नाशिककरांसाठी सुवर्णक्षराने नोंदवायचा क्षण 

 


 मंगळवार २१ फेरबुवारीची सायंकाळ नाशिकरांसाठी सुवर्णाक्षराने नोंदवून ठेवावी अशीच ठरली , कारण नाशिकचे भूमिपुत्र जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानी आणि भारतीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणारे सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी विद्यमान विश्वविजेतेपदास पाचवेळा विश्वविजेते असणाऱ्या मॅग्नस कार्लसन याना पराभवावाचे पाणी पाजण्याचा भीम पराक्रम घटना यावेळी घडली . प्रो चेस टूर्नामेंट या १६ संघाच्या सामावेश असणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान इंडिया योगीज्   या संघाकडून खेळताना त्यांनी हा पराक्रम केला  मॅग्नस कार्लसन  Canada Chessbrahs या संघाकडून खेळत होते  काळ्या मोहऱ्या घेऊन विदित गुजराथी यांनी हे यश मिळवले आहे बुद्धिबळ खेळामध्ये पांढरे मोहरे घेऊन खेळणारा खेळाडू प्रथम चाल करत असल्याने खेळामध्ये प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करणे पांढऱ्यास काहीसे सोपे असते काळे मोहरे घेऊन खेळणाऱ्या खेळाडूला पांढऱ्याचे आक्रमण परतवून पांढऱ्यावर प्रति आक्रमण करावे लागते ही बाब लक्षात घेता विदित गुजराथी यांनी मिळवलेल्या विजयाचे महत्व लक्षात येते 

  या डावदरम्यान  दोनदा मॅग्नस कार्लसन यांना  विदित यांच्यावर विजय मिळवायच्या संधी मिळाल्या मात्र त्याचा फायदा मॅग्नस कार्लसन घेऊ शकले नाहीत मात्र विदित गुजराथी यांनी मिळलेल्या संधीचे सोने करत मॅग्नस कार्लसन यांच्यावर सनसनाटी विजय मिळवावा डावाची सुरवात मॅग्नस कार्लसन यांनी वजिराच्या बाजूकडील घोड्याकडील प्यादे एक घर चालवून (बुद्धिबळाच्या भाषेत बी ३ ) केली त्याला काळे मोहरे घेऊन खेळताना विदित गुजराथी यांनी वजिरासमोरचे प्यादे दोन घरे चालवून प्रत्युत्तर केले त्यानंतर मॅग्नस कार्लसन यांनी राजाकडील प्यादे

एक घर चालवले आपल्या दुसऱ्या चाळीत विदित यांनी वजिराकडील उंटाच्या समोरील प्यादे दोन घरे चालवली दोन्ही खेळाडूंच्या या चालीमुळे दवाचे रूपांतर इंग्लिश ओपनींग मध्ये झाले ( बुद्धिबळामध्ये डावाची सुरवात कशी केली जाते यावरून काही पद्धती रूढ झाल्या आहेत त्यांना त्या पहिल्यांदा कुठे खेळवण्यात आल्या  कोणत्या खेळाडूंकडून त्या पहिल्यांदा   खेळविण्यात  आहेत आल्या यावरून त्यांना विविध नावे देण्यात आली आहेत )

  या आधी विदित गुजराथी आणि मॅग्नस कार्लसन या आधी अनेकदा परस्परांविरुद्ध लढले आहेत मात्र त्यावेळी एकतर विदित यानां पराभव स्वीकारावा लागला किंवा बरोबरी तरी मान्य करावी लागली होती .मात्र यावेळी मिळवलेल्या विजयामुळे त्यांच्या आत्मविश्वास प्रचंड प्रमाणत दुणावला आहे ज्याचा फायदा त्यांना नक्कीच पुढच्यावेळी होईल हे नक्की / एका नाशिककाराने या सारखे यश मिळवणे हा एका प्रकारे नाशिकसासाठी सुवर्णक्षर आहे हे मात्र त्या एव्हढेच खरे आहे हे नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?