सिंहावलोकन २०२२ नैसर्गिक आपत्ती


ग्रेनीयन वर्ष २०२२ संपायला आता मोजकेच दिवस राहिलेले आहेत या सरत्या वर्षाचा विचार नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने केला असता आपणास या वर्षात आपणास अनेक नैसर्गिक आपत्ती आल्याचे दिसून येते या आपत्तीचे आपण हवामान बदलामुळे आलेल्या आपत्ती आणि पृथ्वीच्या भूगर्भातील विविध घटकांच्यामुळे मानवास सामना करावयास लागलेल्या नैसर्गिक आपत्ती असे वर्गीकरण केल्यास दोन्ही भागातील नैसर्गिक आपत्तीचा मानवास या वर्षात मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला असल्याचे आपणस दिसून येते

वर्षाची सुरवातच पृथीच्या भूगर्भातील घडामोडीने आलेल्या नैसर्गिक आपत्तीने झाली तर आता वर्षाची अखेर हवामान बदलामुळे होणाऱ्या संकटामुळे मानवावर आलेल्या आपत्तीने होत आहे चला तर जाणून घेऊया वर्षभरात मानवास सामोरे जावे लागणाऱ्या नैसर्गिक आपत्तीविषयी .प्रथम पृथ्वीच्या अंतरंगातील घडामोडींमुळे आलेल्या संकटाविषयी बोलूया वर्षाच्या पहिल्याच पंधरवड्यात पॅसिफिक महासागरातील रिंग ऑफ फायर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील एक ज्वालामुखीचा मोठ्या प्रमाणत उद्रेक झाला या उद्र्कामुळे या ज्वालामुखीच्या जवळ असणाऱ्या टोंगो या देशात मोठ्या प्रमाणत नुकसान झाले त्यांच्या जगाशी असणारा संपर्क जवळपास संपला तेथील जलसाठे मोठ्या प्रमाणत दूषित झाले ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे उडालेल्या राखेमुळे त्यांचे पाणीसाठी वापरण्याजोगे राहिले नाही त्यांची जीवितहानी जास्त झाली नाही मात्र अनेक मानवास आवश्यक असणाऱ्या सोयीसवलतींचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले बुधवार २२ जून रोजी  भारतीय प्रमाणवेळेनुसार  रात्री अडीचच्या सुमारास अफगाणिस्तानमध्ये ५पुर्णांक ९ शतांश रिक्टर स्केलचा भुकंप झाला.ज्यामध्ये एक हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. अफगाणिस्तानमधील ज्या भागात भूकंप झाला त्या भागात भुगर्भ तज्ज्ञांच्या मते छोटे भुकंप होवू शकतात.मोठ्या तिव्रतेचे भुकंप त्या भागात  अतिशय अपवादात्मक स्थितीत होवू शकतात. तरी देखील त्या भागात मोठा म्हणता येईल असा५ पुर्णांक ९शतांश तिव्रतेचा भुकंप झाला.अंदमान निकोबार या बेटसमूहात चे ६ जुलै या एकाच


दिवसात २४ तासात भूकंपाचे  तब्बल २२ धक्के बसले रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३ पूर्णांक ८ शतांश ते ५ या दरम्यान होती या खेरीज आसाम राज्यात ७ जुलै रोजी अत्यंत छोटा म्हणजे २ पूर्णांक ५ शतांश रिक्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यत आला या दोन्ही भूकंपापामुळे जीवित हानी खूप झालेली नसली तरी भूगर्भ तज्ज्ञांना मोठ्या प्रमाणत चिंतेत टाकले    ५ सप्टेंबर २०२२ च्या सकाळी चीनच्या आग्न्येय भागात शक्तिशाली म्हणता येईल असा साडेसहा रिक्टर स्केलचा भूकंप झाला   नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात  ने भूकंपाचे छोटे छोटे धक्के  यावर्षी बसले भूकंपाचे धक्के बसण्यासाठी नाशिकचा कळवण तालुका प्रसिद्ध होता यावर्षी त्या तालुक्याचा शेजारच्या तालुक्यात देखील भूकंपाचे धक्के बसले यावर्षी आठवाड्यत किमान एक  मध्यम  ते मध्यम  आणि तीव्र याच्या सीमेवर रिक्टर स्केल असणारा भूकंप झाला त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञानाना त्याचे ज्ञान अधयववत  करण्याची गरज या वर्षी निर्माण झाली

