सिंहावलोकन २०२२ क्रीडा,

      


सरते २०२२ हे वर्ष क्रीडा जगताचा विचार करता अत्यंत वादळी ठरले . जागतिक स्तराचा विचार करता अनेक वाद प्रतिवाद , टीका यावर्षी क्रीडा जगतात झाले एका संघाच्या  समर्थकांनी दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघाच्या समर्थकांशी प्राण जाईल इतक्या टोकाची मारामारी करण्याची घटना देखील यावर्षी जगाने अनुभवली . जगातिक स्तरावर मनाचा समजल्या जाणाऱ्या आणि काही वर्षांच्या अंतराने होणाऱ्या दोन स्पर्धा यावर्षी झाल्या .  एक भारतासाठी अत्यंत महत्वाची मात्र क्रीडा जगतात फारशी महत्वाची न मानल्या जाणाऱ्या स्पर्धेत  एक धक्कादायक पराभवाला भारताला सम्रोरे जावे लागले ते या बघता हे वर्ष भारतासह जगसाठी अत्यंत वादळी ठरले    

   या वर्षाची सुरवातच मुळी झाली राफेल नदाल , रॉजर फेडरलसह ३० ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या आणि जानेवारी २०२२ ची पुरुष खेळाडूंची जागतिक क्रमवारी बघता पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या नोवाक
जेकोविच यास त्याने कोव्हीड १९ चे लसीकरण पूर्ण न केल्याने ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या वेळापत्रकातील पहिली स्पर्धा असणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन भूमीवर येण्यास ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी प्रखर विरोध केल्याचा घटनेने आम्ही कोणत्याही स्थितीत धोका पत्करून शकत नाही अशी भूमिका घेत त्यांनी विरोध केला  ज्यामुळे नोवाक जेकोविचला हि स्पर्धा खेळता आली नाही 

   भारतीयांची जगाला असणाऱ्या अनेक देणग्यांपैकी एक असणाऱ्या बुद्धिबळ या खेळाविषयी बोलायचे झाल्यास भारत आणि जगाच्या विचार करता अत्यंत वादळी ठरले या खेळातील घडामोडींचा विचार करतात प्रथम जगाचा विचार करूया तर मित्रानो या वर्षी दोन घडामोडीनी बुद्धिबळ विश्व हादरले एक म्हणजे पुढील विश्वविजेता स्पर्धा खेळण्याबाबत विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसन उत्सुक नसल्याचे त्यांनी जाहीर केल्याची एक घटना आहे सातत्याने होणाऱ्या या स्पर्धेचा कंटाळा आल्याने मी
हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी जाहीर केले  तर दुसरी घटना आहे मॅग्नस कार्लसन यांनी ज्युलियस बेअर जनरेशन कप मध्ये  ग्रँडमास्टर हान्स हंस मोके निमन यांच्या समवेत खेळायला दिलेला नकार पूर्णतः बुद्धी कौशल्यावर आधारलेल्या बुद्धिबळ या खेळात सादर डाव खेळताना ग्रँडमास्टर हान्स हंस मोके हे अयोग्य पद्धतीने तंत्रज्ञाचा वापर करत खोटेपणा करत असल्याचा आरोप करत त्यांनी खेळायला नकार दिला होता भारताच्या अर्थाने  या बाबतीत विचार करायचा झाल्यास हे वर्ष अनेक अर्थाने वेगळे होते यावर्षी ऑगस्ट महिन्यात बुद्धिबळाच्या ऑलम्पियाडचे आयोजन भारतात करण्यात आले होते या स्पर्धंतील आतापर्यतचे सर्वाधिक संघ यावेळी सहभागी झाले होते .  रशिया युक्रेन युद्धामुळे रशियाकडून हे

