९ ते ११ जानेवारी हे दिवस पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचे !

         


   ९ ते ११ जानेवारी हे ३ दिवस पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत .पाकिस्तानमधील लोकशाही कोणत्या मार्गाने प्रवास करणार ? पाकिस्तानमधील राजकीय संकट अजून गहिरे होते की .  तो तणाव नाहीसा होतो? याबबाबाचा निर्णय या तीन दिवसात होईल ९ जानेवारीला मुळात ३१ डिसेंबरला होणाऱ्या मात्र पाकिस्तानातील केंद्रीय सत्तेत असणाऱ्या पाकिस्तान डेमोक्रेक्तिक मूव्हमेंट १७  पक्षाच्या  आघाडीच्या राजकीय खेळीमुळे लांबणीवर पडलेल्या इस्लामाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका होतील या निवडणुकीत आधी मतदानपूर्व कल चाचणीत व्यक्त झालेल्या प्रमाणे बॅट ची जादू (इम्रान खान यांच्या पक्षाचे चिन्ह )किती प्रमाणत चालते ? हे बघणे उत्सुकतेचे ठरेल . याच दिवशी पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेत तेथील मुख्यमंत्री परवेझ इलाही यांच्या विरोधात अविस्वासाच्या मुद्यावर मतदान होईल . त्याच दिवशी म्हणजे ९ जानेवारीला  लाहोर उच्च न्यायालयात पाकिस्तानी पंजाबची विधानसभा विसर्जित करणे संविधानाला धरून कायदेशीर आहे का ? याबाबत .सुनावणी होईल  त्यानंतर
११ जानेवारीला लाहोर उच्च न्यायालायने पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेच्या प्रश्नावर  या  मुदतीपूर्वी पाकिस्तानी  पंजाबची विधानसभा विसर्जित करूनये असे या आधीच्या सुनावणीदरम्यान घातलेल्या बंधनाची मुदत संपुष्ठात येईल या तीन घटकांमुळे पाकिस्तानचे राजकारण पूर्णतः ढवळून निघेल ज्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम भारतावर होणारच असल्याने या घडामोडी आपल्यासाठी देखील महत्वाच्या ठरतात 

       पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात सध्या प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ कडून सातत्याने पाकिस्तानातील केंद्रीय सत्तेचा सहभागी असलेल्या १७ पक्षाच्या आघाडीचा  प्रभाव फक्त इस्लामाबाद फेडरल कॅपिटल टेरेटरी (IFCT ) या २७ किलोमीटर क्षेत्र असलेल्या भूभागावरच आहे अन्यत्र सर्व बॅटची (पाकिस्तान तेहरीके इन्साफ या राजकीय पक्षाचे चिन्ह ) जादू असल्याचा सातत्याने आरोप सातत्याने करण्यात येत आहे इस्लामाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्याने केलेल्या मतदानपूर्व कल चाचणीत इम्रान खान यांचा मोठा प्रभाव इस्लामाबादमधील जनतेवर असल्याचे दिसून आल्याने आपले नाणे खणखणीत करण्यासाठी पाकिस्तानच्या केंद्रीय सत्तेत असलेल्या पाकिस्तानी डेमोक्रेक्तिक मूव्हमेंट या १७ पक्षाच्या आघाडीला या निवडणुका जिंकाव्याच लागतील त्यासाठी ते या निवडणुकीत गैर प्रकार करण्याची दाट शक्यता आहे              

 आजमितीस पाकिस्तानात बलुचिस्तान , सिंध , पंजाब , खैबर ए   पख्ततनूवा आणि पाकिस्तानने अनधिकृतरित्या ठेवलेल्या  गुलाम काश्मीर ची एक अश्या एकूण ५ विधानसभा आहेत  तर केंद्रीय राजधानी असलेल्या इस्लमबादचा कारभा रबघण्यासाठी  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निगराणीखाली   इस्लामाबाद फेडरल कॅपिटल टेरेटरी (IFCT )    या नावाची आपल्या केंद्र शासित प्रदेशासारखी प्रशासन व्यवस्था आहे यातील   खैबर ए   पख्ततनूवा ,पाकिस्तानने अनधिकृतरित्या ठेवलेल्या  गुलाम काश्मीर या विधानसभेत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाचे बहुमतातील सरकार आहे तर पाकिस्तानी पंजाबमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गटाच्या बरोबर

