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर प्रचंड प्रमाणात तणाव आहे. .
 कोणताही देश जेव्हा त्याचे कर्जाचे हप्ते , तसेच आयातीचे शुल्क देवू शकत नाही, तेव्हा तो देश दिवाळखोर म्हणून जाहिर केला जातो. आजमितीस पाकिस्तानवर प्रचंड आंतरराष्ट्रीय कर्ज आहे. त्याचा पुर्ततेसाठी दर तीन महिन्यांनी पाकिस्तान मोठ्या प्रमाणात आपल्यकडील परकीय चलन आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देश ,संस्था यांना देवून कर्जाची परतफेड करत असतो. त्याप्रमाणे 6डिसेंबर रोजी कर्जाचा हप्ता दिल्यानंतर पाकिस्तानकडे परकीय चलनाचा साठा जवळपास संपल्यातच जमा आहे. निर्यात जवळपास संपल्यातच जमा असल्याने नवे परकीय चलन मिळण्याचा मार्ग खुपच संकुचित आहे. ज्यामुळे पुढील  कर्जाचा हप्ता चूकवण्यासाठी परकीय चलन कुठुन आणायचे ?हा पाकिस्तानसमोरील मोठा प्रश्न आहे परदेशी माल पुरवठादारांना परकीय चलन न दिल्याने मोठ्या प्रमाणात विविध उत्पादने पाकिस्तानच्या बंदरात पडून आहेत. जेव्हा पाकिस्तानकडून  संबंधित परकीय माल पुरवठादारांना परकीय चलन देण्यात येईल, तेव्हाच तो माल पाकिस्तानी नागरीक असलेल्या त्याचा आयातदारांना वापरता येईल,थोडक्यात अधिकृत घोषणा न करण्यात आल्याने, पाकिस्तान आर्थिक दिवाळखोर नसले, तरी तेथील आर्थिक स्थिती दिवाळखोरीसारखीच आहे .मात्र पत्रकारितेच्या नियमानुसार जो पर्यत अधिकृत  घोषणा होत नाही, तो पर्यत 300 ते400 लोकांसमोर खुन करणारा व्यक्ती सुद्धा संशयीत गुन्हेगार असतो.खुनाचा आरोपी नसतो, त्यानुसार आपण पाकिस्तानला आर्थिक दिवाळखोरीची अत्यंत शक्यता असणारा देश म्हणूनच बघायला हवे
              तर दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे, आर्थिक दिवाळखोरीचे संकट देशावर घोंगावत असताना, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सबंध देखील दुरावत आहेत. गेल्याच आठवड्यात पाकिस्तानच्या अफगाणिस्तानमधील दुतावासासमोर झालेल्या बाँबस्फोटात पाकिस्तानचे अफगाणिस्तानमधील राजदुत, त्यांच्या वाहनाचा चालक हे थोडक्यात मृत्युमुखी पडण्यापासून वाचलेले होते. हा हल्ला होवून आठवडा होत नाही, तोच सोमवार 12डिसेंबर रोजी सकाळी  अफगानिस्तान पाकिस्तान सीमेवर चमन या पाकिस्तानी शहरानजीक  अफगानिस्तान बाँडर सिक्युरिटी फोर्सने केलेल्या बंदुकीच्या फेऱ्यामध्ये हा लेख लिहल्यापर्यत 7 पाकिस्तानी
नागरीकांचा मृत्यू झाला आहे, तर 15ते16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 6ते7 जण गंभीर असल्याचे समजते. सुमारे एक महिन्यापूर्वी पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानच्या उपपराष्ट्रमंत्री  हिना रक्कबानी खार    या अफगाणिस्तानची राजधानी काबुल ला गेल्या असत्या अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी   यांनी त्यांना भेट नाकारली होती.त्यामुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानात विषयक भुमिका अफगाणिस्तानातील सरकारप्रमुखांना त्या सांगू शकल्या नाहीत. 
         अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार आल्यावर त्यावेळचे पाकिस्तानचे पंतप्रधान आणि विद्यमान प्रमुख विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी आता अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या स्वतःच्या लोकांचे सरकार आले आहे. अमेरीकेच्या त्रासातून अफगाणिस्तानी नागरीकांची सुटका केल्याबद्दल मी तालिबानचे स्वागत करतो, जगातील प्रत्येक देशाला स्वनिर्णयाचा अधिकार आहे. अफगाणिस्तानने त्यांचा स्वनिर्णयाचा अधिकार वापरल्याने मी आनंदीत आहे, याप्रकारच्या शद्ब रचनेत अफगाणिस्तानमधील तालिबानचे अभिनंदन केले होते. आज सुमारे दिड ते पाउणे दोन वर्षानंतर तेच तालीबान पाकिस्तानसाठी अत्यंत डोकेदुखी ठरत आहे.2001नंतर अमेरीकेने अफगाणिस्तानात हल्ला केल्यावर, अनेक तालीबानी अतिरेकी पाकिस्तानच्या डोंगराळ भागात लपले होते.त्यामुळे तालीबान वीस वर्षानंतर देखील काही प्रमाणात अस्तित्वात राहिले होते.  तेच तालीबान आता त्यांंना पाकिस्तानची गरज त्यांचा पहिल्या कार्यकाळात(1996 ते2001) होती त्या तूलनेत अत्यंत कमी जवळपास शुन्यवत झाल्याने  अफगाणिस्तानच्या पाकिस्तानबरोबर असणारी वादग्रस्त सीमेचे वारंवार उल्लधन करत आहे.1893साली त्यावेळच्या ब्रिटीश भारत आणि अफगाणिस्तान मध्ये आखण्यात आलेल्या सीमारेषेला ,जिला ती ब्रिटीश सेनाधिकारी ड्युरान यांनी आखल्याने ड्युरान लाईन म्हणतात, अफगाणिस्तानमधील कोणत्याही सरकारने अधिकृत मान्यता दिलेली नाही. अफगाणिस्तानच्या मते या सीमेमुळे अफगाणिस्तानात प्रभावशाली असलेल्या आणि 
 सुमारे40% लोकसंख्या असलेल्या पठाणी लोकांची वस्ती विनाकारण विभागली आहे.त्यामुळे अफगानिस्तानमधील पठाणी लोकांची वस्ती असलेला भाग आणि पाकिस्तानमधील पठाणी लोकांची बहचसंख्येने वस्ती असलेला खैबर ए पख्वुत्नवा  (पुर्वीचे नाव वायव्य सरहद प्रांत) यांचे अफगाणिस्तानात विलीनीकरण करावे,किंवा त्याचा स्वतंत्र देश करावा.पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेवर उभारलेल्या कुंपणास देखील यामुळे अफगाणिस्तानचा कायमच विरोध राहिलेला आहे
पाकिस्तानमध्ये त्यांचा इतिहासातील सर्वात विनाशकारी पुर या 2022च्या मान्सुममध्ये येवून गेले .त्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे.त्यातून उभे राहण्याचे संकट असतानाच उभे राहिलेल्या या दोन संकटांनी पाकिस्तान समस्येचा चक्रव्युहात सापडल्याचे स्पष्ट करत आहे..
   पाकिस्तान जरी आपला शत्रु असला तरी, आर्थिक विपन्नतेमुळे किंवा राजकीय लाथळ्यांमुळे पाकिस्तानात गृहयुद्ध सुरू झाल्यास ते भारताला कदापी परवडणारे नाही. पाकिस्तानकडे अणवस्त्र आहेत गृहयुद्धामुळे ती अयोग्य व्यक्तींच्या हातात जाण्याचा धोका नाकारता येत नाही. तसे झाल्यास होणारे नुकसान मोठे असेल. पाकिस्तानची मोठी शहरे भारतीय सीमेलगत आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाल्यास त्यातून निर्माण झालेल्या धुरामुळे भारतात देखील काही समस्या निर्माण होवू शकतात. तसेच सुन्नी मुस्लिमबांधव बहुसंख्य असलेल्या पाकिस्तानमधील  निर्वासिताना शिया मुस्लिमबांधव बहुसंख्य असलेल्या  इराण या देशात आश्रय मिळण्याची शक्यता कमी आहे. उद्या खरेच पाकिस्तानमध्ये मोठी समस्या निर्माण झाल्यास, इराण शिया सुन्नी दंगे नको म्हणून इराणमध्ये त्यांना आश्रय नाकारू शकतो, अस्यावेळी ते सुन्नी मुस्लिमबांधव असलेल्या आपल्या भारतातच येणार ,हे 100%सत्य आहे. ज्यामुळे पाकिस्तानात शांतता राहण्यातच भारताचे हित आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?