ऋषभ पंत यांच्या अपघातामुळे निर्माण झालेले अनुत्तरित प्रश्न

   

भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू   ऋषभ पंत यांच्या कारला राष्ट्रीय महामार्ग ५८वर शुक्रवरी  पहाटे गंभीर अपघात झाला . स्वतः गाडी चालवताना डुलकी लागल्याने हा अपघात झाला या अपघाताच्या निमित्याने या आधी अनेकदा चर्चिले गेलेल्या मात्र तरीही अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला . तो म्हणजे आपले रस्ते वेगवान वाहने चालवण्यासाठी सक्षम असले तरी चालकांची शारीरिक आणि मानसिक स्थिती अश्या प्रकारे वेगवान वाहन चालवण्यास सक्षम आहे का ? 
         आपल्याकडे रस्ते मोकळे दिसले की  अनेक भल्या भल्या लोकांना एक्सलेटरवर पाय देण्याचा मोह आवरत नाही . रस्ता मोकळा दिसला की , तो आपणास गाडीची वेगमर्यादा ओलांडयाचा परवानाच दिलेला आहे या प्रकारचे वर्तन चालकांकडून अनेकदा घडते . अपघाताच्या वेळी अशी वेगवान गाडी नियंत्रणात आणणे अशक्यप्राय होते आणि अपघाताची तीव्रता मोठ्या प्रमाणत वाढते .  आपणास महामार्गावर प्रवास करताना वेग आवरा स्वतःला सावरा या सारख्या ज्या पाट्या दिसतात त्या मनोरंजासाठी नसतात तर आपणास सावध करण्यासाठी असतात . आपले वाहन जोरात तर नाहीना ?असल्यास त्याचा वेग नियंत्रणात आणण्याची ती सूचना असते मात्र अनेकदा आपणास त्याचा विसर पडतो मग एखाद्या वळणावर , एखादी रस्त्यात थांबलेली गाडी अचानक समोर दिसल्यास वाहन नियंत्रांत आणणे काहीसे अवघड होते परिणामी गंभीर अपघात होतो वाहने आधुनिक असली तरी ती कशी हाताळावी याची माहिती संबंधितांना नसल्याने ती काहीशी आयोग्य पद्धतीने हाताळली जातात . त्यामुळे अपघाताच्या प्रसंगी कुचकामी ठरतात सध्याच्या गाड्या अपघातात कमीत कमी प्राणहानी होईल या पद्धतीने काम करत असली  तरी त्यासाठी त्यांची निगा राखणे तसेच गाडी योग्य वेगात चालवणे आवश्यक असते मात्र ते होत नसल्याने अपघाताच्यावेळी ती पुरेश्या पद्धतीने कार्यरत राहत नाही 
          मी अनेकदा रात्रीच्या वेळी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक महामार्गावरून प्रवास केला आहे त्यावेळी आलेल्या अनुभवानुसार मी सांगू इचित्तो की तुम्ही कितीही जागे असला तरी ज्या रसमोरच्या स्स्त्यावर आणि आजूबाजूला काहीही नसले तर काही काळाने शरीर थकते . आणि मनुष्याला डुलकी लागते . या मानवी क्षमतेचा
विचार न केल्याने अनेक अपघात होतात नॅशनल क्राईम ब्युरो आणि अनेक रस्ते सुरक्षाविषयक कार्यरत अनेक स्वयंसेवी संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार रस्तेअपघातांच्या कारणांचा विचार केला असता  जवळपास ८५ ते ९० ५ वाटा हा मानवी चुकांचा असतो रस्त्यातील अडथळे किंवा गाड्यांची स्थिती यामुळेघडणारे अपघात फक्त १० % अपघात होतात . मानवी चुकांमुळे गाडी नियंत्रणात न येऊन अपघात होण्यामागे बहुसंख्यवेळा जास्त वेग हेच कारण असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे .   ऋषभ पंत यांच्या अपघाताचा जो व्हिडीओ समाज माध्यामांमध्ये फिरत आहे त्यामध्ये गाडीचा वेग जास्त असल्याचे दिसत आहे या जास्तीचा वेगामुळे गाडी नियंत्रणात न येता दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूच्या विजेच्या खांबावर आदळली . सध्या बांधल्या जात असणाऱ्या रस्त्यांचा विचार करता सध्या असणारे रस्ते दुभाजक बऱ्यापैकी रुंद असतात . तासेच ते पक्क्या सिमेंटच्या काहिस्या उंच अश्या ओट्याने बांधलेले असतात त्यामुळे ते तोडून गाडी पलीकडे जाणे अश्यक्य असते तसेच आपण शाळेत शिकल्याप्रमाणे वस्तुमान गुणिले वेगाचा वर्ग बरोबर ऊर्जा या सूत्राचा विचार करता ऋषभ पंत यांच्या कारमध्ये मोठ्या प्रमाणत ऊर्जा होती गाडी नियंत्रणात आणताना तिला वेगाने कमी करण्याचा प्रयत्न झाल्याने तिने दोन तीनदा पलटी खाल्ली ज्याचा परिणाम गाडीतील इंधनावर होऊन त्याने आणि त्यानंतर संपूर्ण गाडीने पेट घेतला गाडी जर जास्त वेगात नसली तर अपघाताची तीव्रता काहीशी कमी झाली असती हे नक्की म्हणजेच अन्य अपघातापसारखेच याही अपघाताळसासाठी जास्त वेग हेच कारण आहे जे सहजतेने टाळता येणे शक्य आहे . 
         ऋषभ पंत  यांच्या आधी ज्येष्ठ उद्योजक  सायरस मिस्त्री , अभिनेत्री  भाकिते बर्वे, अभिनेते आनंद अभ्यंकर, ज्येष्ठ राजकारणी गोपीनाथ मुंडे  आदी अनके प्रसिद्ध व्यक्तींना प्राणघातक अपघाताला सामोरे जावे लागले आहे मात्र या सर्व अपघातांना रोखण्यस्साठी  आवश्यक ती उपाययोजना केल्या जात नाहीत त्यामुळे या सारख्या रस्ते अपघाताची परंपरा सुरूच राहते . ज्यामुळे आपले कितीर्तरी मोठे नुकसान होते आता या अपघातातून सावरत पुन्हा आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्यास ऋषभपंतला मोठा कालावधी लागेल या काळात होणाऱ्या क्रिटेत सामन्यासाठी तो नसेल त्याच्या अनुपस्थीतच भारताला खेळावे लागेल झाले ना भारताचे नुकसान सध्या आपल्याकडे क्षणाधार्त वेग पकडणाऱ्या गाड्या आहेत रस्ते देखील त्यास अनुकूल होत आहेत मात्र या साधनांचा सुयोग्य वापर कसा करायचा / काय काळजी घेयची  याबाबत आपल्याकडे पुरेशी जागृती नाहीये त्यामुळे या अपघाताच्या निमित्याने याबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?