आघाडीबरोबर पाकिस्तान तेहरीके इन्साफ सत्तेत आहे . बलुचिस्तानमध्येस्थानिक पक्ष सत्तेत आहे सिंधमध्ये पाकिस्तान पिप्लस पार्टी नावाचा पक्ष मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट (जो एम क्यू एम या नावाने प्रसिद्ध आहे ) या पक्षाबरोबर सत्तेत आहे फेडरल कॅपिटल टेरेटरी (IFCT )  मध्ये पाकिस्तान थेरके इन्साफ हा पक्ष बहुमताचा जवळ आहे त्यामुळे पंतप्रधानपदी आरूढ अस्नणाऱ्या पाकिस्तान मुस्लिम लीग नूर गट या पक्षाच्या अस्तित्वासाठी त्यांना इस्लमाबाद महानगरपालिकेच्या निवडणूका अत्यंत महत्वाच्या आहेत .जर या ठिकाणी पाकिस्तानी तेहरीके इन्साफ पक्षाला बहुमत मिळाले तर त्यामुळे विरोधी पक्ष्याच्या आंदोलनाला मोठे बळ मिळू शकते . जे कोणत्याही स्थितीत सत्ताधिकारी पक्षाला परवडणारे नाही 

    अफगाणिस्तान बरोबर सीमा शेअर करणाऱ्या खैबर ए पख्ततनूवा या प्रांतात पाकिस्तानचीच निर्मिती असलेल्या तेहरीके तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेतर्फे  मोठ्या प्रमाणत हिंसाचाराच्या घटना घडवल्या जात आहेत त्यामुळे ऑस्ट्रेलिया , यूएस युके . आणि सौदी अरेबिया या देशाच्या सरकारने इस्लमबाबाद शहरात विनाकारण फिरू नये स्वतःचा जीव धोक्यात घालू नये अश्या सूचना आपल्या नागरिकांना काही दिवसापूर्वीच  दिल्या .होत्या एक दहशतवादी हल्याचा कट काही दिवसापूर्वीच पाकिस्तानी  सरंक्षण दलांनी उधळून लावला होता . त्या पार्श्वभूमीवर या घडामोडी अभ्यासल्यास यातील दाहकता आपणास समजू शकते त्यामुळे पाकिस्तानी डेमोक्रेक्तिक मूव्हमेंट ने इस्लामाबाद महाहनगरपालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी केलेल्या घटनांचा फायदा तेहरीके तालिबान पाकिस्तान हि संघटना घेऊ शकते ५ जानेवारीला पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राईक


केल्याचे वृत्त एका अफगाणिस्तानमधील वृत्तपत्राने केले होते जो दावा  पाकिस्तानने खोदून काढला . आहे आम्ही फक्त आमच्या हद्दीतील तेहरीके तालिबान पाकिस्तान चा तळांवर हल्ला केला असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे काही दिवसापूर्वी अफगाणिस्तानकडून पाकिस्तानने आमच्यावर हल्ल्याचा विचार देखील करू नये असा प्रयत्न केल्यास त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल असे सांगितले होते त्या पार्शवभूमीवर या घडामोडी आवश्यक आहे 

पाकिस्तानचा  राजकारण्यांचा विचार करता पाकिस्तानी पंजाबचे देशातील स्थान अत्यंत महतवाचे आहे पाकिस्तानी लष्करात आणि प्रशाकीय व्यवस्थेत पाकिस्तानी पंजाबी नागरिकांचे मोठ्या प्रमाणत प्राबल्य आहे पाकिस्तानातील सर्वात प्रबळ आणि प्रगत प्रदेश हा पाकिस्तानी पंजाब आहे . पाकिस्तानी पंजाबकमधील राजकीय स्थिरतेच अस्थिरतेचा परिणाम देशातील राजकारणावर मोठ्या प्रमाणत होतो राजकीय अस्थिरता असल्यास त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतोच त्यामुळे पाकिस्तानमधील प्रगतिसासाठी पंजाब शांत आवश्यक आहे पाकिस्तानी पंजाबच्या राजकीय स्थिरतेचा निर्यय ९ ते ११ जानेवारी दरम्यान होत असल्याने हे दिवस पाकिस्तासासाठी महत्त्वाचे आहेत 

पाकिस्तानमधील राजकीय  स्थितीचा  परिणाम आपल्या भारतावर होत असल्याने या घडामोडी आपल्यासाठी  देखील महत्वाच्या आहेत या घडामोडींमुळे पाकीस्तानात अस्थिरता निर्माण न होण्यातच भारताचे हित आहे  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?