आयोजन काढून घेतल्यानंतर विक्रमी वेळेत सर्व व्यवस्था करत हे ऑलम्पियाड खेळवण्यात आले होते या खेरीज भारतीय बुद्धिबळपटूंनी देखील या वर्षी अत्यंत चमकदार कामगिरी केली यावर्षी शेवटचा रविवार पर्यंत मराठ्मोठ्या नागपूरच्या रहिवाशी असलेल्या दिव्या देशमुख  आणि तेलंगणाच्या प्रियंका नुटक्की या  महिला ग्रँमास्टर पदाला गवसणी घातली दिव्या देशमुख आणि प्रियंका नुटक्की यांच्यासह अन्य तीन बुद्धिबळपटूंनी ग्रँडमास्टर हा 'किताब यावर्षी प्राप्त केला रमेशबाबू प्रगण्यानंद असे नाव असणाऱ्या मात्र आर प्रगण्यानंद या नावाने परिचित असलेल्या भारताच्या युवा ग्रँडमास्टरने विद्यमान विश्वविजेता पदासह एकूण पाचवेळा विश्वविजेता असणाऱ्या  मॅग्नस कार्लसन  यांना एकाच  वर्षात दोनदा हरवण्याचा पराक्रम केला तसेच भारताने वेस्टर्न एशिया युथ चेस चॅम्पियनशिप 2022 मध्ये 13 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह एकूण 29 पदके जिंकली आहेत. भारताने 105 पैकी 29 पदके जिंकली आहेत. काही वयोगटांमध्ये एकही भारतीय सहभागी नव्हता हे लक्षात घेऊन ही नक्कीच उत्कृष्ट कामगिरी आहे. साहिब सिंग, 
सफारुल्लाखान आणि सफारुल्लाखान या दोघांनीही क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्झ या तीन प्रकारात  प्रत्येकी एक एक सुवर्णपदक त्यांच्या त्यांच्या गटात जिंकले. तसेच संपूर्ण स्पर्धेत ते अपराजित राहिले.  .साहिब सिंग 
 भारतासाठी 13 पैकी सहा सुवर्णपदके त्यांनी जिंकली आहे साहिब सिंग आणि साफिन सराफुल्लाखान यांनी 14 वर्षांखालील ओपनमध्ये क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्झ या तिन्ही प्रकारात  तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. साहिब सिंग यांनी  8 वर्षांखालील तर  साफिन सराफुल्लाखान

