६ महिने झाले राष्ट्रीय महामार्ग बंद

   


  १२ जुलै २०२२ ही फक्त एक  तारीख नाहीये . आपल्या महाराष्ट्रातील एक राष्ट्रीय महामार्ग बंद होण्याची ती तारीख आहे आज या घटनेला ६ महिने होत आले आहेत मात्र अद्याप हा महामार्ग बंदच आहे . नाशिकहून दिंडोरी सापुतारा मार्गे सुरतला जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८  हाच तो राष्ट्रीय महामार्ग . सापुताऱ्याजवळ असणाऱ्या घाटात दरड कोसळून हा महामार्ग बंद झाला . महामार्ग बंद झाल्यावर त्या दिवशी माध्यमामध्ये याविषयी बातम्या आल्या त्यानंतर मात्र प्रस्थापित माध्यमांना बातमीविषयी अनेक महत्वाचे विषय असल्याने या विषयी त्यांनी मौनच बाळगले . फक्त दहा किलोमीटरसाठी ग्रामस्थांना मारावा लागतोय सत्तर किमीचा फेरा या सारख्या सनसनाटी मथळ्याचा बातम्याही त्यांनी दिल्या नाहीत . न जाणो या भागातील लोकांनीही आम्हाला गुजरातमध्ये जायचे आहे अशी मागणी केली तर काय करायचे ? त्यापेक्षा त्याचा संपर्क ठेवणारा राष्ट्रीय महामार्ग बंद असलेलाच बरा असा उदात्त विचार त्या मागे असेल कदाचित 

   मात्र हा राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने नाशिकहून सुरतला जायला दिंडोरी सापुतारा वाजदा यामार्गे जाता येत नाहीये . तर नाशिकहुन सुरतला जाण्यासाठी पेठ धरमपुर वापी या मार्गाने जावे लागत आहे जो काहीसा लांबचा आहे ज्यामुळे प्रवाश्याचा वेळ वाढवण्याबरोबर इंधनावरील खर्च देखील वाढवत आहे सापुतारा जवळील महाराष्ट्र्राच्या हद्दीतील भूभागाला  वाजदा सारख्या गुजरात हद्दीतील मात्र स्वतःच्या प्रदेशाच्या जवळचा भूभागात जाण्यासाठी बराच लांबचा फेरा मारावा लागतोय .
   गुजरातमधील सुरत आणि सोलापूरमार्गे चेन्नईला जाणारा नवीन महामार्ग होणार असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतोय कदाचित कारण जगात फुकट काहीच मिळत नसताना, त्यांना तरी सह्जतेनी महामार्गाचा सहजतेने फायदा का म्हणून देयचा त्यांना  पहिले त्रास देऊन नंतर सुख दिले पाहिजे महणजे त्यांना त्याचे महत्व समजेल असा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला तर कुठे बिघडले 
       तसेच न जावो हा रस्ता सुधारल्यास या मार्गे महाराष्ट्राचा एखादा प्रकल्प सुद्धा गुजरातला पळून जायचा तसेच या सुधारलेल्या मार्गाने आपल्याच महाराष्ट्रातील नागरिकांनी प्रवास करून गुजरातमधील बदल बघितले तर ? हे लोक आपल्या महाराष्ट्रातील प्रशासनांस घराचा आहेर देतील ? त्यामुळे घराचा आहेर घेण्यापेक्षा तो रस्ताच बंद
ठेवला तर संपर्क साधने अवघड होईल परिणामी ' ना राहेगा बाज ना बजेगी बासुरी " या हिंदी म्हणीप्रमाणे प्रश्नच उपस्थित होणार नाही हाहि मुद्दा हा रस्ता बंद ठेवण्यामागे असू शकते 
कारण लाख मेले तरी चालतील लाखोंचा पोशींदा मात्र जगला पाहिजे ना ? त्यामुळे तेथील ग्रामस्थांना कितीही त्रास झाला तरी चालेल त्यांना जागवणारी प्रशासनस व्यवस्था मात्र टिकलीच पाहिजे ना 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?