दुष्काळात तेरावा महिना


    पाकिस्तानासाठी सध्या दुष्काळात तेरावा महिन्यासारखी स्थिती आहे आर्थिक स्थिती दिवानसोदिवस ढासळत असताना चीनसारखाच जीवश्च कंठश्च मित्र असलेला तुर्कीये (जुने नाव तुर्कस्थान ) भूकंपामुळे पूर्णतः उद्धवस्त झाला आहे . आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानने आवळलेल्या काश्मीरच्या रागात नेहमी सूर मिळवळणारा देश म्हणजे तुर्कीये (जुने नाव तुर्कस्थान ) होता सध्या या दोन्ही मित्रांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असताना पाकिस्तानची स्थिती  अधिकच  दयनीय असल्याने पाकिस्तानला बुडत्याला काडीचा आधार या नात्याने पाकिस्तानला काहीसा तुर्कस्थानच्या आधार होता सोमवारी झालेल्या भूकंपामुळे तो पूर्णतः मोडीत निघाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमवेत चालणारी बोलणी कोणत्याही ठोस निश्चित कृती कार्यक्रमाशिवाय अनिश्चित स्थितीत संपत आहे. नैसर्गिक इंधनाचे आणि अमेरीकी डाँलरबरोबरचा विनिमय दर सातत्याने वाढत आहे. देशातील सर्वात
प्रबळ असलेल्या पंजाब प्रांताच्या अनेक भागात पेट्रोल आणि डिझेलची अभूतपूर्व इंधनाची टंचाई झाल्याची वार्ता येत आहे. परकीय चलनाचा साठा वेगाने शुन्यवत होण्याचा  दृष्टीने वाटचाल होत आहे. देशाच्या पश्चिम भागात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. मात्र देशातील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण मात्र पुर्वीप्रमाणेच सुरु आहे. किंबहुना दिवसोंदिवस त्यात वेगाने वाढच होत चालली आहे.

         सत्ताधिकारी वर्गाकडून विरोधी पक्षात असणाऱ्या विविध व्यक्तींवर विविध खटले दाखल केले जात आहे. या विनाकारण दाखल करण्यात येत असलेल्या खटलांच्या विरोधात तसेच या खटल्यांमध्ये अटक केल्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात इम्रान खान यांनी जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तून्ववा या प्रांतात विधानसभेच्या निवडणुका होण्याची तारीख त्या त्या प्रांताच्या राज्यपालांकडून जाहीर करण्यात येत नसल्याने देशात प्रचंड अस्वस्थता आहे(पाकिस्तानो संविधानानुसार प्रांतातील निवडणुकांचा तारखा जाहीर करण्याचा अधिकार त्या त्या प्रांतातील राज्यपालांचा आहे ) इम्रान खान सत्ताधिकारी वर्गावर या बाबत दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्न करत आहेत ज्यामुळे या अस्वथतेमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे या वाढत्या राजकीय अस्थिरतेमुळे आंतराष्ट्रीय नाणेनिधीची बोलणी फिसकट आहेत आंतराष्ट्रीय नाणेनिधीची देशाला मदत देताना देशात राजकीय स्थिरता असावी ही अट

काहीशी अडचणीची ठरत आहे  मात्र याकडे दुर्लक्ष करून राजकारणी व्यक्त एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त असल्याचेच दृश्य सध्या पाकिस्तानात दिसत नाही 

देशाची आर्थिक स्थिती ढासळत असतांना त्याबाबत काही न केल्याने पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनता दिवासनोदिवस अधिक त्रासात ढकलली जात आहे सध्या देशात अनेक औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे महागाईने गेल्या सर्व वर्षाचे विक्रम मोडले असल्याने जनतेत मोठ्या प्रमाणत अंसतोष आहे ज्यामुळे इम्रान खान यांच्या लोकप्रियतेत वाढ होताना दिसत आहे हि वाढती लोकप्रियता बघून ती कमी करण्यसाठी सत्ताधिकारी वर्गाकडून अनेक गोष्टी केल्या जात आहेत त्याला प्रत्युत्तर करण्यासाठी इम्रान खान मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात येत आहे यामध्ये मात्र भरडला जात आहे तो सर्वसामन्य नागरिक दुःख त्याचेच आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?