आता वळूया हवामान बदलामुळे मानवास अनुभवायला आलेल्या संकटाकडे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अमेरिका देशाच्या अनेक भागात हिमवादळांनी उत्साहात मांडला या काळात अमेरिका देशासह उत्तर भारतात प्रचंड थंडी होती अमेरिका देशात आणि ऊत्तर भारतात थंडीचे बळी गेल्याची बातमी मात्र आली नाही अमेरिकेत  याथंडीमुळे तेथील प्रशासनने शाळा महाविद्यलये बंद ठेवली   अमेरिकेसारखी जगातील महासत्ता असून देखील अनेक नागरिक विद्युत पुरवठ्यापासून वंचित राहावे लागले याच काळात म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आग्नेय आशियात मलेशिया आणि

इंडोनेशिया या देशात पावसाने हाहाकार उडवला त्याठिकाणी पडलेल्या पावसामुळे मोठे पूर आले २२ फेब्रुवारीपासून  ऑस्ट्रेलिया देशाच्या पूर्व किनाऱ्यावर अतिशय मुसळधार पाऊस पडला  त्यामुळे तेथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले  ब्रिसबेन नदीच्या खोऱ्यातून सुमारे ६७ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले  ९ जणांचा यात मृत्य झाला आहे  अनेक भागांचा संपर्क तुटलाय काही भाग अंधारात बुडाला मच्या प्रदेशात गेल्या १ हजार वर्षात अशा मुसळधार पाऊस झालेला नाही " असे विधान ऑस्ट्रेलिया या देशातील क्यिन्सलँड आणि न्यू साऊथ वेल्स या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी या पावसाबाबत केले मार्चच्या महिन्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात बेमोसमी पाऊस पडला . याच मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात  भारताचा ऊत्तर भाग आणि महाराष्ट्रला भागाला  अत्यंत भयानक अश्या उष्णलहरींचा सामना करावा लागला   अनेक ठिकाणी वातावरण ४० अंश सेल्सियस च्या जवळपास नोंदवले गेले ९ एप्रिल ते १३ एप्रिल या चार दिवसात पडलेल्या पावसामुळे   दक्षिण आफ्रिकेत ६० लोक तर फिलिपाइन्स या देशात ४५ लोक मृत्युमुखी पडले एप्रिल महिन्यात  मेक्सिको या देशातील सरकारने त्यांचा देशात कामाचे फक्त पाच दिवस करण्याचे ठरवले .दोन दिवस सुट्टी दिल्यामुळे लोक घराबाहेर कमी पडतील ,परीणामी तेथील सामान्य लोक सुर्याचा प्रकोपातुन वाचतील असा मेस्किकन सरकारचा कयास होता मे महिन्यात आसाम राज्यात मांसुमपुर्व पावसाने हाहाकार उडवला तेथील रेल्वेमार्गासह अनेक मानवी संपत्तीचे मोठया प्रमाणत नुकसान या पावसाने केले जनजीवन मोठ्या प्रमाणत उद्धवस्त झाले जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ब्राझील या देशात ब्रा९१ ज्यांना प्राणास मुकावे लागले आणि सुमारे दहा हजार लोक विस्थापित झाले इ  राकमध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणत धुळीची वादळे झाली पावसामुळे इशान्य भारतात गेल्या आठवड्याभरात १२५ लोकांचा मृत्यू,  पावसाने ओढ दिल्यामुळे तूर्कीये (पुर्वीचे नाव तूर्की) , देशात आणिबाणी जाहिर करण्याची स्थिती, बदलत्या हवामानामुळे लोकांच्या ताणतणावात वाढ झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे निरीक्षण, आसाम आणि मेघालयमध्ये जून महिन्यात सरासरीच्या १३४% पाउस, सुमारे २५% ,