यांनी १४ वर्षाखालील गटात यश संपादन केले  फिडे मास्टर हर्षद एसने यांनी १८ वर्षाखालील रॅपिड आणि ब्लिट्झमध्ये दोन सुवर्णपदक जिंकले, . 12 वर्षाखालील राष्ट्रीय खुल्या स्पर्धेतील विजेती गौतम कृष्णा एच आणि 18 वर्षांखालील मुलींची विजेती , महिला फिडे मास्टर  भाग्यश्री पाटील यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकली. सध्याच्या राष्ट्रीय कुमारी  गटातील विजेती   शुभी गुप्ताने तीन रौप्य पदके जिंकली.  कोलकात्ता येथे झालेली टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत  जलद बुद्धिबळ या प्रकारात खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये पहिल्या तिन्ही 
क्रमांकावर भारताच्या खेळाडूंनी आपली नावे कोरून हेच सिद्ध केले आहे ही स्पर्धा मुळात युरोपातील आघाडीची स्टील 
कंपनी कोरस या कंपनीकडून प्रायोजित करण्यात येणारी स्पर्धा आहे काही वर्षांपूर्वी कोरस हि कंपनी टाटांनी विकत घेतल्यामुळे पूर्वीच्या कोरस स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे नामकरण टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा झाले ( एकप्रकारे हा भारताच्या उद्यमशीलतेचाच वियज आहे )  टाटा स्टील ही स्पर्धा बुद्धिबळातील विबल्डन समजली जातेमराठमोळ्या वूमन ग्रँडमास्टर  दिव्या देशमुख या आशियाई कॉन्टिनेंटल 2022 मध्ये दोन पदके मिळवणाऱ्या  एकमेव भारतीय महिला खेळाडू  ठरल्या . पांरपारिक (क्लासिकल )प्रकारात  कांस्यपदक मिळवल्यानंतर, त्यांनी  अतिजलद (ब्लिट्झ ) महिला स्पर्धेत  पहिल्या डावातील पराभव पचवत त्यांचा पुढील डावांवर अनुचित परिणाम न होऊ देता  पुढील ८ डावात एक बरोबरी आणि तब्बल ७ विजय मिळवले . त्यांनी स्पर्धेतील ब्लिट्झ प्रकारात साडेसात गुणांची कामगिरी केली त्यां नी त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा अर्ध्या गुणांची अधिकची कामगिरी करत सुवर्णपदक आपल्या झो
ळीत घेतले नाशिकचे भूमिपुत्र  तरुणाईचे आयकॉन , सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी युरोपीय क्लब बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले , १० खेळाडूंचा सहभाग असलेल्या  आणि साखळी पद्धतीने खेळवलेल्या या स्पर्धेत विदित यांनी ४डावात  विजय ,४ डावात बरोबरी तर फक्त एकाच डावात पराभव स्वीकारत ६ गुणांची कामगिरी करत उपविजेतेपद आपल्या खिश्यात घातले . या विजयामुळे आपल्या फिडेरेटिंगमध्ये ६ इलो रेटिंगची  वाढ करत जागतिक क्रमवारीत २४ वरून थेट १९ व्या क्रमांकावर झेप घेतली त्यामुळे विदित गुजराथी पुन्हा एकदा जगातीलपहिल्या वीस खेळाडूत आले आहे . तसेच ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गुणांकन असलेले खेळाडू झाले आहेत . फिडे गुणकाचा विचार करता पुरुष खेळाडूंचा विचार करता जगातील पहिल्या ३५ खेळाडूंमध्ये ५ खेळाडू आहेत तर महिला खेळाडूंचा विचार करता पहिल्या ३५ खेळाडूंमध्ये ३ खेळाडूंचा समावेश आहे जर सांघिक कामगिरीचा विचार केला तर भारत पुरुषांचा आणि महिलांचा गटात  तिसऱ्या स्थानी आहे तर या वर्षांपासून सुरु करण्यात आलेल्या महिला आणि पुरुषांच्या एकत्रित सांघिक कामगिरीचा विचार करता सुद्धा भारत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरआहेमहिलांच्या विश्वविजेते स्पर्धेसाठी आव्हानवीर ठरवण्यासाठी घेण्यात आलेल्या महिलांच्या कॅन्डीडेट स्पर्धेत भारताची आघाडीची महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी या अ गटातून उपांत्य फेरीत अत्यंत छोट्या फरकामुळे स्पर्धेबाहेर पडल्या  इंडोनेशिया देशातील बाली या शहरात झालेल्या आशियाई युवा बुद्धिबळ विजेतेपद स्पर्धेत विविध प्रकारात मिळून २७ वैयक्तिक आणि १९ सांघिक पदके भारतीय बुद्धिबळपटूंनी मिळवली आहेत या स्पर्धेत एकूण १०८ वैयक्तिक पदके देण्यात आली त्यापैकी अचूक २५ % पदके भारतीय खेळाडूंनी मिळवली हे विशेष  . वैयक्तिक पदकांमध्ये १३ पदके ही सुवर्ण, ६ रौप्य ,आणि ८ कांस्य पदके आहेत .  भारताला सांघिक प्रकारात ८ सुवर्ण , ७ रौप्य , आणि ६ कांस्य पदके मिळाली विविध वयोगटात झालेल्या या स्पर्धेत
काही गटात भारताला संघ होण्यसासाठी पुरेसे खेळाडूं नसताना भारतीय खेळाडूंनी हा भीम पराक्रम केला आहे त्याबद्दल भारतीय युवा बुद्धिबळ खेळाडूंचे कौतुक करावे तितके कमीच      बुधवार २८ सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री दहाच्या सुमारास  चार्वी अनिलकुमार आणि शुभी गुप्ता अनुक्रमे 8 वर्षांखालील मुली आणि 12 वर्षांखालील मुलींच्या गटात जागतिक विजेतेपद मिळवले  अबुधावी येथे झालेल्या अबुधावी मास्टर ही बुद्धिबळाची  स्पर्धा अर्जुन एरिगासी या भारतीय बुद्धिबळ खेळाडूने जिंकली ३१ देशातील १४२ खेळाडूंशी लढत देत त्यांनी हे यश मिळवले आहे . या स्पर्धेत ते पूर्णतः अपराजित राहिले या स्पर्धेत त्यांनी ६ विजय मिळवले तर तीन डावात प्रतिस्पर्ध्याला बरोबरी मान्य करत दीड गुण मिळवत एकूण साडेसात गुण गुणांसह विजयश्री प्राप्त केली दुबई खुल्या  बुद्धिबळ स्पर्धेत देखील भारतीय खेळाडूंनी चमकदर कामगिरी केली बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नियमन करणारी संघटना   इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ दि इचेस म्हणजेच फिडे या संघटनेच्या उपमुख्य अध्यक्ष (deputy president)  म्हणून  विश्वनाथन आंनद यांची निवड या वर्षी झाली Chessable Masters online rapid chess tournament   . या स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेरीस  २० मे  रोजी  भारतीय ग्रँडमास्टर आरप्रगण्यानंद   यांनी विश्वविजेत्या कार्लसनच्या पराभव करण्याचा भीम पराक्रम केला  आर प्रग्यानंद यांनी मॅग्नस कार्लसन याचा पराभव करण्याची ही  २०२२ या वर्षातील दुसरी वेळ   या आधी याच वर्षी २१ फेब्रुवारी रोजी   Airthings Masters.या स्पर्धेत  आठव्या फेरीत त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून विश्वविजते असणाऱ्या मॅग्नस कार्लसन याना पराभवाचे पाणी पाजायला भाग पडले. Tarrasch variation पद्धतीने खेळल्या गेलेल्या या डावात काळ्या मोहऱ्या घेऊन खेळताना आर  प्रग्यानंदयांनी यांनी प्रतिस्पर्धी विश्वविजेता मॅग्नस कार्लसर्न यांना १९ व्या चालीतच नमवले नाशिकचे सुपुत्र जगातील 19वे आणि भारतातील क्रमांक दोनचे ग्रँडमास्टर विदीत गुजराथी यांनी बुद्धीबळातील विद्यमान विश्वविजेते कार्लस मँग्नस यांच्या बरोबर टाटा स्टील चेस चँम्पियनमध्ये कठीण स्थितीतील डाव बरोबरीत सोडून आपण भविष्यातील मोठे दावेदार असल्याचे स्पष्ट केले या खेरीजइतिहासात पहिल्यांदा बुद्धिबळाची राष्ट्रीय स्पर्धा नाशिक मध्ये आयोजित करण्यात आली गेल्या कित्येक वर्षातील नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेली हि पहिली राष्ट्रीय स्पर्धा होती

