श्रीलंकेची आर्थिक स्थैर्यतेची नवी पहाट उजाडली ?

            


     आर्थिक विपन्नेतेमुळे सध्या सुरु असलेल्या २०२२ वर्षाच्या सुरवातीला अत्यंत प्रकाशझोतात आलेल्या श्रीलंकेमध्ये आर्थिक स्थैर्यतेची नवी पहाट उजडण्याचा मार्ग वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दृष्टीस येत आहे . श्रीलंकेचे  परराष्ट्र मंत्री अली साबरी  यांनी आंतराष्ट्रीय नाणेनिधी आणि भारताकडून देण्यात येत असलेल्या आर्थिक मदतीमुळे येत्या ते वर्षात श्रीलंका पुन्हा पूर्वपदावर येईल अशा विश्वास एका खासगी भारतीय वृत्तवाहिनीतर्फे घेण्यात आलेल्या मुलाखतीत व्यक्त केल्याने ही  आशादायक शक्यता निर्माण झाली आहे जर भारताने त्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या कक्षेत अधिक व्यापार केल्यास श्रीलंका याही पेक्षा लवकर पूर्वपदावर येईल अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली . आंतराष्ट्रीय नाणेनिधीची बंधने असल्याने आम्हला रशियाकडून नैसर्गिक इंधनाची आयात करण्यावर प्रचंड बंधने आहेत जर त्यात काही प्रमाणत सवलत मिळाल्यास श्रीलंकन सरकारचा खर्च काहीसा कमी होऊन श्रीलंका पूर्वपदावर येण्याच्या प्रक्रियेस गती मिळेल . आम्हाला या बाबत भारताकडून साह्य अपेक्षित आहे असेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले मात्र आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या नियमांच्या विरोधात जाणे देशासाठी धोकादायक ठरू शकते अशी प्रतिक्रिया खासदार व्यक्त करत आहेत याबाबत माध्यमांशी बोलताना ऊर्जा आणि ऊर्जा मंत्री कांचना विजेसेकेरा यांनी सांगितले के ते याबाबत विरोधी पक्षाचे खासदार  हर्षा डी सिल्वा यांच्या नेतृत्वाखालील वित्त समितीची मदत घेत आहेत श्रीलंका त्यांना अंतराष्ट्रीयन नाणेनिधीने त्यांच्यावर कर्ज घेण्यासाठी लादण्यात आलेल्या अब्ज ९० लाख अमेरिकी डॉलरच्या मर्यादांपेक्षा जास्त कर्ज म्हणजेच अब्ज अमेरिकी डॉलर्स इतक्या रक्कमेचे कर्ज बाह्य स्रोतांकडून घेण्याचे आणि सरकारी मालकीच्या संपत्तीचे पुनर्नियोजन करून अब्ज अमेरिकी डॉलरचे वित्तसाह्य उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सुद्धा त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे

          सध्या श्रीलंकेला पेट्रोल डिझेल एल पी जी गॅस आदी नैसर्गिक इंधनाचा तसेच औषधाचा पुरवठा विना अडथळा होत असल्याने सर्वसामान्य श्रीलंकन लोकांचे राहणीमान पूर्वीइतके त्रासदायक राहिलेले नाहीये मात्र ते खूपच सुखकारक नाहीये . मात्र पूर्वीपेक्षा सुसह्य झाले आहे हे नक्की श्रीलंकेची सुमारे ३३ % जनता शेती आणि शेती विषयक उद्योग धंद्यात प्रत्यक्ष सहभागी असल्याने खतांची निर्मिती आणि अन्य कृषी विषयक कामांसाठी श्रीलंकेला नैसर्गिकइंधनाची सध्या मोठी गरज आहे  त्या पार्श्वभूमीवर घडामोडींना अत्यंत  महत्व महत्व आहे या मुळे श्रीलंकेची अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदतच होईल हे नक्की मात्र श्रीलंकने ज्याकडून सर्वाधिक म्हणजे त्यांच्या एकूण कर्जाच्या ३३ % कर्ज घेतले होते त्या चीनकडून श्रीलंकेच्या कर्जाची अदयाप पुनर्र्चना करण्यात आलेली नाही .तसेच भारताकडून करण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबत अजूनही पुरेशी स्पष्टता नाही   ज्यामुळे श्रीलंकेचे संकट पूर्णतः सुटण्यास सुरवात झाली आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल मात्र नैसर्गिक इंधनबाबत काही प्रमाणत स्थिरता आल्याने यात काही प्रमाणत सकारत्मक बदल होईल हे नक्की

          सर्वसामान्य लोकांनी आर्थिक विपन्नेतेला कंटाळून श्रीलंकेचे त्यावेळचे पंतप्रधान आणि विद्यमान राष्ट्रपती अर्थमंत्री रनींला विक्रमसिंघे  यांचे खासगी घर पेटवून देणे राष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानवर ताबा मिळवणे . राष्ट्रपतींना देश सोडून अन्य देशात आश्रय घेण्यास भागपडण्याची स्थिती निर्माण करणे , ज्यामुळे श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या शयनकक्षातील सोयीसुविधांच्या त्यांच्या अधिकृत खुर्चीचा सर्वसामान्य नागरिकांनी ताबा घेत त्यावर आपली फोटो काढण्याची हौस भागवून घेतल्याचे आपण सर्वांनी टीव्हीवर बघितले होतेच 
त्यावेळी आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या मार्फत श्रीलंकेच्या अर्थव्यस्थेची पुनर्रचना करण्याच्या  कार्यक्रमास सुरवात झाली होतीज्यास आता अत्यंत वेग आला आहे हेच यातुन स्पष्ट होत आहेजे अनेक भारतीयांची  हिंदी गाणे ऐकण्याची हौस भागवणाऱ्या सिलोन रिडिओच्या देशासाठी आणि समस्त दक्षिण आशियासाठी आनंदाची गोष्ट आहे

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?