आर्थिक वर्ष २०२3-२४ च्या अर्थसंकल्पात रेल्वेचा विचार करता महाराष्ट्राला काय मिळाले ?

        


     नुकताच आपल्या भारताचा आर्थिक वर्ष २०२3-२४ चा अर्थसंकल्पात जाहीर झालासन २०१६ साली १९२३ पासून सुरु असणारी प्रक्रिया खंडित झाली आणि रेल्वे अर्थसंकल्प मूळ अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला , ज्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात होणाऱ्या विविध घोषणा थांबल्याज्यामध्ये येणाऱ्या वर्षात सुरु होणाऱ्या प्रवाशी रेल्वेगाड्या , रेल्वेतर्फे होणारे विविध विकासकामे जसे नव्या मार्गाची निर्मिती , अस्तित्वात असणाऱ्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण तिहेरीकरण  , गेज बदलणे, डिझेल मार्गाचे विद्युतीकरण वगैरे .आज ज्या प्रमाणे पूर्वी  इतर मंत्रालयाच्याबाबत  तरतुदी घोषित केल्या जात  असत त्याच प्रमाणे रेल्वेबाबतच्या तरतुदी घोषित केल्या जातातमात्र त्यामुळे प्रत्येक गोष्टीला किती खर्च आला या विषयी सविस्तर माहिती अर्थसंकल्पाच्यावेळी मिळत नाही रेल्वे मंत्रालयाकडून अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर काही दिवसानी  याबाबत विभागनिहाय माहिती प्रसिद्ध करण्यात येते जसे की मध्य रेल्वेच्या अंतर्गत पुढील कामांसाठी इतके रुपये राखून ठेवले आहेत दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत पुढील कामासाठी इतके रुपये राखून ठेवले आहेत वैगेरे . रेल्वेच्या भाषेत याला पिंक बुक म्हणतात आर्थिक वर्ष २०२३-२४चा विचार करता महाराष्ट्रासाठी खूप गोष्टी ठेवल्याचे या पिंकबुकमधून दिसते चला तर जाणून घेऊया या तरतुदी

        महाराष्ट्राचा विचार करता  पुणे हा पूर्ण प्रशासकीय विभाग,नाशिक प्रशासकीय विभागातील नंदुरबार जिल्हा सोडून संपूर्ण नाशिक प्रशासकीय विभाग   अमरावती प्रशासकीय विभागातील यवतमाळ हा जिल्हा सोडून संपूर्ण अमरावती प्रशाकीय विभाग , नांदेड प्रशासकीय विभागातील लातूर जिल्हा आणि नागपूर  प्रशासकीय विभागातील पश्चिम भागातील जिल्ह्यांचा समावेश मध्य रेल्वेत होतो  महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग मध्य रेल्वेच्या अंतर्गत येतो . त्यामुळे त्या तरतुदी पहिल्यांदा बघूया 

        मागील आर्थिक वर्षात कल्याण कर्जत इगतपुरी कसारा ,इगपुरी भुसावळ  विविध भागात रेल्वेच्या मार्गाचे तिहेरीकरण चौपदरकीरण काहीमार्गवर विविध पुलांचे कामांसह पुणे मोरगाव मार्गे अहमदनगर , मोरगाव जेजुरी चांदुर बाजार अमरावती अहमदनगर नेवासा , लातूर गुलबर्गा नाशिक रोड शिर्डी , औरंगाबाद ते पुणतांबा औरंगाबाद ते भुसावळ आदी विविध मार्गांसाठी  सर्वेक्षण आणि प्रारंभिक अभियांत्रिकी कामे यांचा समावेश होता ज्याची एकत्रित संख्या ४५ होती यावर्षी  यावर्षी ती संख्या ६६ आहे यामध्ये नवीन रेल्वेमार्गाची निर्मितीची १५ कार्ये