बांगलादेश पुरामुळे पाण्याखाली {६४पैकी१७ जिल्हे}, मेस्किकोमध्ये दुष्काळामुळे पाण्याचे रेशनिंग करायची वेळ सरकारवर या प्रकारच्या बातम्यांनी जूनच्या तिसऱ्या आठवाड्यत वर्तमानपत्रात जागा मिळवली ८ जुलै रोजी अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटी होऊन काही भाविकांचा मृत्यू झाला  . १९ जुलै २०२२ या दिवशी लंडनच्या इतिहासात पहिल्यांदाच ४० अंश २ शतांश नोंदवले गेले . सोमवार रात्र आणि मंगळवार पहाट  लंडनला सलग दुसरी जास्त तापमान असलेली रात्र म्हणून नोंदवली गेली जुलैचा पहिल्या पंढरवाडयांचा विचार करता आपल्या महाराष्ट्रात  जून महिना बऱ्याच प्रमणात कोरडा गेल्यावर आत जुलै महिन्यात काहिस्या कमी वेळात मोठा पाऊस पडल्याने कमी दिवसाच्या पावसातच नद्यांना पूर आले ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंढरवाद्याचा विचार करता  युरोपातील  सुमारे ६० % भूभागावर आताच कमी पाऊस झाला  . ड्रोन आणि विमानांनी टिपलेल्या छायाचित्रात युरोपातील अनेक महत्त्वाच्या नद्या मोठ्या प्रमाणत आटलेल्यादिसल्या  . युरोप खंडातील अनेक देशात गेल्या कित्येक दशकातील  सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली  युरोप खंड तसा थंड तापमानाचा प्रदेश ओळखला जातो जिथले उन्हाळ्यातील सर्वसाधारण कमाल तापमान २२ ते २८ अंश सेल्सियस दरम्यान असते मात्र या वर्षी स्पेन युनाटेड किंग्डम फ्रांस स्पेन  या देशात ४० अंश सेल्सियस पेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले  ३० सप्टेबररोजी भारतीय हवामान खात्याकडून मनुस्म्च्या पावसाची धक्कादायक आकडेवारी जाहीर करण्यात आली यावर्षी सरासरीच्या १०६ % पाऊस झाला मात्रत्याचे क्षेत्रनिहाय वितरण प्राचीन असमान होते बिहार राज्यात सरासरीपेक्षा 31%, उत्तर प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा 28%
झारखंडमध्ये सरासरीच्या 20% आणि मणिपूरमध्ये 48% तर , त्रिपूरा आणि मिझोराममध्ये अनुक्रमे 24%, 22% पाऊस कमी पाऊस झाला आहे तर आपल्या महाराष्ट्रमध्ये सरासरीपेक्षा 23% , मध्यप्रदेशात 23%   गुजरात राज्यात 27 तर , तेलंगाणा आणि , तामिळनाडू अनुक्रमे 46 आणि 45% जास्त पाऊस झाला  ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला बेमोसमी पावसाने धुमाकूळ घातला तर शेवटच्या आठवड्यात एक अहवाल प्रसिद्ध झालाजो  India's environment think tank Centre for Science and Environment तर्फे प्रसिद्ध करण्यात आला या  अहवालानुसार  १ जानेवारी २०२२ ते ३०सप्टेंबर २०२२ या वर्षातील २७३ दिवसांपैकी २४१ दिवशी बदलत्या हवामानाने भारतीयांना आपले रंग दाखवले आहेत कॉप २७ मध्ये  भारताने शनिवार १२ नोवेंबर रोजी केलेल्या  आवाहनाला सोमवारी १४ नोव्हेंबरला अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स (ASIS) ची स्थापना करणार्‍या 39 देशांनीही पाठिंबा दिलाजीवाश्म इंधने कमी करण्याच्या  बाबत हे आवाहान करण्यात आले होते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जागतिक बँकेकडून भारतात होणाऱ्या हवामानबदलाकच्या कार्यक्रमाविषयी चिंता व्यक्त करणारा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शीतलहरींमुळे अमेरिका जपान आदी देश त्रस्त झाले आहेत ऊत्तर भारतात पारा प्रचंड घसरला आहे

थोडक्यत सरत्या वर्षाने जगाला नैसर्गिक आपत्तीचा विचार करता अनेक अर्थाने रडवले आहे

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?