देवदूतांची काळी बाजू दाखवणारे पुस्तक, अशीही एक झुंज .........

         


       सर्वसाधारपणे वैद्यकीय  व्यवसायाला एका  परोपकारी नजरेतून बघितले जाते . लोकांची आयुष्ये वाचवणारा व्यवसाय म्हणून, यास  अन्य व्यवसायाच्या तुलनेत  एक प्रतिष्ठा आहे. औषध निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना जगभरात अनेक ठिकाणी देवदूतासमान मानण्यात येते .  मात्र अमेरिका आणि पश्चिमी युरोपीय देशातील औषध निर्मिती कंपन्याचा नफाखोरीने या  लोककल्याणकारी  व्यवसायाला एका बाजूने काळवंडले आहे .  या काळ्या बाजूची ओळख करून देणारे पुस्तक म्हणजे नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक  समाज या संस्थेच्या नाशिक येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांत प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ मृदुला बेळे यांनी ;लिहलेले आणि राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेले पुस्तक म्हणजे अशीही एक झुंज.  जे मी . महाराष्ट्रातील जुन्या वाचनालयांची यादी केल्यास क्रमांक दोनचे जुने वाचनालय असणाऱ्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना )च्या वाचनालयात नुकतेच वाचले . आपल्या मराठीत याविषयावरची पुस्तके फारच कमी आहेत अश्या अत्यंत मोजक्या संख्येने असलेल्या पुस्तकांचा मुकुटमणी म्हणून याकडे बघता येऊ शकते .,औषधनिर्मिती क्षेत्रातील नफेखोरीवर भाष्य करणारे इंग्रजी पुस्तक म्हणजे रोझ अँड कंपनी . रोझ अँड कंपनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद झाला असला तरी ते मूळचे इंगजी पुस्तक आहे तेथील मूळ संदर्भ पश्चिमी युरोपीय प्रदेशातील आहेत हे आपण लक्षत घेयला हवे . तर अशीही एक झुंज हे मूळचे मराठीतील पुस्तक आहेत त्र्याचे संदर्भ अस्सल भारतीय आहेत हे आपण लक्षात घेयला हवे 

      या पुस्तकात सिप्ला या भारतीय औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपनीने प्रामुख्याने आफ्रिका खंडातील नागरिकांसाठी लढलेली झुंज सांगण्यात आली आहे अमेरिका आणि पश्चिमी युरोपातील औषध निर्मिती कंपन्या पेटंटचा बागुलबुवा करत गोर गरीब आफ्रिकी जनतेलात्यांच्यासासाठी जीवनवश्यक असलेल्या एड्सविरोधी औषधे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत असताना महाग दराने विकली . अमेरिका आणि पश्चिमी युरोप या खंडातील औषध निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्याविरोधात महात्मा  गांधींचा आदर्श घेऊन औषध निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सिप्ला या औषधनिर्मिती कंपनीने ( हि कंपनी एका पारशी व्यक्तीची आहे . भारतात अल्पसंख्यांक असून त्याचा कोणताही बागुलबुवा न करता , विशेष सवलतींची मागणी न करता देशाच्या प्रगतीत सातत्याने भरीव योगदान देणारे समाज म्हणजे पारशी समाजबांधव होय ) दिलेली झुंज या पुस्तकात सांगण्यात आलेली आहे भारतीय औषध निर्मिती क्षेत्रात मोठे भरीव योगदान देणारी सरकारला अनेक चांगल्या सुधारणा करायला भाग पडणारी , भारतातील सर्व औषध निर्मिती कंपन्यांची व्रजमूठ होण्यसासाठी प्रयत्न करणारी औषध निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून आज आपण सिप्ला यान कंपनीस ओळखतो या कंपनीने आफ्रिका खंडातील सर्वात मोठ्या समस्येपैकी एक असणाऱ्या एड्स च्या रुग्णांना मदतीचा हात देत त्यांना स्वस्त्तात औषधे पुरवण्यासाठी मोठा कायदेशीरलढा दिला त्याची कहाणी या पुस्तकात सांगण्यात आली आहे , सिप्ला या कंपनीने ज्यांच्या विरोधार्त लढा दिला ते आर्थिक ताकदीचा विचार करता सिप्लाच्या तुलनेत अतिशय मोठे होते जगातील सर्वात प्रबळ देश असलेल्या अमेरिकेच्या सत्ताकारकांच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या . जे मानत आणले तर आपल्यला अनुकूल होईल अशी व्यक्ती सहजतेने अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसवू शकले असते  जे आपल्या आर्थिक ताकदीच्या जोरावर त्यांना हवा तास निर्णय सहज न्यायालयाकडून आणू शकत होते सिप्ला हि भारतीय कंपनी होती जिची आर्थिक ताकद मर्यादित होती तिला राजकीय पाठबळ खूपच कमी होते सिप्ला भारतीय कंपनी असून ती ज्यांच्यासाठी लढत होती ते आफ्रिकी देश होते .ज्यांना भारताविरोधात भडकावणे सहज शक्य होते अश्या विषम स्थितीत असणारा लढा 
सिप्ला या भारतीय औषध निर्मिती कंपनीने जिंकला ज्याची कहाणी या पुस्र्तकात सांगण्यात आली आहे 

     या पुस्तकात या लढ्यातील सर्व घटना तारीखवार सुस्पष्ट करण्यात आली आहे पुस्तकाची सुरवात आफ्रिकेमध्ये एड्सचे संकट कसे सुरु झाले .? अमेरिकी आणि पश्चिमी युरोपीय प्रदेशातील औषध निर्मिती कंपन्यांनी पेटंटचा मुद्दा उपस्थित करत त्यांचे कसे  शोषण केले ? औषध पेटंट विषयक प्रक्रिया काय असते ? जगभरात ती कशी राबवली जाते  ? १९७० चा भारताचा औषध पेटंट कायद्याचा भारताला कसा प्रकारे फायदा झाला ? त्यामुळे भारतीय औषध निर्मिती क्षेत्र कसे  विस्तारले / ? या कायद्यातील तरतुदींचा सिप्लाला आपल्य खऱ्या अर्थाने मानवतावादी लढ्यात कसा फायदा झाला ? सध्या भारतात लागू असणारा २००५ चा भारतीय औषध निर्मिती पेटंट कायद्यामुळे आता अशी गोष्ट लढणे कसे अवघड आहे ? औषध निर्मितीची प्रक्रिया काय असते ? तिच्या विविध टप्यावर कोण कोणती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते त्यास किती खर्च येतो या खर्च्याचा मुद्दा उपस्थित करत औषध निर्मिती कंपन्या ग्राहकांकडून कोणत्या प्रकारे लूट करतात  याबाबतची माहिती आपणस या २०० पाणी पुस्तकात मिळते . पुस्तकाची भाषा खूपच सोपी आहे त्यामुळे हे पुस्तक सहजतेने समजते पुस्तक तांत्रिक गोष्टीची माहिती देणारे असून देखील वाचनीय आहे सर्वांनी हे पुस्तक वाचावेच असे मला वाटते ? मग वाचणार हे पुस्तक 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?