मला भावलेले स्वातंत्र्यवीर सावरकर

   


  
आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी व्यक्तिमत्वांची  जर आपण यादी केली  तर ज्यांचे नाव आपणास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर . कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी अग्रक्रमाने पुजल्या जाणाऱ्या  गणपतीचे नाव घेऊन जन्माला आलेल्या नाशिकच्या या सुपुत्राने आपल्या प्रखर ज्वाज्वल्य देशभक्तीने देशभक्तीच्या एक मापदंडच आपल्या कृतीतून घालून दिला . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त देशभक्तीचा मापदंडच आखून दिला असे नाही . तर समस्त पृथ्वीवर फक्त मानवास लाभलेल्या बुद्धी या शास्त्राचा वापर करत मानवाचे नीतिनियम  निश्चित करणाऱ्या धर्माची चिकित्सा करून त्यास कालसुसंगत कसे करावे ?  याचा वस्तुपाठ देखील त्यांनी घालून दिला .

 महान व्यक्तींमध्ये आपणास व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू आढळतात.त्यातील सर्वच जगासमोर येतात असे नाही,महान व्यक्तींचे अनेक पैलु दुर्देवाने अचर्चीतच राहतात. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा या नियमाला अपवाद नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे  अंदमानातील जीवन ,तेथून सुटका आणि 1947नंतरच्या त्यांचा जीवनाविषयी अनेकदा बोलले जाते .मात्र या सर्व प्रकारात त्यांचा एक पैलू दुर्दैवाने अप्रकाशीतच राहतो, तो म्हणजे आपल्या रत्नागिरीच्या मुक्कामात त्यांनी केलेले समाजप्रबोधनाचे कार्य. आपल्या भारतीय स्वतंत्रलढ्याकडे नजर टाकल्यास लोकमान्य टिळकांसारखे स्वातंत्र्यासाठी पेटलेले नेते दिसतात मात्र समज सुधांरणेबाबत लोकमान्य टिळकांची मते काहीशी प्रतिकूल होती सर्वप्रथम हे परकीय राज्य इथून निघून गेले पाहिजे  परकीय राज्य जाऊन स्वकीयांचे राज्य आल्यावर सामाजिक सुधारणा

सहजतेने करता येईल आपले ध्येय परकीय सत्ता उलथून टाकणे हेच असले पाहिजे हे असे लोकमान्य टिळकांना वाटत असे . तर ज्येष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर याच्या मते भारतीय समाजाने  ब्रिटिशांच्या राजवटीचा फायदा घेत सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय मिळणाऱ्या राजकीय स्वातंत्र्यास काहीही अर्थ नाही मात्र स्वातंत्रवीर सावरकर हे राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक सुधारणांच्या आग्रह धरणारे व्यक्तिमत्व होते आपल्या भारतीय स्वतंत्रलढ्यातील नेत्याच्या विचार करता या गोष्टीमुळेच स्वातंत्रवीर सावरकर उजवे ठरतात

अंदमानातील सेल्युलर जेलमधून सुटका झाल्यावर पुढची सुमारे १२ ते १३  वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत  अलीपूरच्या तुरुंगात आणि रत्नागिरी येथील घरात  स्थानबद्ध होते.या काळात त्यांनी समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले. या काळात हिंदू धर्मातील अनेक दोषांवर अत्यंत प्रखर शब्दात कोरडे ओढणारे लेखन केलॆ . त्यांचे समाज सुधारणेबाबतचे  लेखन "क्ष किरणे "  या निबंधाच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहेत . त्याची काही मते आज २०२३ साली देखील पचवणे अत्यंत कठीण आहे त्यांनी अस्पृश्यता निवारण,  रोटी बंदी  बेटी बंदी , व्यवसायबंदी , शुद्धीबंदी आदी ,समुद्रीबंदी  हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांच्या फोलपणा लोकांच्या लक्षात यावा आणि लोकांनी त्या सोडून दयाव्यात यासाठी

प्रयत्नची पराकाष्ठा केली आपले समज सुधारणेचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी  जातुच्छेदक निबंध, विज्ञाननिष्ठां निबंध अशी पुस्तकेही लिहली त्याकाळी हिंदू धर्मियांची सर्व प्रार्थनास्थळे सर्व हिंदूंसाठी उघडी नसत  काही हिंदू समाजबांधव मंदिरात जाऊ शकत नसे त्याच्या विरोध करण्यासाठी त्यांनी रत्नागिरीत सर्व लोक जाऊ शकतील असे मंदिर उभारले रत्नागिरीचे सुप्रसिद्ध पतितपावन मंदिर ते हेच   सावरकरांनी आपल्या प्राचीन वारसा लाभलेल्या हिंदू धर्मातील कालसुसंगत नसणाऱ्या  चालीरीतींना  तिलांजली देत त्यास खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बनवले

आपल्या दुर्दैवाने त्यांनी प्रस्तावित केलेल्या धार्मिक सुधारणांपैकी फारच कमी समाजमान्य पावल्या . जरी  त्यांच्या सर्वांच्या सर्व सुधारणा अमलात येणे अवघड असले तरी शक्य तेव्हढ्या जास्तीत जास्त सुधारणा जर समाज मान्य झाल्या असत्या तर आज समाजात दिसणारे चित्र खूपच आशादायक असते , यात माझ्या मनात तरी शंका नसावी 

