पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता नाट्यमय स्थितीत !

   


 नुकत्याच कतार देशात झालेल्या फ़ुटबाँल विश्वचषकाच्या अंतिम साम्यानात आपण अत्यंत चुरस अनुभवली . शेवटच्या क्षणपर्यंत विश्वचषकाचा मानकरी कोण होणार ?याबाबत प्रचंड उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागलेली होती हा  जसा  अखेरीस नाट्यमय स्थितीत पोहोचला होता अगदी तशीच नाट्यमयता  पाकिस्तानात सध्या नागरिक अनुभवीत आहेत फरक एव्हढाच कि हि नाट्यमयता कोणत्या खेळातील नाही तर तर राजकारणाची आहे आता पाकिस्तानी राजकारणी लोकांनी त्यांच्या राजकारणापायी पाकिस्तानी पंजाबच्या सत्ताकारणाचा खेळच करून ठेवला असल्याने पाकिस्तानी नागरिकांना दोनदा खेळाचा आनंद लुटता येत आहे 

आपल्या भारतात जसे संसदेच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो ज्यास उत्तर प्रदेशात बहुमत मिळते त्याच पक्षाचा  संसदेत पंतप्रधान होतो ( देवेगोडा सारखे सम्मानिय अपवाद वगळून ) हा आतापर्यंतचा आपला इतिहास आहे पाकिस्तानच्या राजकारणात हा मान त्यांच्या पंजाबला आहे पाकिस्तानी राजकारणात ज्याच्या हाती पंजाबची सत्ता तो पक्ष अत्यंत प्रबळ मानला जातो .सध्या याचा पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेत मोठे नाट्य बघायला मिळत आहे १७ डिसेंबरला पाकिस्तानचे विद्यमान प्रमुख विरोधी पक्षनेते माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पंजाबची आणि खैबर ए पख्तून्ववा विधानसभा विसर्जित करण्यासाठी तेथील मुख्यमंत्री २३ डिसेंबरला गव्हनरला राजीनामा सादर करतील अशी बहू  प्रतिक्षीत घोषणा केल्यावर या नाट्याला सुरवात झाली पाकिस्तानमध्ये चार विधानसभा प्रमुख आहेत त्या म्हणजे सिंध, खैबर ए पख्तुन्वाखा (पूर्वीचा वायव्य सरहद्द प्रांत ) पंजाब आणि बलुचिस्तान त्यातील पंजाब या विधानसभा त्यांत प्रबळ समजली जाते इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाकडे खैबर ए पख्तुन्वाखा या विधानसभेत पूर्णतः संख्याबळ असल्याने तिथे काहीच प्रश्न नाही त्यामुळे तिथे काहीच नाट्य नाही सर्व नाट्य रंगतेय ते पाकिस्तानी पंजाबमध्ये पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेत बहुमताचा आकडा आहे १८६ आणि इम्रान खान यांच्याकडे संख्याबळ आहे १८० सदस्यांचे सहा सदस्य कमी पडत असल्याने ३७२ सदस्य असलेल्या पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेत १० सदस्य असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गट या पक्षाच्या पाठींब्याने इम्रान खान सत्तेत आहेत आपल्या १० सदस्यांची पूर्ण किंमत वसूल कारण्यासासाठी पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गटाचे परवेझ इलाही मुख्यमंत्री पदावर आहेत ३७२ सदस्य असलेल्या पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेत विरोधी पक्षाकडे १७९ सदस्य आहेत . आणि नाट्य सुरु होते ते इथेच 

        सध्या इम्रान खान यांची लोकप्रियता पाकिस्तानात प्रचंड आहे त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीनुसार सध्या निवडणुका झाल्यास इम्रान खान याना २/३ पेक्षा काहीसे जास्त मताधिक्य सहज मिळू शकते . जर इम्रान खान यांची सत्ता आल्यास विरोधी पक्षांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे . तसेच सध्या जसे पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गटाला अनन्य साधारण महत्व आले आहे ते सुद्धा नष्ट होईल त्यामुळे त्याचा पक्षाचा पुढे कधीही पाकिस्तानी पंजाबचा मुख्यमंत्री होणार नाही त्यामुळे इम्रान खान यांच्या फायद्यासाठी स्वतःचा बळी देण्यास पाकिस्तन मुस्लिम लीग कायदे गटाचे मुख्यमंत्री तयार नाहीत  त्यामुळे विधानसभा विसर्जित करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांवर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करणे ज्यामुळे मुख्यमंत्री पदावरून हटल्यावर पुन्हा पाकिस्तान मुस्लिग लीग कायदे गटाशी युती करून इम्रान खान यांचा सत्ताकारणात पत्ता कट करणे आदी प्रकार करण्याचे प्रयत्न सध्या १७ पक्षांची आघाडी असलेल्या पाकिस्तान डेमोक्रेक्तिक मूव्हमेंट या घडी कडून सुरु आहेत इतर वेळी  एकमेकांचा प्रचंड उद्धार करणारे राजकारणी इम्रान खान नको या एका मुद्यासाठी एकत्र येत हि आघाडी स्थापन करण्यात आली आहे 

पाकिस्तानात असणाऱ्या चारही विधानसभेच्या एकूण जागांपैकी सुमारे ६६ % टक्के जागा या पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तुन्वाखा (पूर्वीचा वायव्य सरहद्द प्रांत ) या ठिकाणी आहेत पाकिस्तानी संसदीय प्रणालीनुसार तीथे सर्व विधानसभेच्या आणि त्यांच्या संसदेच्या ( त्यांच्या संसदेला नॅशनल असेम्ब्ली असे म्हणतात ) निवडणुका एकत्रच होतात सध्याच्या वेळापत्रकानुसार या निवडणूक ऑक्टोबर २०२३ मध्ये होणार आहेत त्यामुळे पुन्हा वर्षभराने इतका खर्च करणे योग्य आहे का ? तसेच त्यावेळीया निवडणूक ना घेतल्यास इम्रान खान याना फक्त सिंध मध्येच प्रचार करावा लागेल सध्या इम्रानखान यानॆ मिळणारी लोकप्रियता बघता त्यामुळे विरोधी पक्षांना अन्य अडचणींस तोंड दयावे लागेल आणि देशातील विद्यमान राजकीय स्थिती बघता देशात सर्वत्र इम्रान खान यांची लाटअसल्याने  आता मिळाली तशी सत्ता पुन्हा मिळणे  अवघड आहे तरी करायचे तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे इम्रान खान सत्तेत आल्यास आपले काही खरे नाही असे समजल्याने पाकिस्तानमध्ये केंद्रीय सत्तेत असणारी आघाडी इम्रान खान यांच्या विरोधात विविध डाव खेळण्याचा पर्यटन करत आहे 

मात्र या खेळात देशाच्या अर्थव्यवस्थेकडे कोणाचेच लक्ष नाहीये अर्थव्यस्थेच्या वाईट अवस्थेमुळे नागरिक मरणप्राय  यातना भोगत आहे जे मानतावादी दृष्टिकोनातून विचार केल्यास वाईटच आहे दुःख त्याचेच आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?