 भारतात विशेष लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेटच्या बाबतीत हे वर्ष अत्यंत वादळी ठरले यावर्षी मुळात श्रीलंकेत होणाऱ्या मात्र तेथील आर्थिक अडचणीमुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे युनाटेड अरब अमिरात या देशात आयोजित करण्यात आलेल्या पुरुष आशिया चषक स्पर्धेत भारताला पाकिस्तानने धक्कादायक हरवले गेल्या काही वर्षातील स्पर्धांमध्ये झालेल्या सामन्यात नेहमी भारताचं पाकिस्तानविरुद्ध विजयी होत होता तसेच पुढील वर्षी पाकिस्तानात होणारी आशिया चषक स्पर्धेत आम्ही खेळणार नाही सदर स्पर्धा दुसऱ्या त्रयस्थ ठिकाणी आयोजित करण्यात यावी अशी मागणी भारतने केल्यावर पाकिस्तानकडून पुढच्याच वर्षभारतातच होणाऱ्या  एकदिवशीय विश्वचषकात आम्ही खेळणार नाही असे जाहीर करण्यात आले तसेच ऑस्ट्रेलिया या देशात झालेल्या टी २० विश्वचषकादरम्यान पाकिस्तानी पुरुष  संघ आणि अफगाणिस्तान पुरुष  संघात झालेल्या सामान्यास हिंसेचे गालबोळ लागले      

   आपल्या महाराष्ट्रत कोल्हापूर आणि भारताचा विचार करता गोवा पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात विशेष लोकप्रिय असलेल्या फ़ुटबाँलचा विचार केला असता हे वर्ष अत्यंत वादळी ठरले  इंडोनेशिया बीआरआई लीग या स्पर्धेत अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय  या दोन संघात झालेलया सामन्याला हिंसाचाराचे गालबोट लागले हा  सामना पर्सेबाया सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात करत ३-२ ने सामना जिंकला. या सामन्यानंतर पराभूत झालेल्या अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घातला. यावेळी नाराज चाहत्यांना हुसकवण्यासाठी पोलिसांनी आश्रू धुराच्या कांड्याचा मारा केला पोलिसांच्या या.कृतीमुळे स्टेडियममध्ये एकच गोंधळ उडाला आणि स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये ३४ जणांचा जागीच मृत्यू झाला  तर १८० हुन अधिक जण गंभीर जखमी झाले तसेच इतिहासात पहिल्यांदाच कतार या आखाती देशात जगात पहिल्यांदा फ़ुटबाँलच्या विश्वचषकाच्या

सामन्याचे आयोजन करण्यात आले या आयोजनावर अनेक बाजूने टीका करण्यात आली या आयोजनात मानवी हक्काची पायमल्ली करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला धार्मिक विचारांचा पगड असलेल्या कतार या  देशात होणाऱ्या या विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान उत्साह साजरा करण्यावर अनेक बंधने होती

 एकंदरीत २००२२ हे वर्षक्रीडाविश्वाच्या बाबतीत अत्यंत वादळी ठरले हेच खरे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?