विज्ञानप्रेम हा सुध्दा त्याचातील मला विशेष भावलेला गुण आहे प्रखर धर्मप्रेमी असूनही धर्मातील अनिष्ट चालीरीतीवर हल्ला चालवणारे समाजाने आता विज्ञानाची कास धरली पाहिजे हे सागणारे सावरकर खरोखरमहान व्यक्तीमत्व होते गाय उपयुक्त पशू आहे मानवाने तिचा जास्तीत जास्त वापर केला पाहीजे किंवा माझा निधनानंतर माझे कोणतेही क्रियाक्रम करू नये असे म्रुत्यूपञात सांगणारे सावरकर मला त्यामुळे अधिकच वंदनीय ठरतात सावरकर म्हणजे हिंदूत्व असा संकुचित अर्थ घेणाऱ्यांनी  सावकरांचा या विचाराचा अभ्यास करण्याची नितांत गरज आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या हिंदुत्तवाची उभारणी केली त्याचा पाया विज्ञान हा होता .आहे   होता .आपल्या भारतीय राज्यघटनेतसुद्धा ५१ ए  मध्ये सुद्धा नागरिकांनी आपली विचारसरणी विज्ञानाला पूरक करावी असे सांगितले आहे . मित्रानो विज्ञान या विषयांचे शिक्षण घेणे आणि विज्ञानाला पूरक विचारसरणी करणे या पूर्णतः भिन्न बाबी आहेत . विज्ञानाला पूरक विचारसरणी अंगीकारणे या मध्ये बुद्धीला प्रश्न पडण्याची सवय अंगी लावणे  , प्रत्येक गोष्टीवर अंध विश्वास न ठेवता त्याची तर्कसुसंगत पध्द्तीने उभारणी

करून बुद्धीला पटले तरच त्यांचा अवलंब करणे , या बाबी अंतर्भूत आहेत . या बाबी जर प्रत्येक भारतीयांनी आत,आत्मसात केल्या तर ती स्वातंत्रवीर सावरकरांना खऱ्या रथाने आदरांजली ठरेल असे मला वाटते .

सिध्दहस्त लेखक म्हणजे काय याचा वस्तू पाठच जणु सावरकरांनी घालून दिला त्याचे लेखन मुलत: वाचले कि कळते एखाद्या भाषेवर प्रभुत्व म्हणजे काय पलेदार शब्द लांबलचक वाक्य अश्या साजशृंगीत भाषेत लेखन करावेत ते सावरकरांनीच सध्या त्यांचे जे लेखन प्रसिध्द केले जाते ते बहुसंख्य वेळेस पुनर्लेखन  केलेले साहित्य असते त्यांचे मुळ साहित्य जो वाचेल त्याची मराठी अम्रुताहूनी मधुर होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे त्यांचे कमला हे मराठीतील माझ्या माहितीतील तरी एकमेव खंडकाव्य आहे मराठीतील सर्वोत्क्रुष्ट लेखक म्हणून भी तर त्याचेच नाव घेईल आणि अत्यंत हालपेष्टा सहन करत त्यांनी ही साहित्यरचना केली है विशेष

सावरकर यांनी मराठीला दिलेले योगदान पण खुप महत्वाचे आहे सध्या आपण सहजतेने वापरत असणारे कितीतरी शब्द हे मुळच्या इंग्रजी शब्दांना सावरकरांनी दिलेले मराठी शब्द आहेत हे आपणास जाणवत देखील नाही उदा संपादक संपादकीय वगैरे. मला स्वातंञ्यवीर सावरकरानंतर एकच व्यक्ती आढळते ज्यांनी मराठीत शिरलेल्या अन्य भाषिक शब्दांना मराठी शब्द दिले ती म्हणजे छञपती शिवाजी महाराज त्यांनी मराठी वरील फारशीचा प्रभाव दूर केला होता तर स्वातंञ्यवीरांनी मराठी   भाषेवरील इंग्रजीचा  प्रभाव दूर केला स्वातंञ्यवीर सावरकर यांनी मराठीत आणलेले कित्येक शब्द माञ रूढ होवू शकले नाहीत हे दुर्दैव मान्य करायलाच हवे

सावरकर यांचे मोठेपण येथेच संपत नाही त्याचातील अजून एक मला आवडलेला गुण म्हणजे त्यांची समयसुचकता त्याचा आयुष्यात ती जागोजागी दिसते मग अशी  जगप्रसिध्द मार्सेलीसची उडी असो किंवा त्यांनी दुसऱ्या  महायुध्दाचा प्रसंगी तरुणांना केलेला उपदेश असो या आणी अश्या प्रत्येक प्रसंगी

त्यांची समयसूचकताच दिसते  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गुणांची जरी यादी करायची म्हटली तरी एखाद्याची झोप उडू शकते

समाजसुधारक, विज्ञाननिष्ट, भाषातज्ज्ञ, उत्कृष्ट संघटक प्रखर देशभक्त, समयसुचक, सिध्दहस्त लेखक, भविष्यसूचक, बलोपासक, त्यांचा गुणांची यादी प्रचंड आहे माञ मी पामर दुर्दैवाने येव्हढीच करु शकलो पुण्यातील चाफेकर बंधुंच्या फाशी नंतर त्यांचा देशासाठी जीवन.समर्पित करण्याचा घरचा देवीसमोर घेतलेला संकल्प. सारेच अविश्वसणीय  नाशिक महानगरपालीकेने त्यांचा या जगप्रसिध्द उडीचा सम्माणार्थ नाशिक मधील पहिल्या तरणतलावाला त्यांचे नाव देवून त्यांचा सम्मान केलाय तसेच नाशिकमधील पहील्या उड्डाणपुलाला देखील त्यांचे नाव देण्यात आलंय पुढच्या मंगळवारी असलेल्या  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्य  त्यांना वंदन करून सध्यापुरते थांबतो

 

जय स्वातंत्र्यवीर सावरकर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?