रेल्वेमार्गाचे दुपदरीकरणची १५ कामे नॅरो /मीटर गेज चे ब्रँड गेज मध्ये परिवर्तनाचे कार्य तर रेल्वे फलाटांची लांबी उंची वाढवणे सिंगलची कामे यांची कार्य यांची संख्या ३६ आहे ज्या मार्गांची नव्याने उभारणी होणार आहे त्यामध्ये पुणे नाशिकमनमाड इंदोर बारामती लोणंद ,मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे जोडणारा चिपळूण कराड हा बहू प्रतिक्षीत मार्ग , ,उस्मानाबादमार्गे  सोलापूर ते तुळजापूरआदी प्रमुख मार्ग आहेत ज्याचे गेज बदलणार आहेत तो मार्ग म्हणजे पाचोरा ते जामनेर हा रेल्वेमार्गया मार्गाचे गेज बदलताना तो मलकापूर पर्यंत वाढवणार आहेत . ज्या विद्यमान रेल्वेमार्गाच्या सुधारणा होणार आहेत त्यामध्ये कल्याण कसारा , जळगाव भुवसावळ या दरम्यान तिसरा मार्ग टाकणे तसेच पाकनि ते मोहोळ आणि सोलापूर ते पकनी नागपूर इटारशी दरम्यानदुसरा रेल्वेमार्ग टाकणे आदी कामे प्रस्तावित आहेत याखेरीज मुबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इगतपुरी लोणवाला येथील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे पुण्याहून मनमाडमार्गे जाणाऱ्या रेल्वे गाडयांना दौड रेल्वे स्थानकात इंजिनची दिशा बदलण्यासाठी जो वेळ लागतो तो कमी करण्यासाठी दौड येथे कॉर्ड लाईनची निर्मिती करणे आदीसंह रेल मालवाहतुकीसासाठी करावयाच्या उपयोजना या कामाचा समावेश आहे

          लातूर जिल्ह्याचा अपवाद वगळता संपूर्ण मराठवाडा आणि  विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यतील काही भागांचा  समावेश होणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मागील वर्षी   बल्लारशा ते  आदीलाबादनांदेड ते बिदर या दोन नव्या मार्गाच्या उभारण्याबाबत सर्वक्षण करणेमी  परभणी परळी या रेल्वेमार्गागाचे दुदुपदरीकरण  करणेपूर्ण रेल्वे जंक्शनला बायपास लाईन उभारणेबल्लारशा आणि काजीपेठ या रेल्वेमार्गावर चौथी मार्गिका उभारणे, तसेच अकोला पूर्ण रेल्वेमार्गाला पूर्णता जंक्शनला मनमाड लाईनला जोडणे  हि कामे करण्यात येणार होती यावर्षी बिदर ते नांदेड या नव्या मार्गाची निर्मिती आणि अकोला-धोन, बरा मुदखेड परभणी ,दौड गुलबर्गा या मार्गातील रेल्वेमार्गचे दुपदरकीरण हि कमी प्रस्तावित आहेत

         महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग भंडारा गोंदिया गडचिरोल हे पूर्ण ज्जीळे आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या समावेश असणाऱ्या पूर्ण मध्ये रेल्वेबाबत बोलायचे झाल्यास छत्तीसगगढ झारखंड या राज्याच्या मोठा

भाग असणाऱ्या या रेल्वेझोनमध्ये प्रामुख्याने त्यात भागातीलच कामे आहेत नाही म्हणायला धनबाद चंद्रपूर हि एक रेल्वेलाईन आहे असो

 मुंबईचा काही भाग पालघर नंदुरबार हे दोन जिल्हे असणाऱ्या पश्चिम रेल्वेचा विचार करता अंधेरी विरार या मार्गावर स्लो मार्गावर जास्त डब्यांच्या लोकल चालवलवण्याबात करावयाच्या उपाय योजना वसई रोड या रेल्वेस्थानकात रेल्वेमार्गाच्या इंटर लॉकिंग विषयक कामे तसेच वसई रोड ते सुरत आणि उधाणा ते जळगाव दरम्यान रेल्वेमार्ग सहजतेने ओलांडता यावे यासाठी काही भूमीगत मार्ग आणिआणि उडडाणपुलांची कामे समाविष्ट आहेत कोकण रेल्वेचा कारभार रेल्वे मंत्रालयाळकडून बघता केंद्राकडून स्वतंत्रपणे बघण्यात येतो त्यामुळे ती माहिती मिळू शकलेली नाही 

हे बघता महाराष्ट्राला रेल्वेकडून बरेच काही देण्यात आले असले तरी अजून बरेच काही देण्याची गरज आहे हेच खरे  

ज्यांना मागच्या वर्षाचा रेल्वेचा महाराष्टासाठीचा आढावा वाचायचा असेल त्यांनी पुढील लिंकवर क्लीक करावे 

http://ajinkyatarte.blogspot.com/2022/02/blog-post_8.html



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?